
हृतिक रोशनचं दिग्दर्शनात पहिलं पाऊल – आगामी ‘क्रिश’चं दिग्दर्शन हृतिक रोशन करणार
बॉलिवूडमधील सुपरस्टार हृतिक रोशन आता नव्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे – एक दिग्दर्शक म्हणून! त्याच्या होम प्रोडक्शन अंतर्गत तयार होणाऱ्या आगामी ‘क्रिश’ चित्रपटाचे दिग्दर्शन स्वत: हृतिक करणार आहे, अशी अधिकृत घोषणा नुकतीच झाली आहे.
‘क्रिश’ मालिकेतील हा चौथा चित्रपट असणार आहे आणि प्रेक्षकांची उत्सुकता आधीच शिगेला पोहोचली आहे.
हृतिक च्या अभिनय कारकिर्दीची झलक:
हृतिकने 2000 साली ‘कहो ना प्यार है’ या गाजलेल्या चित्रपटाद्वारे पदार्पण केले. त्याच्या नृत्यकौशल्याने, देखण्या व्यक्तिमत्वाने आणि अभिनयातील सघनतेने तो लगेचच तरुण वर्गाचा लाडका झाला. विशेषत: तरूणींमधे त्यांची लोकप्रियता जास्त होती.
बाॅलिवूड वर अधिराज्य करणार्या तीन खानांना ( सलमान, शाहरूख व आमीर) शह देणारा नवा तारा अशा भावनेने काही लोक हृतिक कडे पहात होते.
हृतिक रौशन ची अभिनय कारकिर्द बहरत गेली. ‘कोई मिल गया’, ‘धूम 2’, ‘जोधा अकबर’ ,’अग्निपथ‘ आणि ‘वॉर’ यांसारख्या अनेक यशस्वी चित्रपटांनी त्याचे स्टारडम अधिकच भक्कम केले.
मात्र, गेल्या काही वर्षांत ‘मोहनजोदारो’, ‘विक्रम वेधा’ किंवा ‘फायटर’ सारखे चित्रपट अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकले नाहीत. हृतिकने नुकतीच वयाची पन्नाशी गाठली आहे. नव्या पिढीचे अनेक कलाकार बॉलिवूडमध्ये आता लोकप्रिय ठरू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर त्याने अभिनयाच्या पलीकडे पाहायला सुरुवात केली असावी, हे नक्की.
मी मुळात दिग्दर्शकच आहे असे हृतिक चे म्हणने
हृतिक प्रसिद्ध अभिनय प्रशिक्षक किशोर नमित कपूर यांच्याकडे अभिनयाचे धडे घेत होता पण त्याच वेळी तो आपले वडील दिग्दर्शक राकेश रॏशन यांच्या हाताखाली दिग्दर्शनाचे धडे ही घेत होता.
एखादा सीन आपल्या स्वतंत्र पद्धतीने visualise करण्याची सवय हृतिकला तेंव्हा होती. एक आधीच चित्रित झालेल्या सीन बद्दल आपले वेगळे विचार दिग्दर्शक राकेश रोशन यांना पटवून सांगून त्यांना तो सीन पुन्हा चित्रित करण्यास हृतिकने राजी केले होते.
स्वतः अभीनित केलेल्या ‘क्रिश’ सिनेमाची फ्रँचाईजीचे हृतिकच्या करिअरमध्ये खास स्थान आहे. त्याचे वडील राकेश रोशन यांनी आधीचे सर्व भाग दिग्दर्शित केले होते. परंतु यावेळी हृतिक स्वतः दिग्दर्शनाची सूत्रं हाती घेतोय, याचा अर्थ केवळ कथा सांगण्याच्या पद्धतीत बदल नाही, तर आपल्या एकूणच कलात्मक दृष्टिकोनालाही तो विस्तार देऊ पाहतोय.
दुसरीकडे, त्याच्या अभिनय कारकिर्दीतील अलीकडच्या अपयशाने निर्माण झालेली ‘रिकामी’ जागा कदाचित दिग्दर्शनातून भरून काढण्याचा प्रयत्न ही असू शकतो.
हृतिकचा नवा अध्याय – अपेक्षा आणि आव्हानं
दिग्दर्शन ही एक अत्यंत जबाबदारीची आणि व्यापक प्रक्रिया आहे. स्क्रिप्ट, अभिनय, टेक्निकल टीम यांचं एकत्रित नियोजन आणि दृश्य मांडणी यासाठी केवळ अनुभव नाही, तर अंतर्मुखतेची गरज असते. हृतिककडे अभिनयाचं प्रचंड अनुभवसंपन्न भांडार आहे. प्रश्न एवढाच आहे – तो अनुभव हृतिक दिग्दर्शनात कितपत प्रभावीपणे उतरवू शकतो?
तुम्हाला वाटतं का की हृतिकचं दिग्दर्शनाकडे वळलेलं हे योग्य पाऊल आहे? की त्याने अभिनयातच अजून भरपूर द्यायचं बाकी आहे? तुमचं मत खाली कॉमेंटमध्ये नक्की कळवा!