Avinash Ghodke

Screenwriter and Lyricist with 20 years of experience in Bollywood and Marathi cinema.His creative writing examines the contradictions of lived experience, while his journalism uncovers humanism beneath headlines.

6G Phone येत आहेत – Next Generation Technology

 

6G चा भन्नाट ULTRA SPEED एका सेकंदात पाच H D movies डाऊनलोड होणार

Written by Avinash Bhanu Asha Ghodke

5G पेक्षा २० पट जास्त वेगाने चालणार्या 6G तंत्राच्या प्रारूपाचे नुकतेच जपानमध्ये अनावरण झाले. डिजिटल जगाच्या इतिहासातील ही नवी क्रांती म्हणावी लागेल.

चार बलाढ्य कंपन्यांची भागीदारी 

DOCOM, FUJITSU,NEC,NTT या जपानच्या चार बलाढ्य कंपन्यां एकत्र येवून जगातल्या पहिला 6G prototype Device  तंत्रज्ञानाच्या R and D (Research and Development) वर काम करत होत्या.

सन २०२१ पासून या 6G प्रकल्पावर हे संशोधन कार्य अविरत सुरू होते .

अखेर ११एप्रिल २०२४ रोजी या 6G device ची चाचणी यशस्वी झाली असे अधिकृत रित्या सांगितले गेले आहे.


6G ची तांत्रिक वैशिष्ट्ये

निर्मिती कंपन्यांनी प्रसारीत केलेल्या प्रेस रीलीज  नुसार 6G ची तांत्रिक वैशिष्ट्ये  अशी आहेत की   १०० मीटर(३२८ feet) च्या परीघामधे १००० गीगाबाईट्स प्रती सेकंद माहीती देवाण घेवाणीची प्रचंड क्षमता या तंत्रज्ञात आहे  . ही क्षमता 5 G पेक्षा २०पट अधीक आहे .

एका सेकंदात HD चित्रपट डाऊनलोड करण्याची क्षमता या 6G तंत्रामुळे ग्राहंकांना उपलब्ध होणार आहे.


तुलनात्मक Frequency


5G – frequency

24 ते 40 Ghz आहे तर 

6G ची  -Ultra high frequency 

Indoor – 100GHz band ते

Outdoor-300 GHz band

इतकी आहे



5G प्रमाणेच 6G ही निसर्गापुढे हतबल

5G प्रमाणेच अडसर येणारी झाडे , भिंती पाऊस, वारा सारख्या नैसर्गिक परीस्थितींना भेदण्यास 6G तंत्रज्ञान अक्षम आहे

थोडक्यात घराच्या आतल्या खोलीतून नेटवर्कसाठी  ‘हलो हलो’ करत खिडकी जवळ येणे अजून ही तसेच सुरू रहाणार आहे असे एकंदरीत दिसते.

पर्यावरण वाद 


सध्या कार्यरत असलेल्या 5G तंत्रज्ञानाला पर्यावरण वाद्यांकडून आक्षेप होता. पर्यावरण वाद्यांची बाज़ू मांडणारा मेगास्टार रजनिकांतचा ROBOT 2.O नावाचा चित्रपट ही २०१० साली प्रदर्शित झाला होता .  5G तंत्रज्ञानावर अनेक स्तरांवरून आक्षेप नोंदवला गेला असला तरी  

WHO आणि COAI ( Cellular Operators Association) ने 5G ला हिरवा कंदिल दाखवला आहे.

२०१७ मधे कर्करोगाचा हवाला देत शास्त्रज्ञ डाॅक्टरांनी याचिका दाखल करून 5G वर प्रतिबंधाची जोरदार मागणीही केली होती पण या वर सबळ असे संशोधन पुरावे उपलब्ध नसल्याने याचिका फेटाळली गेली. 5G घातक नाही असे म्हणनारा एक मोठा जागतिक समुदाय आहे हे ही तितकेच खरे

6G चे आगमन बिनदिक्कत 

यासर्व बाबी लक्षात घेता 5G ने मोकळ्या करून ठेवलेल्या वाटांवर 6G बिनदिक्कत चालणार आहे असे दिसते.या नव्या 6 G तंत्रज्ञानाचे सेलफोन काही वर्षांत बाजारात दिसू लागतील असे आता तरी म्हणता येईल.


Collage of Robot image and 6G words gleaming in starry sky
6G तंत्राच पर्व 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment