मनोजकुमार एक महान दिग्दर्शक : पंतप्रधान लालबहादूर शास्त्रींच्या सांगण्यावरून बनवला होता पूरब और पश्चिम सिनेमा

 

Collage of a close up and a poster
मनोजकुमार व त्यांच्या प्रसिद्ध पूरब और पश्चिम चित्रपटाचे पोस्टर 

मनोज कुमार: अर्थात भारत

एका मोठ्या बिग बजेट चित्रपटात कॉमेडी च्या नावावर जेष्ठ अभिनेते मनोज कुमार यांची टिंगल उडविण्याचा प्रकार घडला होता. पिढ्या बदलतात पण संस्कृतीचे अशा प्रकारे बदलणे धक्कादायक होते. मनोजकुमार हा काही साधा माणूस नव्हता . त्यांची कारकीर्द stardom manage केलेल्या लोकांना कशी कळावी हा ही प्रश्नच आहे. अभिनेते म्हणून मनोज कुमार फार ग्रेट श्रेणीत नसले तरी दिग्दर्शक म्हणून त्यांनी भारतीय चित्रपट सृष्टीला जे योगदान दिले आहे ते खूप अनमोल व अमीट आहे. त्यांच्या चित्रपटांची गाणी व ती चित्रित करण्याची त्यांची शैली कलात्मक व तांत्रिक दृष्ट्या काळाच्या पुढची होती. 

स्वतः ची अनोखी दिग्दर्शन शैली : सुभाष घई ही प्रभावित 

चित्रिकरण शैलीला तांत्रिक भाषेत taking style म्हणतात. त्यांच्या या taking style चा प्रभाव मला प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घईंच्या कामात जाणवायचा. Tweeter वर एकदा मी त्यांना तसे विचारण्याचे धाडस ही केले पण उत्तर मिळाले नाही. आज घईंनी त्यांच्या श्रद्धांजली संदेशात मात्र ते मान्य केलेले वाचले आणि मला माझे उत्तर मिळाले.

 
मनोज कुमार यांचा शहीद भगतसिंग यांच्यावरील चित्रपटाचे एक गीत त्यांनी‌ इतके प्रभावी पणे चित्रित केले होते की महान दिग्दर्शक सत्यजित रे यांनी‌ त्यांचे अभिनंदन केले होते.  पूरब और पश्चिम या चित्रपटासाठी त्यांनी स्टूडीओ बाहेर चित्रिकरण करून वास्तविक लोकेशन वर चीत्रिकरणाचा नवा मार्ग भारतीय चित्रपट सृष्टीला दाखवला . स्वतः एका स्टूडिओचे मालक असूनही व्ही शांताराम यांनी मनोजकुमारजींच्या outdoor shooting चे कौतुक केले होते.

भारत नावाचा नायक 

मनोज कुमार आपल्या चित्रपटात नायक असत व या नायकाचे नाव भारत असे. आपल्या चित्रपटात नायिकेला स्पर्श न करण्याची मनोजकुमार यांची नैतिक भूमिका टोकाची वाटली तरी त्यांच्या भारत या नायकाला ती शोभुन दिसे. मनोजकुमार जेंव्हा कलाकारांना cast करत तेंव्हा मोठे मोठे कलाकार ही त्यांना भूमिका,मानधन,कथा असले प्रश्न विचारत नसत कारण आपण मनोजकुमार यांच्या चित्रपटात काम करतोय एवढेच त्यांच्यासाठी महत्वाचे असे. आपल्या चित्रपटांतून देशप्रेम सांगणार्या मनोजकुमार यांची देशप्रेमाने ओतप्रोत भरलेली गाणी आजही स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिनी आवर्जून वाजतात. देश प्रेम सांगणारा ‘पूरब और पश्चिम ‘ हा त्यांचा एक महत्त्वाचा चित्रपट.

पूरब और पश्चिम आणि पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री 

पूरब और पश्चिम हा चित्रपट मनोज कुमार यांनी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या विनंतीवरून बनवला होता. दिल्ली मधील एका छोट्या भेटीत पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी मनोज कुमार यांना ६०च्या  दशकातील brain drain समस्येवर चित्रपट बनवण्याचे सुचवले होते. पश्चिमेकडे आकर्षित झालेली सुशिक्षित व‌ कर्तृत्ववान पीढी पुन्हा भारतात यावी असा संदेश देणारा चित्रपट मनोजकुमार यांना लिहायचा होता. खुद्द पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी दिलेल्या आदेशामुळे ते भारावून गेले होते. दिल्ली ते मुंबई या ट्रेनच्या प्रवासातच त्यांनी ‘पूरब और पश्चिम ‘ चित्रपटाची पटकथा लिहून काढली.

बहुआयामी मनोजकुमार व सिने तंत्रावर हुकूमत 

 मनोजकुमार बहूआयामी होते अभीनय, दिग्दर्शन, लेखन व सर्वात किचकट असे संकलन ही ते स्वतः करीत. पूरब और पश्चिम चित्रपटासाठी त्यांनी आपले कौशल्य पणाला लावले .अतीशय वेगळ्या धाटणीचा हा चित्रपट त्या काळात बनणार्या चित्रपटांत आणि अगदी आजच्या चित्रपटांतही उठून दिसतो. Camera चं हे असलं अफलातून staging ते कुठे शिकले असतील . त्यांच्या पुढे कुणाचा आदर्श होता. झर्रकन pan होणारा camera. झप्पकन चेहर्यावर zoom होणारी लेन्स कधी Russian frames कधी low angle. कधी sound overlapping.  या सिनेमात विचारांचा  कल्लोळ होता जो वेगवान दृष्य शृंखलेतून मांडला होता. हा वेग ऐहिक उन्नती साठी  एका पीढीचे  हपापलेपण सूचित करित होता. 

एका गाण्यात शेतात मळणीच्या खळावर उभा मनोजकुमार यांचा शांत हसरा भारत मात्र ‘खरे सुख आपल्या देशात आहे’ असं सांगत “पुरवा सुहानी आयी रे ” गात असतो आणि यावेळी भारताच्या मातीची धूळ हवेत उडताना दिसत रहाते.

0 thoughts on “मनोजकुमार एक महान दिग्दर्शक : पंतप्रधान लालबहादूर शास्त्रींच्या सांगण्यावरून बनवला होता पूरब और पश्चिम सिनेमा”

Leave a Comment