भारताच्या आसमंतात दिसले Northern Lights गेल्या शुक्रवारी भारतात लद्दाख मधे Northern Lights पाहिल्या गेल्याची बातमी नेटवर ट्रेंड झाली. हे Northern lights कसे उत्पन्न होतात याचा आढावा घेण्याचा एक प्रयत्न Northern Light at Norway pic courtesy Google अरोरा म्हटलं की उत्तर मध्य मुंबईच्या लोकांना माटुंग्याचं अरोरा टाॅकीजच आठवतं . अरोरा हे फार जुनं व प्रसिद्ध असं single screen थिएटर आहे. दर शुक्रवारी तिथे नवे चित्रपट लागत असतात, विशेषतः दाक्षिणात्य . पण गेल्या शुक्रवारी भारतात लद्दाख मधे Aurora पाहिल्या गेल्याची बातमी नेटवर ट्रेंड झाली . ही बातमी अरोरा टाॅकीजबद्दल नव्हती तर सुप्रसिद्ध अशा NORTHERN LIGHTS बद्ल होती . Aurora हे याच Northern Lights चं तांत्रिक नाव . मूलत:Aurora ही ग्रीक पुराणातील पहाटेची किंवा उष:कालाची देवी. या देवीच्या नावावरून प्रसिद्ध खगोल शास्त्रज्ञ गॅलिलिओ ने १६२३ साली आकाशातल्या या प्रकाश शलाकांच्या खेळाचे Aurora असे नामकरण केले. पूर्ण नाव Aurora Borealis असे आहे ज्याचा अर्थ ‘ऊषे चा प्रकाश’ (light of down) असा होतो. यातील थोडा विरोधाभास असा आहे की या पहाटेच्या लालिमेसम वाटणार्या प्रकाशाची जादू मद्ध्यरात्री अंधाराच्या पार्श्व भूमीवरच उठून दिसते. हे Aurora Borealis उत्तर व दक्षिण या दोन्ही ध्रूवा जवळील प्रदेशांत दिसत असतात. दक्षिण ध्रूवाकडे याचे नाव Aurora Australis असे बदलते. काय आहे Northern Lights आकाशात विस्मयकारक अशा भव्य रंगीत प्रकाश शलाकांचं दर्शन अर्थात Northern Lights. कुठे? उत्तर कॅनडा नाॅर्वे स्वीडन फिनलैण्ड अलास्का रशिया … Read more