Agneepath 2 चा दिग्दर्शक करण मल्होत्रा ने Hollywood ची Mighty Villain ही संकल्पना कांचा या खलनायका साठी वापरली होती. हीरोची ताकद या Mighty खलनायकापुढे कमी पडल्यामुळे हीरो चा संघर्ष अजून ज्वलंत होतो..

AGNEEPATH BTS – लेखन प्रक्रिया
Dharma Productions चे office तेंव्हा खार पश्चिम ला होते. मी Agneepath चे सह संवाद लेखन करत होतो. आधी तयार असलेल्या पहिल्या ड्राफ्ट वर मी स्वतंत्र पणे काम करत होतो. दिग्दर्शक करण मल्होत्रा ने मला पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. Shooting dates जवळ येत होत्या. एकीकडे लोकेशन visits तर कधी song recording , करणं ची धावपळ वाढली होती. अशातही संध्याकाळी वेळ काढून माझ्या केलेल्या कामाचा आढावा घेई. एकदा आम्ही चर्चा करत बसलो होतो.
सच्चिदानंद – कांचा चे अध्यात्म
अग्निपथ च्या संवादा मधला “सच्चिदानंद” शब्द वाचून करण ने सहज विचारले “सच्चिदानंद”मतलब क्या अविनाशजी ?”धर्मा प्रॉडक्शन्स च्या केबिन मधे होमियोपथी च्या पांढर्या गोळ्यांना करणने तळहातावर हलकेच ओतले… करण च्या या अनपेक्षित अध्यात्मिक प्रश्नाने मी जरा आश्चर्यच चकित झालो. करण मल्होत्रा ला थोडक्यात उत्तर अपेक्षित होतं. मी क्षणात विचार करून म्हटलं “Bliss!! Eternal joy ..आनंद जो कभी खत्म नही होता ” तळहातावरून टेबलावर घरंगळलेली पांढरी गोळी हिकमतीने आडवत तो म्हणाला “अच्छा..!” आता गोळ्या तोंडात टाकत त्याने दिग्दर्शकाच बेअरिंग सोडलं.. दिलखुलास मिश्कील हसत म्हणाला ” मैं तो कांचा हुं..!!”अध्यात्मिक शब्दाचा आपण क्षणात अर्थ सांगितला याचा ‘विजय’ भाव माझ्या चेहर्यावर होताच.
खलनायकाच्या प्रेमात पडलेला दिग्दर्शक
मैं तो कांचा हूं! असे करण एका दिग्दर्शकाच्या नजरेतून म्हणाला होता. कांचाचे Character design उत्तम वठले होते. कांचाचे Costumes त्याचा Prosthetic Makeup आणि संजय दत्त चा swag या मिश्रणाने या खलनायकाचा एक unique dark AURA निर्माण झाला होता. दिग्दर्शकाला आपल्या सिनेमातील शक्तीशाली व जीवंत पात्र आवडणे हे साहजीकच आहे. ” जेवढा खलनायक मोठा करावा तेवढा सिनेमा नाट्यमय होतो” ही क्लुप्ती Hollywood दिग्दर्शकांनी खूप वेळा वापरली आहे. Bollywood मधे ही रमेश सिप्पी यांच्या शोले व शान या चित्रपटांचे खलनायक गब्बर व शाकाल असेच MIGHTY VILLAIN होते. नुकत्याच गाजलेल्या धुरंधर चित्रपटातील खलनायक ही वास्तववादी असला तरी शक्तिशाली होता. दिग्दर्शक जेंव्हा मनातून खलनायकावर प्रेम करू लागतो तेंव्हा खरतर तो नायकाच संघर्षच तीव्र करत असतो.
प्रेमकथांचे दिग्दर्शक आपल्या नाईकांच्या प्रेमात पडतात पण सूड कथेचा हा दिग्दर्शक खलनायकाच्या प्रेमात होता. कांचाने करणला अक्षरशः झपाटून टाकले होते. त्याचे म्हणने होते…
A strongest undefeatable villain only can make Hero’s struggle real and interesting
“अतिशक्तिशाली असा खलनायक नेहमी नायकाचा संघर्ष अधिक तीव्र व जीवंत करतो ” हे करणचे म्हणने अगदी बरोबर आहे. या मांडणीमुळे प्रेक्षक नायकाशी जास्त relate करू शकतात. नायकाचा संघर्ष त्यांना आपला संघर्ष वाटू लागतो. अग्निपथ मधे ही सुरूवातीला नायक विजय कांचा कडून मात खातो असे दाखवले गेले आहे. विजय कडून कांचा या खलनायकाचा अंत होवू शकतो ही गोष्ट शेवटपर्यंत अशक्यप्राय वाटत ठेवणे हे दिग्दर्शक म्हणून करण मल्होत्रा याचे कसब मान्य करावे लागेल.
हे ही वाचा
▶️Remake – Agneepath आणि Parle G बिस्किट
▶️ऋषी कपूर : ” रायटर को बुलाओ!” म्हणणारा Last Roman -Agneepath 2
▶️Priyanka Chopra चा मराठी संवादांसाठी होता हट्ट- AGNEEPATH 2 – BTS
▶️Agneepath 2 : फक्त नावात साम्य| करण मल्होत्रा चे वेगळे Vision
