Agneepath 2 : फक्त नावात साम्य| करण मल्होत्रा चे वेगळे Vision


सह संवाद लेखक अविनाश घोडके व दिग्दर्शक करण मल्होत्रा

अग्निपथ 2: same bottle but new wine

परवा टी. व्ही . वरअग्निपथ बघून एक परिचित व्यक्ती म्हणाले ..” अरे पूर्ण वेगळाच केलाय सिनेमा .. मग नाव तरी जुनं का ठेवलं ?” सिनेमाचं नाव काय असाव हा खरंतर माझ्या अखत्यारीतला विषय नव्हता . मी नुसताच हसलो .


DOP RAVI K CHANDRAN

रवी के चंद्रन या सुप्रसिद्ध छायाचित्रकारांनी निम्म्या अग्निपथ च चित्रीकरण केलं पण पुढे त्यांनी अग्निपथ काही कारणास्तव सोडला. हेच रवी के चंद्रन एकदा सेट वर ब्रेक मधे गप्पा मारत बसले होते. ते सांगत होते …”साउथ मधे रवी चंद्रन नावाचा एक मोठा स्टार नट आहे . या देखण्या स्टार नटावर लोकं जीव ओवाळून टाकतात .माझं नाव ही या नटाच्या प्रभावामुळेच आई वडिलांनी ‘ रवी चंद्रन’ ठेवल असावं. पण जेव्हा जेव्हा मी लोकांना माझं नाव रविचंद्रन असं सांगायचो तेव्हा ते मला हसायचे कारण मी रविचंद्रन सारखा दिसायला देखणा नव्हतो . शेवटी मी रवी चंद्रन नावामध्ये K घुसडून टाकला आणी रवी के चंद्रन झालो .” आज रवी k चंद्रन हे एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे छायाचित्रकार आहेत.

करण मल्होत्रा आणि करेन मल्होत्रा

अशीच नावाची एक दुसरी गम्मत … अग्निपथ मधे काली (प्रियांका चोप्रा) एका ठिकाणी अभिमानाने आपल पूर्ण नाव; मराठीआडनावासकट उच्चारते असं दृश्य मूळ संहीतेतच होतं. पियुष मिश्रा हे वाराणसीचे असल्यामुळे मराठी समाज संस्कृतीशी अपरिचित होते त्यांनी एक मराठी आडनाव कालीला दिले होते व कालीच्या तोंडून ते वदवले ही होते
. प्रत्येक गोष्ट तर्काने पडताळण्याची मला सवय आहे
त्याप्रमाणे मी दिग्दर्शक करण मल्होत्रा ला काली ही एका वारांगणेची मुलगी आहे तसेच आपण तिच्या आईच्या पूर्व आयुष्याचा काहीही संदर्भ देत नाही आहोत
अशी आठवण करून दिली. पुन्हा ही काली आपल्या आई कडच आडनाव सांगतेय की वडिलांकडच …वडिलांकडच असेल तर वडील कोण ?? यावर करण म्हणाला ” ऑडियंस कोउतना सोचने को वक्त ही नही मिलेगा! ” मी पुन्हा दुसरी शंका मांडली ” कोई ऑब्जेक्शन आया तो ??” यावर करण म्हणाला ” विवाद नही होगा ऐसा कोई नाम दे
सकते है तो देखो ..लेकिन काली का पुरा नाम आना जरुरी है ” पुढे तो असही म्हणाला “औरते तो मजबुरी से उस धंदे मे जाती है … नाम का क्या है …काली का नाम ‘ काली मल्होत्रा’ भी हो सकता है !!”..शंकेचं निरसन झाले होते. पुढे अग्निपथ चे चित्रीकरण ही सुरू झाले.

काही महिन्यांनी प्रसिद्ध रियालिटी शो ‘बिग-बॉस’ सुरू झाला. बिग बॉस च्या घरात भारतीय वंशाची पोर्न आर्टिस्ट ‘सनी लिओन’ ने प्रवेश केला तेव्हा तिची चर्चा होऊ लागली .
मी सहज विकिपीडिया वर जावून तिची माहिती बघितली. भारतीय वंशाच्या सनी लिओन च खरं नाव ‘ करेन मल्होत्रा ‘ आहे अशी माहिती वाचली आणि मला करण मल्होत्रा चं वाक्य आठवलं. …” नाम
का क्या है …काली का नाम काली मल्होत्रा भी हो सकता है ” . विशेष म्हणजे करण मल्होत्रा च्या नावाशी हुबे हुब साधर्म्य सांगणार नाव आहे सनी लिओन च मूळ नाव .
..केवळ “करेन” मधल्या र वरच्या मात्रेचाच काय तो फरक ..खरच ..नाम का क्या है?

Story plot and screenplay

एकाच कथाकल्पनेवर वेगवेगळ्या पटकथा लिहिल्या जावू शकतात व त्या व्यावसायिक दृष्ट्या यशस्वी होवू शकतात हे अग्नीपथ ने पुन्हा एकदा सिद्ध केलं. सिने लिखानातली ही अतीशय interesting अशी तांत्रिक बाब आहे. यात कथेला पाया सारखे वापरून वरील इमारत पूर्णपणे वेगळी बांधली जाते. पात्र व परीवेष यांमधे आमुलाग्र असा बदल करून एक वेगळा चित्रपट बनवला जावू शकतो. पात्रांच्या भावनिक ऊर्जा त्याच रहातात पण ती पात्रं वेगळी असतात. कथा घडते तो माहोल ही वेगळा असतो. सामाजिक स्तर व संदर्भ बदलले जातात. नुकतेच एका मुलाखतीत प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी त्यांनी त्यांच्या यशस्वी अशा ‘शिवा’ या चित्रपटाची पटकथा ब्रूस ली च्या Enter the dragon या चित्रपटाच्या कथानकाचा पाया वापरून लिहीली असे सांगितले. दोन्ही चित्रपटांतील पात्रं, संदर्भ व परीवेष पूर्णतः भिन्न आहेत व दोन्ही चित्रपट प्रभाविपणे आपले कथानाट्य दर्शकांपर्यंत पोहोचवतात. यात पाया उचलताना कथानकाचे महत्वाचे टप्पे आपण जसेच्या तसे उचलत नाही याची काळजी पटकथाकाराणे घेणे गरजेचे असते अन्यथा तो copyright उल्लंघनाचा विषय होवू शकतो. अग्निपथ 2 च्या बाबतीत मात्र लेखकांना याबाबत मुभा होती कारण अग्निपथ 1 या चित्रपटाचे निर्मिती ही धर्मा प्रॉडक्शन्सनेच केली होती. असे असले तरी करण मल्होत्राने मूळ चित्रपटापेक्षा पूर्णपणे वेगळा चित्रपट तयार केला ही त्याच्या directorial vision ची कमाल आहे.

अविनाश घोडके /सह संवाद लेखक / अग्निपथ

Leave a Comment