Rabindranath Tagore : Gitanjali Marathi translation

Close up of Rabindranth Tagore in vertices frame with bluish tone and name over printed on it
Rabindranath Tagore pic courtesy Google

 Written by Avinash Bhanu Asha Ghodke 

रवींद्रनाथ टागोर यांच्या गीतांजलीतील ४२वी कविता Morning Sea of Silence चा मराठी भावानुवाद 

गीतांजली विषयी

गीतांजली आध्यात्मिक भाष्य करते व हे भाष्य थेट नसून between the lines आहे. 

१९१० साली टागोरांनी मूळ बंगालीत लिहिलेला गीतांजली हा काव्यसंग्रह आहे 

१९१२ मधे टागोरांनी गीतांजलीला स्वतः इंग्रजीत भाषांतरीत केले.

१९१३ मधे  या इंग्रजी भाषांतरीत गीतांजलीस  साहित्याचे ‘नोबल पारितोषिक’ देवून गौरविण्यात आले. 

Nobel Price for literature 1913 

गीतांजली काव्यसंग्रहासाठी नोबल मिळवणारे रविंद्रनाथ टागोर हे 

पहिले अयुरोपिय

पहिले आशियाई 

पहिले भारतीय

आहेत. 

Moto

गीतांजली काव्यसंग्रहाचा उद्देश “I am here to sing thee songs” अर्थात ” मी इथे तुझी गाणी म्हणायला आलो आहे !”. या वाक्यातून स्पष्ट होतो.  हे वाक्य ईश्वराला उद्देशून आहे. यातून ‘भक्ती’ हा मानवी जीवनाचा परमोच्च हेतू टागोर सूचित करतात.  

तशी महाराष्ट्रात भक्ती परंपरा ज्ञानेश्वर -तुकाराम यांनी टागोरांच्या ४०० वर्षे आधीच प्रस्थापित केलिय पण टागोर हे  पाश्चात्य व भारतीय संस्कृती चा दुवा मानले गेले. त्यांनी भारतीय अध्यात्माची काव्यमय ओळख पाश्चात्य जगताला करून दिली. 

विषयांतर :

“I am here to sing thee songs”. या ओळी सुधीर फडकेंनी गायलेले प्रसिद्ध मराठी गीत “तुझे गीत गाण्यासाठी सूर राहू दे” ची आठवण करून देतात.

About Poem 48 of Gitanjali ‘Morning Sea of Silence’

मित्रांसोबत परमेश्वराचा किंवा परमसुखाचा शोध घेत डोंगर दर्यातून निघालेला काव्य नायक वाटेतल्या निसर्गाला पाहून मोहित होतो व ईश्वरीय सौंदर्याची अनुभूती घेत मागे रेंगाळतो . मित्र परमसूख शोधत फार दूर पुढे निघून जातात पण थांबलेल्या नीवांत नायकाला निसर्गातच ईश्वराचे दर्शन होते.

 पहाटेचा शांतीसागर

 (गीतांजली /४८ रविंद्रनाथ टागोर)

पहाटेच्या निरव शांततेचा सागर पक्षांच्या किलबिलाटाने शहारला.


 रस्त्या लगतच्या झाडांची इवली फुले आनंदून गेली. 


वर सोन्याचे लोट आकाशातल्या ढगांच्या कडांवरून ओसंडत होते. 

 

पण आम्ही तिकडे  ढुंकून पाहिले नाही 

कारण आम्ही झप झप चालत दूर निघालो होतो..निमूट…न हसता.. न बोलता.



आता मध्यान्हीचा सूर्य तळपला आणि बदकांचा कळप पिंपळाच्या थंड सावलीत विसावला.


एक धनगराचं पोर विशाल वडाच्या  बुंध्याला डुलकी घेत बसलं होतं. 

 

मी ही मग जलाशयाच्या काठावरच्या हिरव्या गवतावर निवांत पडलो.  


माझे सोबती माझ्याकडे पाहून तुच्छतेने हसले व पुढे चालू लागले..  


क्षितिजाच्या निळसर धुक्यात ते अदृश्य होत गेले. त्यांनी अनेक डोंगरमाथे व कुरणे पार केली.


 दूरच्या त्या अनोळखी देशांना ओलांडत ते पुढे गेले… झप झप… सगळेच ..!

-रवींद्रनाथ टागोर 

Leave a Comment