भारतात कॉफी आली 17 व्या शतकात : सूफी संतानी दाढीत लपवून आणल्या होत्या सात कॉफीच्या बीया

बाबा बुदन : भारताला कॉफीची ओळख करून देणारे कर्नाटकी सूफी संत

17th century Yamen coffee shop
बाबा बुदन यांनी अरबस्तानात कॉफी चाखली आणि तिच्या प्रेमात पडले

भारताला कॉफीचा पहिला गंध व चव देणाऱ्या बाबा बुदन (हजरत दादा हयात मीर कलंदर) या १७व्या शतकातील सूफी संताची गोष्ट मनोरंजक आहे. त्यांनीच भारत देशात कॉफी ची लागवड सुरु केली, आणि आज कॉफी हे पेय भारताच्या संस्कृतीत मिसळून गेले आहे. 

अरबस्तानची कॉफी आणि बाबा बुदनचं कॉफी प्रेम

१६७० च्या दशकात बाबा बुदन मक्केच्या यात्रेला गेले होते. या प्रवासात त्यांना यमन येथे कॉफीचे चविष्ट पेय प्रथमच प्यायला मिळाले. त्याच्या विशिष्ट सुगंधाने आणि चैतन्य देणाऱ्या गुणांनी ते इतके प्रभावित झाले, की भारतातही हे पेय चहाला पर्याय म्हणून मिळायला हवे असे त्यांना मनोमन वाटले. बाबा बुदन अक्षरशः कॉफीच्या प्रेमात बुडाले होते. ही कॉफी आपल्याला भारतात ही प्यायला मिळाली पाहिजे असे त्यांना मनोमन वाटू लागले. तेंव्हाचे अरब शासनाचे नियम पाहता हे बाबा बुदन यांचे केवळ एक दिवा स्वप्नच होते.

त्या काळी अरब देश कॉफीच्या बियांवर कडक नियंत्रण ठेवत होते. कोणीही कॉफीच्या बिया अरबस्तानातून बाहेर नेऊ नयेत, असा सख्त नियम  अरब राजशासनाने जारी केला होता. कायदेभंगासाठी अरबांच्या शिक्षा फारच अमानुष होत्या.

Yemen coffee shop of 17th century
Baba Budana in Yemen coffee shop

A ship of 17th century
Baba Budana in a ship to India from Yemen 

बाबा बुदन यांनी सात कॉफी च्या बिया आपल्या दाढीत लपवल्या

कॉफी आता हिंदुस्तानात न्यायची कशी असा बाबा बुदन यांच्या पुढे प्रश्न होता. यावर बाबा बुदन यांनी शक्कल लढवली.  त्यांनी सात कॉफीच्या बिया त्यांच्या लांब दाढीमध्ये लपवून भारतात नेण्याचे ठरवले. निर्णय जोखमीचा होता पण बाबा बुदन यांनी कॉफी प्रेमापोटी ही जोखीम घेण्याचे ठरवले आणि बाबा बुदन यांच्या दाढीत बसून या सात कॉफीच्या बियांनी अरबी समुद्र पार करत जहाजाने भारताचा कर्नाटक प्रांत गाठला.

कर्नाटकातील चिकमंगळूरच्या डोंगरातील पहिली कॉफी  

भारतात परत आल्यावर बाबा बुदनांनी त्या सात बिया कर्नाटकातील चिकमगळूरजवळील डोंगरात लावल्या. हे ठिकाण व इथले हवामान नैसर्गिकरीत्या कॉफीच्या वाढीसाठी अत्यंत अनुकूल होते. बाबा बुदन यांच्या या छोट्याशा प्रयत्नातून भारतातील पहिली कॉफीची शेती सुरू झाली. आजही या डोंगरांना ‘बाबा बुदन गिरी’ म्हणून ओळखले जाते, आणि हा प्रदेश भारतातील कॉफी उत्पादनाचे एक प्रमुख केंद्र बनले आहे.  

बाबा बुदनचा दर्गा आणि विरासत  

चिकमगळूरजवळ बाबा बुदनांचा प्रसिद्ध दर्गा आहे, जिथे अजूनही श्रद्धाळू यात्रेकरू येतात. त्यांच्या या एका धाडसी कृत्यामुळे भारतात कॉफीची शेती सुरू झाली. आज आपण सगळे सकाळी कॉफीच्या गरम घोटाबरोबर  दिवसाची सुरुवात करतो त्यामागे बाबा बुदनने कॉफी प्रेमापोटी घेतलेली जिवाची जोखीम आहे. बाबा बुदनांनी  भारतात केवळ एक पेय आणले असे नाही, तर भारताच्या अर्थव्यवस्थेत कॉफी मुळे एक नवीन अध्याय सुरू झाला!  

बाबा बुदन व सात कॉफी बियांचे ऋण

यापुढे जेंव्हा कधी वाफाळलेल्या कॉफीचा घोट घ्याल तेंव्हा  बाबा बुदनांच्या ह्या जोखमीची आठवण करा – सात बियांपासून सुरू झालेले भारतातील कॉफीचे उत्पादन आज  भारताला जगातील कॉफीच्या निर्यातीतला महत्वपूर्ण सहभागी बनवण्या पर्यंत वाढत गेले आहे ☕

 कॉफी निर्यात: आकडेवारी 

2023-24 आर्थिक वर्षात भारताने $1.29 अब्ज मूल्याची कॉफी निर्यात केली, जी 2020-21 मधील $719.42 दशलक्षच्या तुलनेत जवळपास दुप्पट आहे. 

भारताकडून प्रमुख कॉफी निर्यात होणारे देश : इटली, जर्मनी, स्वित्झर्लंड, जॉर्डन आणि लिबिया आहेत.

A palm holding seven coffee beans
सात कॉफीच्या बिया

Leave a Comment