छत्रपती शाहू |कोल्हापूर चे आणि सातारचे | मराठा साम्राज्याच्या दोन गाद्या का?

कोल्हापूर च्या छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त| मराठेशाहीच्या दोन गाद्यांचा इतिहास 

Vintage Black and white picture of His Highness king Shahu of Kolhapur
His Highness king Shahu Maharaj of Kolhapur: pic Courtesy Google 

कोल्हापूर चे छत्रपती शाहू महाराज 

प्रवाहाविरुद्ध जावून  प्रतिगामी समाज रूढींना नाकारत एका समाजवादी राजाने उचललेली पावले रूढीवाद्यांना रुचली नाहीत.  कोल्हापुरच्या छत्रपती शाहूंची प्रतिमा मलीन करण्याचे प्रकार होत राहिले पण त्यांचे कार्य कर्तृत्व आजही प्रकाशमान व प्रेरणादायी आहे 

बालपण

कोल्हापूरच्या शाहू छत्रपती महाराजांचा जन्म २६ जून १८७४ रोजी झाला. त्यांचे मूळ नाव यशवंतराव गायकवाड होते. त्यांचे वडील जयंतीलालराव गायकवाड आणि आई राधाबाई यांच्या पोटी ते जन्मले. . वयाच्या १०व्या वर्षी शाहू छत्रपती महाराज यांना कोल्हापूर संस्थानाचे प्रमुख म्हणून गादीवर बसविण्यात आले.

शिकार व कुस्ती चा शौक

कुस्ती या रांगड्या खेळ प्रकाराबद्दल छत्रपती शाहूंना विशेष प्रेम होते. कोल्हापूरातील विविध कुस्ती आखाड्यांना व मल्लांना त्यांनी राजाश्रय दिला होता.

शाहू महाराजांना शिकार करण्याचा ही विशेष शौक होता. ते प्राण्यांच्या शिकारीसाठी जंगलात जात असत व त्यांच्या शिकारीच्या साहस कथा अजूनही कोल्हापूर आणि आसपासच्या भागात प्रसिद्ध आहेत.  शाहू महाराजांनी एका रानरेड्याला कपाळावर मुठेने प्रहार करून ठार केले होते व‌ तो रानरेडा अजूनही कोल्हापुरात preserve करून ठेवलेला आपल्याला पहायला मिळतो.

छत्रपती शाहू महाराजांनी मुष्टीप्रहाराने मारलेला रान रेडा: Pic Courtesy Google 

जातिप्रथा विरोधी भूमिका 

शाहू महाराज हे निधर्मी आणि समाजसुधारक होते. त्यांनी आपल्या राजवटीत जातीभेद, धर्मभेद यांना तिलांजली दिली. सर्व जाती-धर्मांच्या लोकांसाठी समान संधी निर्माण करण्यासाठी त्यांनी विविध उपक्रम राबविले. त्यांची ही निधर्मी वृत्ती त्यांच्या राजकीय आणि सामाजिक कार्यांमध्ये दिसून येत होती.

डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांना शैक्षणीक सहाय्य

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणासाठी शाहू महाराजांनी महत्त्वपूर्ण सहाय्य केले. त्यांनी डॉ. आंबेडकर यांना आर्थिक सहाय्य पुरवून परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यामुळे डॉ. आंबेडकर यांनी भारतातील सामाजिक व‌ राजकीय क्षेत्रात महान कार्य केले.

डॉ.आंबेडकर व छत्रपती शाहू महाराजांचा दुर्मिळ फोटो 

आदर्श राजा

शाहू महाराज एक आदर्श राजा होते. त्यांनी शिक्षण, आरोग्य, सामाजिक न्याय यांसारख्या क्षेत्रांमध्ये अनेक सुधारणा घडवून आणल्या. त्यांनी शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक शाळा आणि महाविद्यालये स्थापन केली. सामाजिक सुधारणांसाठी त्यांनी अस्पृश्यता निवारण, विधवा पुनर्विवाह, मुलींचे शिक्षण यांसारख्या क्षेत्रांत महत्त्वपूर्ण कार्य केले.

शाहू छत्रपती महाराज यांचे कार्य आणि विचार आजही प्रेरणादायी आहेत. त्यांचे समाजसुधारक कार्य आणि समाजातील प्रत्येक घटकाच्या उन्नतीसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे ते एक आदर्श राजा म्हणून ओळखले जातात.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पश्चात मराठा साम्राज्याच्या कोल्हापूर व सातारा अशा दोन गाद्या (सत्ता ) विभाजित कशा झाल्या ?

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पश्चात घडलेला अंतर्गत सत्ता संघर्ष 

छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र, संभाजी महाराज शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सत्ता सांभाळू लागले. परंतु 1689 मध्ये संभाजी महाराजांना मुघलांनी पकडून ठार केले. त्यानंतर संभाजी महाराजांचे पुत्र, शाहू महाराज (शाहू छत्रपती) कैदेत होते.

संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र, राजाराम महाराज, 1689 साली सिंहासनावर बसले. त्यांनी मुघलांच्या विरोधात युद्ध चालू ठेवले, पण 1700 साली त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या विधवा पत्नी, महाराणी ताराबाई, त्यांचा पुत्र शिवाजी (दुसरे) यांच्या नावे सत्ता चालवू लागल्या.

ताराबाई यांचे सातारच्या छत्रपती शाहूं विरुद्ध बंड : कोल्हापूर आणि सातारा गादीची स्थापना

छत्रपती शाहू हे ताराबाईंचे थोरले दीर होते .1707 साली औरंगजेबाच्या मृत्यूनंतर शाहू महाराज मुघलांच्या कैदेतून मुक्त झाले आणि त्यांनी सातारा येथे गादी स्थापित केली. त्यांनी ताराबाई व शिवाजी दुसरे यांच्याकडून सत्ता मिळवली. ताराबाई यांनी नंतर कोल्हापूर येथे आपली स्वतंत्र अशी गादी(राज्य) स्थापन केली.

छत्रपती शिवाजी महाराजांचा वंश 

छत्रपती शिवाजी महाराज ते सातारचे शाहू महाराज यांची वंशावळ खालीलप्रमाणे आहे:

छत्रपती शिवाजी महाराज(1630-1680)

   – संभाजी महाराज : शिवाजी महाराजांचे पुत्र(1657-1689)

     – राजाराम महाराज: शिव पुत्र व संभाजींचे धाकटे बंधू(1670-1700)

   – शाहू महाराज: संभाजी महाराजांचे पुत्र (1682-1749)

     – शिवाजी दुसरे : शिवाजी महाराजांचे कनिष्ठ पुत्र राजारामांचा मुलगा(कोल्हापूर गादी)

शालिनी पॅलेस राजवाड्या समोरील छत्रपती शाहूंचा अर्धपुतळा 

हे ही वाचा 

चिमाजी अप्पांचे पोर्तुगीजांच्या वसई किल्ल्यावर आक्रमण व किल्ल्यातील चर्च च्या घंटेची शिवमंदिरात स्थापना

Leave a Comment