AI चे दोन प्रकार: Agentic AI हा नाट्य अभिनेता असतो तर Assistant AI सिने अभिनेता

 

Artificial Intelligence चे दोन प्रकार 

Collage picture of theatre actor and film Actor
Symbolic college of Theatre actor and Film actor to explain Agentic and Assistant Ai

Agentic AI हा Assistant AI पेक्षा शक्तीशाली |Agentic AI ला स्वयं निर्णयाचे स्वातंत्र्य 

आधी Agentic AI आणि Assistant AI यांमधील मूलभूत फरक समजून घेऊया

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानाच्या जगात, Agentic AI आणि Assistant AI हे दोन महत्त्वाचे संकल्पना आहेत. या दोन्ही प्रकारच्या AI सिस्टीममध्ये मोठ्या प्रमाणात फरक आहे, जे त्यांच्या कार्यपद्धती, उद्देश आणि अनुप्रयोगांमध्ये दिसून येतो. या ब्लॉगमध्ये आपण Agentic AI आणि Assistant AI मधील मूलभूत फरक समजून घेणार आहोत.

1. Agentic AI: व नाट्य कलाकार 

जसे नाटकाच्या तालमी संहिते बरहुकूम करवून घेवून नटाला मूळ प्रयोगाच्या वेळी रंगमंचावर प्रयोग सादर करताना पूर्ण स्वायत्तता मिळते तसेच काहिसे एजंट AI च्या बाबतीत घडते.  एकदा नाट्य प्रयोग सुरू झाला की नटावरचे नियंत्रण संपुष्टात येते व नट आपल्या स्वयंनिर्णयाने व तालिमीत मिळालेल्या प्रशिक्षण यांची सांगड घालून निर्णय घेत आपले काम करू लागतो.

हीच प्रणाली एजंट AI कडून ही अवलंबली  जाते . एकदा उद्दिष्ट व कार्य पद्धती समजावून सांगितली की Agenti AI ला कार्य पूर्ती साठी स्वतंत्र केले जाते. यानंतर एजंट Ai स्वतः स्वतःचे निर्णय घेवून लागतो. 

Agentic AI ही एक अशी AI प्रणाली आहे जी स्वतःच्या निर्णयक्षमतेवर आधारित कार्ये पार पाडते. ही प्रणाली स्वायत्त आहे, म्हणजे ती मानवी हस्तक्षेपाशिवाय स्वतःच निर्णय घेऊन कार्ये करू शकते. जसे नाट्य कलाकार रंगमंचावर दिग्दर्शकाच्या थेट नियंत्रणाविना आपली भूमिका पार पाडतो.

– स्वायत्तता: Agentic AI स्वतःच निर्णय घेऊन कार्ये पार पाडते. ती मानवी हस्तक्षेपाची वाट पाहत नाही. नाट्य कलाकार ही असेच प्रसंगी Additional संवाद घेवून नाट्य प्रसंग निभावून नेत असतात. हे असे करणे नैतिक आहे की अनैतिक यावर नाट्य जगतात ही खल आहे. प्रसिद्ध नाटककार प्र. के. अत्रे  यांनी तर नटांना जाहीर ताकिद देवून‌ ठेवली होती की ” माझ्या ताजमहालाला तुमच्या विटा लावू नका” 

– निर्णयक्षमता: ही प्रणाली जटिल परिस्थितींमध्ये निर्णय घेऊ शकते. ती डेटाच्या आधारे विश्लेषण करून योग्य निष्कर्ष काढते. नाट्य कलाकार ही ऐन प्रयोगावेळी नेमून दिलेले प्रवेश, हालचाली बदलत असतात.

– लक्ष्य-केंद्रित: Agentic AI ही विशिष्ट लक्ष साध्य करण्यासाठी डिझाइन केलेली असते. ती त्या लक्ष्यांपर्यंत पोहोचण्यासाठी स्वतःच्या पद्धती वापरते. तसा नाटयकलाकारांचा ही मूळ उद्देश त्या दिवशी चा नाट्यप्रयोग तडीस नेणे असा असतो. सादरीकरणासाठी वापरण्यात आलेला “प्रयोग” हा शब्द नाट्य कलाकारांच्या पथ्यावर पडलेला दिसतो आणि हे सोईस्कर पथ्य ते नेमाने पाळतात. “प्रायोगिक” अशा नावाचा एक लक्ष केंद्रित किंवा प्रयोग केंद्रीत पंथ ही नाट्य कलाकारांचा आहे. इथे ते निर्णय क्षमतेचा अनियंत्रित आनंद घेत असतात.

 एजंट AI ची उदाहरणे:  Game bots, Trading Bots , रोबोट, स्वयंचलित ड्रायव्हिंग कार  जी रस्त्यावरील परिस्थितींचे विश्लेषण करून स्वतःच निर्णय घेते आणि वाहन चालवते.

Agentic AI मधे General Agentic AI अशा श्रेणीत चीनच्या मोनिका कंपनीने MANUS नावाचा Ai (Open source) नूकताच लॉन्च केला आहे. Latin भाषेतील Manus (मानस) या शब्दाचा अर्थ ‘हात’ असा मोनिका कंपनी सांगते पण मराठी मधे हा उच्चार ‘माणुस‘ असा होतो . रोबोट असलेला माणूस असा विरोधाभासी अर्थ यातून निर्माण होतो.

नाट्य अभिनेत्या सारखे स्वातंत्र्य असलेला Agentic AI डोईजड झाल्यास काय होवू शकते?

स्वयं निर्णय क्षमतेचा ‘गैरवापर’ Agent AI करू शकतो का ?

या प्रश्नाचे उत्तर ‘वापर करू शकतो व तो गैर असेल ही किंवा नाही असे संदिग्ध द्यावे लागेल.

जसे वर नमूद केल्याप्रमाणे नाट्यकलाकार संहितेतील संवादां व्यतिरिक्त संवाद ऐन प्रयोगावेळी Addition स्वरूपात घेवू शकतो आणि त्याचा परिणाम नाटकाला किंवा प्रसंगाला उभारी देणारा असू शकतो किंवा नाटकाला भरकटवणारा ही असू शकतो. हे भरकटवणे disastrous ही असू शकते . म्हणजे समजा एखादा हल्ल्याचा प्रसंग रंगवताना नटाने समोरील नटास गंभीर दुखापत केली तर?

AI चा दुसरा प्रकार Assistant AI आहे. हा Assistant AI एखाद्या सिने कलाकारा सारखा असतो.

 2. Assistant AI: सिनेकलाकारा सारखा दिग्दर्शका च्या सूचने बरहुकूम काम करतो

Assistant AI ही एक अशी AI प्रणाली आहे जी मानवी वापरकर्त्यांना त्यांच्या कार्यांमध्ये मदत करते. ही प्रणाली मानवी हस्तक्षेपावर अवलंबून असते आणि ती वापरकर्त्यांच्या आदेशांनुसार कार्ये करते. दिग्दर्शक जसा सूचना देईल तसे सिने नट कार्य करतो तसेच Agent AI वापरकर्त्याच्या सूचने बरहुकूम सांगितले तेवढे काम करून मोकळा होतो. अमूक गाणं ऐकव म्हटलं की तो ऐकवतो.  स्वयं निर्णयाची क्षमता त्याच्याकडे नसते.

 काही मातब्बर सुप्रसिद्ध वा नावाजलेले‌ सिनेनट स्वयंनिर्णय घेत ही असतात पण ते खरंतर व्यावसायिक नितीला धरून नाही. वरील उदाहरणावर त्यांचा आक्षेप ही असू शकतो पण केवळ विषय सहजपणे समजावा या दृष्टीने ही उदाहरणे दिली आहेत हे त्यांनी समजून‌ घ्यावे

 Assistant AI सिस्टीममध्ये खालील वैशिष्ट्ये असतात:

-सहाय्यक:  

Assistant AI ही वापरकर्त्यांना त्यांच्या दैनंदिन कार्यांमध्ये मदत करते. ती वापरकर्त्यांच्या आदेशांनुसार कार्ये करते. Shot by shot व schedule मधे‌ सिने नट ही काम करत असतात.

– मार्गदर्शक:

 ही प्रणाली वापरकर्त्यांना माहिती पुरवते, सूचना देते आणि त्यांना योग्य निर्णय घेण्यास मदत करते.

– अवलंबित्व: 

Assistant AI ही मानवी आदेशांवर अवलंबून असते. ती स्वतःच निर्णय घेऊ शकत नाही. सिने कलाकारांना ही बरेच दा पूर्ण संहिता माहित नसते त्यामुळे दिग्दर्शकांच्या सूचना पालन करून shot देणे एवढेच त्याच्या हाती असते.

उदाहरण: व्हॉइस असिस्टंट्स जसे की Siri, Google Assistant, जे वापरकर्त्यांच्या आदेशांनुसार माहिती शोधतात, रिमाइंडर सेट करतात आणि इतर कार्ये करतात.

3. मूलभूत फरक

| वैशिष्ट्य            | Agentic AI   |     Assistant AI |

|—————— |——————-|——————————-

| स्वायत्तता        | स्वतःच निर्णय घेते | मानवी आदेशांवर अवलंबून |

| निर्णयक्षमता    | जटिल निर्णय घेऊ शकते |  आदेशांनुसार कार्य 

| उद्देश             | विशिष्ट लक्ष्ये साध्य करणे | वापरकर्त्यांना मदत

| अनुप्रयोग         | स्वयंचलित ड्रायव्हिंग, रोबोटिक्स | व्हॉइस असिस्टंट्स, चॅटबॉट्स |

4. निष्कर्ष

Agentic AI आणि Assistant AI हे दोन्ही AI प्रणाली वेगवेगळ्या उद्देशांसाठी वापरल्या जातात. Agentic AI ही स्वायत्त आणि निर्णयक्षम असते, तर Assistant AI ही वापरकर्त्यांना मदत करण्यासाठी डिझाइन केलेली असते. या दोन्ही प्रणालींमधील मूलभूत फरक समजून घेतल्यास, आपण त्यांचे योग्य अनुप्रयोग निवडू शकतो आणि त्यांचा प्रभावीपणे वापर करू शकतो. 

जसे नाट्य कलाकार सिनेमात येवून काम करतात तसे Agent AI हे Assistant AI क्षेत्रात येवून काम करत नाहीत हे दिलासा दायकच म्हणावे लागेल. 

Robot doing an act on stage
Imaginary picture of a Robot performing on a stage 

Leave a Comment