Open AI वर New York Times ने टाकला चोरीचा खटला : Fair Use चा मुद्दा चर्चेत
![]() |
Judge at cour:AI pic |
OpenAI च्या ‘फेअर यूज'( fair use)धोरणाच्या मागणीवर अमेरिकेत चर्चा
न्यूयॉर्क टाईम्स आणि इतर कंपन्यांनी OpenAI विरुद्ध कॉपीराइट भंगाचे खटले दाखल केले आहेत. या पार्श्वभूमीवर अनधिकृत गोटातील बातमी अशी आहे की OpenAI कंपनी, जी सॅम अल्टमनच्या नेतृत्वाखाली आहे, ती अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना विनंती करत आहे की त्यांनी “फेअर यूज” या कायद्याचे स्पष्ट नियम लागू करावेत. न्यूयॉर्क टाईम्स आणि इतर कंपन्यांनी OpenAI विरुद्ध कॉपीराइट भंगाचे खटले दाखल केले आहेत.
काय आहे Open AI चा Fair Use प्रस्ताव
हा प्रस्ताव अमेरिकेच्या व्हाईट हाऊसच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे. हे प्रस्ताव अशा वेळी समोर आले आहेत जेव्हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चे नियमन करण्यासाठी अमेरिकेत चर्चा चालू आहे. या दस्तऐवजात, OpenAI ने असे म्हटले आहे की जर AI प्रशिक्षणासाठी कॉपीराइटेड सामग्री वापरण्यावर बंदी आली, तर अमेरिकेसाठी चीन (ज्याला कंपनी PRC – पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना म्हणते) सोबत स्पर्धा करणे अशक्य होईल.
OpenAI च्या म्हणण्यानुसार, “जर चीनमधील AI डेव्हलपर्सना माहिती मिळण्यास कोणताही अडथळा नसेल आणि अमेरिकन कंपन्यांना फेअर यूजच्या हक्कांपासून वंचित ठेवले गेले, तर AI स्पर्धा संपुष्टात येईल.यामुळे अमेरिका हरते आणि अमेरिकन AI चे यशही धोक्यात येते.”
प्रकाशक व लेखकांचा तीव्र विरोध
OpenAI चा असा दावा आहे की कॉपीराइटेड सामग्री वापरल्याने नवकल्पनांना चालना मिळेल आणि ज्ञानप्राप्ती वाढेल. पण प्रकाशक याला विरोध करत आहेत, कारण त्यांच्या लेखनाचा AI प्रशिक्षणासाठी विनापरवानगी वापर केला जातो आणि अनेकदा हे AI मॉडेल्स त्याच लेखांचे कॉपी-पेस्ट उत्तर देतात.
OpenAI ने आपल्या प्रस्तावात “फेअर यूज डॉक्ट्रिन” चा नव्याने अर्थ लावण्याचा प्रयत्न केला आहे. ही एक कायदेशीर संकल्पना आहे, जी विशिष्ट परिस्थितींमध्ये कॉपीराइटेड सामग्रीचा मर्यादित वापर करण्यास परवानगी देते, जसे की लेखांमध्ये कोटेशन. पण OpenAI चा असा युक्तिवाद आहे की कॉपीराइटेड सामग्रीचा वापर करण्यास मज्जाव करणे ही एका अर्थी”राष्ट्रीय सुरक्षेची” समस्या आहे कारण स्पर्धक देश चीन आपल्या AI वर कुठलेही बंधन लादत नाही आहे.
“फेअर यूज डॉक्ट्रिनचा AI साठी वापर हा केवळ अमेरिकेच्या स्पर्धात्मक क्षमतेचा मुद्दा नाही, तर तो राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे,” असे OpenAI ने म्हटले आहे. “चीनच्या DeepSeek यासारख्या तंत्रज्ञानाच्या झपाट्याने होणाऱ्या प्रगतीमुळे अमेरिकेचा AI मधील आघाडीचे स्थान निश्चित होत नाही.”
दुहेरी भूमिका?
OpenAi नेच केलेत चीन च्या Deepseek AI वर चौर्यकर्माचे आरोप
Ars Technica ने नमूद केल्याप्रमाणे, OpenAI ने पूर्वीच DeepSeek वर आपली माहिती विनापरवानगी वापरल्याचा आरोप केला आहे. पण या प्रस्तावात OpenAI ने हा मुद्दा सोयीस्करपणे उल्लेखलेला नाही, कारण ते स्वतः या मुद्द्यावर गोंधळात आहेत.
“फेडरल सरकार अमेरिकन नागरिकांना AI कडून शिकण्याची मोकळीक देऊ शकते, आणि AI क्षेत्रातील आघाडी गमावण्याचे टाळू शकते, जर अमेरिकन AI मॉडेल्सना कॉपीराइटेड साहित्य शिकण्याची संधी मिळाली तरच ही आघाडी साध्य होवू शकते” असे OpenAI च्या प्रस्तावात म्हटले आहे.
ट्रम्प यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष
ट्रम्प OpenAI च्या या युक्तिवादाला पाठिंबा देतील की नाही, हे स्पष्ट नाही. पण जर अल्टमन आणि त्यांचे सहकारी ट्रम्प यांना मनधरणी करून पाठिंबा मिळवण्यात यशस्वी झाले, तर त्याचा मोठा फटका जागतिक कॉपीराइट धारकांना बसू शकतो.