Avinash Ghodke

Screenwriter and Lyricist with 20 years of experience in Bollywood and Marathi cinema.His creative writing examines the contradictions of lived experience, while his journalism uncovers humanism beneath headlines.

“द्राक्षावरच्या सालीसारखी”- चापुन चोपुन बसणारी ‘Ladies Fitted’ Jeans सर्वप्रथम कुणी व कशी बनवली? जाणून घ्या

Historic picture of Gold mine workers wearing Jeans - Pic Courtesy Google
Gold mine workers wearing Jeans -pic Courtesy Google

कोण होती ग्लोरिया वॅंडरबिल्ट‌?

International fashion designer Gloria Vanderbilt file pictures courtesy Google

20 फेब्रुवारी १९२४ रोजी अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात जन्मलेल्या ग्लोरिया वॅंडरबिल्ट, या एका अमेरिकन उद्योगपतीच्या कन्या होत्या,

लहानपणापासूनच त्यांना वेशभूषा कलेची आवड‌ होती. अमेरिकेत हैलोवीन सणाच्या पार्टी साठी विचित्र पोशाख करून‌ जाण्याची प्रथा आहे. या पार्ट्यांना जाताना ग्लोरिया चे पोशाख लक्षवेधी ठरत. आपल्या वक्तृत्व कलेसाठी ती प्रसिद्ध होती.ग्लोरिया पुढे प्रसिद्ध मॉडेल झाली. आपले कपडे डिझाईन करताना ती त्यांना personal touch देई. वयाच्या तिसाव्या वर्षी एका प्रसिद्ध मासिकाने तिचे नाव जगातील सुंदर स्त्री मॉडेल्स च्या यादित छापले होते.

Jeans प्रचारासाठी कल्पक घोषवाक्य

  Gloria यांनी वयाच्या ५३ व्या वर्षी म्हणजे १९७७ मध्ये भारतीय वंशाचे हॉंगकॉंग स्थित व्यापारी मोहन मुरजानी यांच्याबरोबर जगातील पहिल्या महिलांसाठी फिटेड जीन्सची निर्मिती केली. ही जीन्स महिलांच्या शरीराला अगदी “द्राक्षाच्या सालीसारखी” ( Like a skin on grape) बसते असे कल्पक घोषवाक्य त्यांनी या जीन्सच्या प्रचारासाठी वापरले.
जगातील महिलांना stretch Jeans च्या रूपात त्यांची स्वतःची fashion statement देणार्या Gloria Vanderbilt यांचे 2019 रोजी वयाच्या ९५ व्या वर्षी न्यूयॉर्क येथे निधन झाले.
Gloria Vanderbilt and Mohan Murjani Courtesy Google
Gloria Vanderbilt and Mohan Murjani

७० च्या दशकात  रफ-टफ जीन्सचा महिला अनुरूपतेकडे प्रवास

७० च्या दशकात, जेव्हा “एक-स्टाईल-सर्वांसाठी” ONE STYLE FITS ALL जीन्सचे प्रचलन होते, तेव्हा हाँगकाँगमध्ये जन्मलेले भारतीय वस्त्रोद्योगी मोहन मुरजानी आणि अमेरिकन सामाजिक व्यक्तिमत्त्व व fashion Icon असलेल्या ग्लोरिया वॅंडरबिल्ट यांनी व्यावसायिक हातमिळवणी करून खास महिलांच्या शरीराला अनुरूप अशा जीन्सची निर्मिती केली. त्यांनी महिलांच्या शरीररचनेला अनुरूप अशा डिझाईनवर भर दिला . घोषवाक्यात दावा केल्या प्रमाणे  महिलांच्या शरीरावर या stretch Jeans अगदी”द्राक्षाच्या सालीसारख्या” चपखल बसत होत्या.

 स्ट्रेच डेनिम कापडाचा चा शोध आणि निवड

अनेक महिने मोहन मुरजानी आणि ग्लोरिया वॅंडरबिल्ट यांनी “स्ट्रेच” असलेल्या डेनिम फॅब्रिकचा  शोध घेतला. त्यांनी इंडिगो (निळा रंग)ची एक विशिष्ट छटा निवडली, जी नंतर क्लासिक ब्लू डेनिम्सचा रंग बनली. त्यांनी हाँगकाँगमध्ये लूम्स स्थापन केले आणि “महिलांसाठी” त्यांच्या शरीरा अनुरूप बनवलेल्या जीन्स बाजारात पाठवण्यास सुरुवात केली.

खास महिलांसाठी ‘ब्रँडेड’ जीन्सची संकल्पना Gloria Vanderbilt fitted ladies jeans

यापूर्वी महिलांसाठी जीन्स  बनत पण त्या महिलांच्या शरीराला अनुरूप नसत. आकार वा pattern  च्या दृष्टीने त्या पुरुषांच्या शरीरासाठी डिझाइन केलेल्या जीन्स सारख्याच असत आणि महिलांना त्या विकत घेऊन त्यात बदल करावे लागत. मोहन मुरजानी आणि ग्लोरिया वॅंडरबिल्ट यांनी ही परिस्थिती बदलण्याचा निर्णय घेतला. त्यांनी महिलांसाठी ब्रँडेड जीन्स तयार केल्या, परंतु त्या प्रीमियम किंमतीत उपलब्ध होत्या. सुरूवातीला या जीन्स च्या किंमती साधारण जीन्सच्या किंमती हून चौपट असत. असे असले तरी या जीन्स ना महिला वर्गाकडून भरभरून प्रतिसाद मिळाला.

जाहिरात मोहिम आणि यश

दिमाखदार व्यक्तीमत्व लाभलेल्या ग्लोरिया वॅंडरबिल्ट यांनी स्वतःच‌ मॉडेल  म्हणून त्यांच्या जीन्स च्या जाहिरात मोहिमेत भाग घेतला. या Best fitted ladies jeans चे ब्रॅण्ड नाव ही Gloria Vanderbilt असे ठेवण्यात आले. जीन्स मधले हे पहिले Designer Label होते .

Gloria Vanderbilt ladies jeans च्या विक्री साठी जीन्सच्या पहिल्या बॅचमध्ये एक लाखाहून अधिक जीन्स होत्या, आणि प्रत्येक जीन्स $३२ मध्ये विकली गेली, जी रॅंगलर किंवा लेव्ही स्ट्रॉसच्या जीन्सपेक्षा जवळपण चार पट जास्त होती. जाहिरातीतील “द्राक्षाच्या सालीसारख्या”  LIKE A SKIN ON A GRAPE या पंचलाइनने महिला ग्राहकांना आकर्षित केले आणि या जीन्स च्या विक्रीने उच्चांक गाठला. ( History of Best fitted ladies jeans)

Fitted ladies jeans ठरली Perfect Market Fit व Best Ladies jeans

‘Ladies Fitted’ jeans ने जीन्स ला उपयुक्त किंवा rough use pants च्या श्रेणीतून Fashionable व Glamorous श्रेणीत आणले

हे सिद्ध झाले की, परफेक्ट मार्केट फिट (PMF) तुम्हाला यशाच्या शिखरावर नेऊ शकते. ग्लोरिया वॅंडरबिल्ट आणि मोहन मुरजानी यांनी केवळ जीन्स निर्माण केल्या नाहीत, तर त्यांनी महिलांच्या फॅशनमध्ये एक नवीन युग सुरू केले. त्यांच्या या नाविन्यपूर्ण संकल्पनेमुळे जीन्स हा केवळ एक रफ-टफ पोशाख न राहता, ती एक फॅशन स्टेटमेंट बनली.

Ladies Fitted jeans

Fitted ladies Jeans ची वैशिष्ट्ये

डिझाईन आणि फिटमधील नाविन्यता

ग्लोरिया वॅंडरबिल्ट आणि मोहन मुरजानी यांनी महिलांच्या शरीररचनेला अनुरूप अशा जीन्सची निर्मिती केली. त्यांनी महिलांच्या कंबर, हिप्स आणि पायांच्या आकाराचा विचार करून जीन्स डिझाइन केल्या. यामुळे महिलांना आरामदायक आणि शैलीपूर्ण जीन्स मिळाल्या. त्यांच्या जीन्समध्ये

  • स्लिम फिट,
  • हाय-वेस्ट
  • फ्लेअर्ड बॉटम्स

सारख्या डिझाईनचा समावेश होता, जे महिलांच्या फॅशनमध्ये एक नवीन ट्रेंड सेट करणारे ठरले.

लक्झरी आणि फॅशन एकत्र

ग्लोरिया वॅंडरबिल्ट स्वतः एक प्रसिद्ध सामाजिक व्यक्तिमत्त्व आणि फॅशन आयकॉन असल्या कारणाने त्यांनी जीन्समध्ये लक्झरी आणि फॅशनचे संयोजन केले. त्यांच्या जीन्समध्ये

  • स्टायलिश स्टिचिंग
  • डिझायनर लेबल्स
  • प्रीमियम  दर्जाचे streach फॅब्रिक्स

चा वापर केला गेला. यामुळे जीन्स केवळ एक साधा पोशाख न राहता, तो एक उच्च फॅशन आयटम बनला. त्यांच्या जीन्सच्या कलेक्शनमध्ये ग्लॅमरस आणि  sofisticated look देण्यावर भर होता.

डिझायनर लेबलचा प्रथमच वापर

Gloria Vanderbilt label of a High fashion brand

मोहन मुरजानी, जे एक यशस्वी व्यापारी होते, त्यांनी ग्लोरिया वॅंडरबिल्टच्या नावाचा वापर करून जीन्सच्या ब्रँडिंग आणि मार्केटिंगमध्ये एक नवीन दृष्टिकोन आणला. त्यांनी “ग्लोरिया वॅंडरबिल्ट”

“Gloria Vanderbilt”

हे नाव त्यांच्या fitted jeans लेबलवर छापले, ज्यामुळे त्या जीन्स एक प्रतिष्ठित ब्रँड म्हणून ओळखल्या गेल्या. ही पद्धत त्यावेळी अत्यंत नाविन्यपूर्ण होती, कारण त्यावेळी डिझायनर लेबल्सचा वापर जीन्समध्ये फारसा केला जात नव्हता.

महिला सशक्तिकरणाचा संदेश

Four girls wearing fitted stretch jeans in a good laugh moment - ai generated picture

ग्लोरिया वॅंडरबिल्ट आणि मोहन मुरजानी यांनी त्यांच्या जीन्सद्वारे महिला सशक्तिकरणाचा संदेश दिला. त्यांच्या जीन्सने महिलांना आत्मविश्वास आणि स्वातंत्र्याची भावना दिली. या जीन्समुळे महिला केवळ घराबाहेरच नव्हे तर कामाच्या ठिकाणी आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये देखील आरामात आणि शैलीपूर्ण वावरू शकत होत्या. त्यांच्या जीन्सने महिलांच्या फॅशनमध्ये एक नवीन मानक निर्माण केले.

Oversized महिलांसाठी प्रथमच जीन्स चा पर्याय

Fitted Jeans या over size महिलांसाठी ही पर्याय असू शकतात हे वैशिष्ट्यपूर्ण धोरण ही जीन्स निर्मिती करताना ठेवण्यात आले‌ व तशा पद्धतीने Over Size Jeans ची जाहिरात ही करण्यात आली. आपल्या over size शरीराचा संकोच न बाळगता महिला प्रथमच या fitted jeans वापरू लागल्या. आपल्या व्यवसायात अशा प्रकारे महिला सशक्तीकरण धोरणाचा अवलंब Gloria Vanderbilt  fitted ladies jeans ने केला. ( History of fitted ladies jeans)

All size Ladies Jeans

फॅशन आणि कार्यक्षमता

ग्लोरिया वॅंडरबिल्ट‌ च्या जीन्स मधे फॅशन आणि कार्यक्षमतेचे योग्य संतुलन होते. जरी या जीन्स स्टायलिश आणि फॅशनेबल असल्या तरी, त्या टिकाऊ आणि आरामदायक देखील होत्या. यामुळे महिलांना दररोजच्या वापरासाठी आणि विशेष प्रसंगांसाठी देखील योग्य अशा जीन्स मिळाल्या.

भारतीय तरुणींची fashion statement

आज संपूर्ण जगात महिलांच्या  fitted ladies Jeans चे वेगवेगळे ब्रांड अस्तित्वात आले आहेत कारण महिलांकडून आशा स्ट्रेच जीन्स ची भरपूर खरेदी होत असते . भारतात ही तरूणींमधे strech fabric च्या fitted ladies jeans लोकप्रिय आहेत. एकाच वेळी casual comfort देणार्या या जीन्स Fashion statement म्हणून ही घातल्या जातात.

A female model wearing a Denim jeans

निष्कर्ष

लेव्ही स्ट्रॉस अँड कंपनीने १९३० च्या दशकात महिलांसाठीही जीन्सची निर्मिती सुरू केली होती पण त्या स्त्री शरीरास अनुरूप नव्हत्या .१९७० च्या दशकात ग्लोरिया वॅंडरबिल्ट आणि मोहन मुरजानी यांनी सुरू केलेल्या महिला जीन्स उत्पादनाने फॅशन इंडस्ट्रीमध्ये एक नवीन आणि वेगळा अध्याय सुरू केला. Gloria Vanderbilt या जीन्स चे Like a Skin on grape हे घोषवाक्य सहजता व  एकरूपता सुचवते जो स्त्री मनाचा स्थाईभाव‌च आहे. (History of fitted ladies jeans)

Pair of Denim jeans in wooden table at window

FAQ

Fitted Ladies Jeans म्हणजे काय?

Fitted Ladies Jeans म्हणजे महिलांच्या बांध्यानुसार आकार घेणार्या जीन्स. या जीन्स महिलांच्या कंबर, हिप्स आणि पायांच्या आकारानुसार डिझाइन केलेल्या असतात आणि त्यात स्ट्रेच फॅब्रिक वापरले जाते, ज्यामुळे त्या शरीराला घट्ट बसतात.

Fitted Ladies Jeans चा शोध कोणी लावला?

Fitted Ladies Jeans ची निर्मिती अमेरिकन फॅशन आयकॉन ग्लोरिया वॅंडरबिल्ट आणि भारतीय वंशाचे हाँगकाँग स्थित उद्योगपती मोहन मुरजानी यांनी १९७७ मध्ये प्रथम केली

ग्लोरिया वॅंडरबिल्ट कोण होत्या?

ग्लोरिया वॅंडरबिल्ट या २० फेब्रुवारी १९२४ रोजी न्यूयॉर्क येथे जन्मलेल्या अमेरिकन उद्योगपतीच्या कन्या होत्या. त्या पुढे प्रसिद्ध मॉडेल व फॅशन आयकॉन आणि उद्योजिका ही झाल्या. त्यांनी १९७७ मध्ये मोहन मुरजानी यांच्यासोबत जगातील पहिल्या खास महिलांसाठी अशा फिटेड जीन्स तयार केल्या. त्यांचे २०१९ मध्ये वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झाले

मोहन मुरजानी कोण आहेत?

मोहन मुरजानी हे हाँगकाँगमध्ये जन्मलेले भारतीय वस्त्रोद्योगी आणि यशस्वी व्यापारी आहेत. त्यांनी ग्लोरिया वॅंडरबिल्ट यांच्यासोबत भागीदारी करून महिलांसाठी पहिल्या फिटेड जीन्सची निर्मिती आणि ब्रँडिंग केली.

Like a skin on a grape” हे घोषवाक्य का वापरण्यात आले?

हे घोषवाक्य (मराठीत “द्राक्षाच्या सालीसारखी”) या जीन्सच्या प्रचारासाठी वापरण्यात आले कारण या जीन्स महिलांच्या शरीराला अगदी द्राक्षाच्या सालीप्रमाणे चपखल आणि घट्ट बसत होत्या. या पंचलाइनने महिला ग्राहकांना मोठ्या प्रमाणात आकर्षित केले.

या जीन्सची किंमत किती होती?

सुरुवातीला Gloria Vanderbilt fitted ladies jeans ची किंमत साधारण जीन्सच्या किंमतीच्या जवळपास चौपट होती. जीन्सच्या पहिल्या बॅचमधील प्रत्येक जीन्स $३२ मध्ये विकली गेली, जी रॅंगलर किंवा लेव्ही स्ट्रॉसच्या जीन्सपेक्षा जवळपास चार पट जास्त होती.

हे ही वाचा :

▶️Girija Oak चा viral blue saree look -Fashion analysis

▶️Marathi Box Office – प्रथमच देशाच्या एकूण collection मधे मराठी चित्रपटांचा 4% वाटा – सहा महिन्यांत 250+ कोटींची ‘सैराट घोडदौड’

▶️Old Monk ban ही बातमी किती खरी आहे? जाणून घ्या सत्य काय आहे

▶️Old Monk Rum चं जनरल डायरशी जुळणारं नातं.. इतिहास जाणून घ्या

About The Author

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment