Satyajit Ray■ जागतिक चित्रपटसृष्टीतला भारताचा चेहरा
चित्रपट निर्मिती ही एक कलात्मक प्रक्रिया आहे. मात्र, सध्या वाढत्या व्यावसायिकतेमुळे चित्रपटाकडे केवळ एक व्यावसायिक प्रकल्प म्हणून पाहिले जात आहे. चित्रपट कोट्यवधींचा नफा कमावत आहेत, ही नक्कीच चांगली गोष्ट आहे; पण नवनवीन तंत्रज्ञानाच्या प्रभावात चित्रपटाने आज आपला आत्मा गमावला आहे, हेही एक कटू सत्य आहे. आता चित्रपटांमध्ये जीवनदर्शन कुठे आढळते? जसे की जुन्या Satyajit Ray यांच्या चित्रपटांमध्ये दिसून येत असे.
दूरदर्शन मुळे Ray यांचे चित्रपट घराघरांत
चित्रपट म्हणजे सहजपणे जीवनदर्शन घडवून आणणारी कला आहे.. या गोष्टीची जाणीव लहानपणी दूरदर्शनवर सत्यजीत रे यांचे चित्रपट पाहून झाली होती. तेव्हा दर शुक्रवारच्या रात्री दूरदर्शनवर जागतिक चित्रपट (वर्ल्ड सिनेमा) दाखवले जात. कधी अल्फ्रेड हिचकॉक, कधी कुरोसावा आणि कधी Satyajit Ray यांचे चित्रपट पाहायला मिळत. एक कथा किती बारकाव्याने सांगता येऊ शकते, याचा अनुभव रे सरांचे चित्रपट पाहून येत असे. एखादा प्रसंग दिवसाच्या कोणत्या प्रहरात घडत आहे, याचा विचारही सत्यजीत रे करायचे.
सत्यजीत रे सिने तंत्रज्ञानाचे प्रणेते
चित्रपट तंत्रातील अनेक गोष्टींचे सत्यजीत रे हे प्रणेते होते. विशेषतः प्रतीकात्मक दृश्यचित्रणाची (सिम्बॉलिझम) पद्धत त्यांच्याच चित्रपटांपासून सुरू झाली. प्राणोत्क्रमण होताच दिव्याच्या फडफडणाऱ्या आणि विझणाऱ्या ज्योतीच्या प्रतीकातून आत्मज्योत विझल्याचे सूचित करणे, किंवा चारूलता मधे दिराच्या येण्याने नायिकेच्या आयुष्यात वादळ येणार आहे, हे सूचित करण्यासाठी दिराचा पावसाळी वादळात चिंब भिजून वाड्यात प्रवेश करणे.. अशा प्रकारच्या प्रभावी प्रतीकात्मकतेचा वापर Satyajit Ray यांनी प्रथमच चित्रपटाच्या पडद्यावर केला. अपूची बहीण जेव्हा पावसाळी रात्री झोपडीत प्राण सोडते, तेव्हा जोराच्या वाऱ्याने खडखडणारी खिडक्यांची लाकडी दारे.. अशी अनेक दृश्ये आठवतात.
सत्यजीत रें चे आयोग्य अनुकरण
70 च्या दशकात हिंदी व्यावसायिक चित्रपटसृष्टीने या प्रतीकात्मकतेचा काहीसा अतिरेकी वापर केला आणि ती पुढे प्रभावहीन झाली. या दिग्दर्शकीय कलाकारीला ‘सिम्बॉलिक डायरेक्शन’ म्हटले जात असे. मला आठवते, जेव्हा हिंदी चित्रपटात नायक-नायिकेचे चुंबन दृश्य अपेक्षित असे, तेव्हा कॅमेरा हळूहळू दोन फुलांवर सरकत असे. काही दिग्दर्शक ही फुले एकमेकांवर पडतानाही दाखवत. मग चित्रपटगृहात बसलेला एखादा दर्दी प्रेक्षक दाद देत “डायरेक्शन आहे.. डायरेक्शन आहे!!!” असे पुटपुटत असे.
दुसरीकडे सत्यजीत रे सरांच्या वास्तववादितेला (Realism) तथाकथित आर्ट फिल्म करणाऱ्यांनी काहीसे जास्तच गांभीर्याने घेतले. पण या चित्रपटांनी नीरसता म्हणजेच जीवनाचे वास्तव आहे, असे सांगायला सुरुवात केली.
Fantacy चित्रपटातून वास्तववाद
जर सत्यजीत रे यांना केवळ वास्तववादी दिग्दर्शक म्हटले, तर ते पूर्णपणे सत्य ठरणार नाही. सत्यजीत रे यांना अद्भुत रम्यता (फॅन्टसी) मध्ये प्रचंड रुची होती. केवळ मुलांच्या मानसिकतेतूनच नव्हे, तर आपल्या कथांमध्ये त्यांनी प्रौढ पात्रांच्या मानसिकतेतूनही अद्भुतरम्य कथा विणल्या आणि सामाजिक विडंबने व विरोधाभास यांचा आकर्षक पद्धतीने मेळ घातला.
जीवन दर्शन करणारे सिनेमे
तथापि, Satyajit Ray यांचे चित्रपट ना केवळ कलावादी होते, ना केवळ वास्तववादी.. ते तर जीवनदर्शन घडवणारे एखाद्या स्वच्छ आरशासारखे होते. …आरसा… ज्यात जीवनाचे प्रतिबिंब आहे.. स्त्रीच्या अंतर्मनाचा शोध आहे.. मुलांच्या मनोव्यथा आहेत.. जमीनदारांचे पोकळ वाडेही आहेत आणि गरीबाची आशावादी झोपडीही आहे.. ज्यामध्ये मातीच्या चुलीवर शिजणाऱ्या भाताचा फेस उकळत बाहेर येतो.. जणू काही मानवी भावनांचा लाव्हा आपल्या मनाच्या खोल गर्तेतून जीवन संवेदना समृद्ध करण्यासाठी उसळून आला असावा.. जागतिक चित्रपटसृष्टीत सत्यजीत रे यांचे योगदान अमूल्य राहिले आहे आणि यामुळेच त्यांना ऑस्करच्या जीवन गौरव पुरस्काराने (Oscar for Life Time Achievement) सन्मानित करण्यात आले आहे.
महान जपानी दिग्दर्शक अकिरा कुरोसावा यांनी म्हटले आहे,
“ज्याने सत्यजीत रे यांचे चित्रपट पाहिले नाहीत, तो जीवनदर्शनापासून वंचित राहिला आहे.”
सत्यजीत रे यांनी स्वतः एकदा आपली एक खंत बोलून दाखवली होती.. ते म्हणाले होते ..”मला एक चित्रपट दिग्दर्शक म्हणून जगभर लोक ओळखतात पण यातल्या फार कमी लोकांनी माझे चीत्रपट पाहिलेले असतात!”
तुम्ही सत्यजीत रे यांचा चित्रपट कधी पाहिला आहे का?
Satyajit Ray: Filmography
- The Apu Trilogy: Pather Panchali (1955), Aparajito (1956), Apur Sansar (1959).
- Acclaimed Dramas: Charulata (1964), Mahanagar (1963), Jalsaghar (1958), Devi (1960), Days and Nights in the Forest (1970).
- Thriller/Adventure: Sonar Kella (1974), Joy Baba Felunath (1979), The Elephant God (1979).
- Children’s Fantasy: Goopy Gyne Bagha Byne (1969), Hirak Rajar Deshe (1980).
- Other Notable Films: Nayak (1966), Shatranj Ke Khilari (1977), Ghare Baire (1984), Agantuk (1991).
____________________________________________________
(वरील ब्लॉग चा हिंदी अनुवाद)
सत्यजीत रे ■ नवतम Cinema Technic के प्रणेता और world Cinema के प्रांगण में भारत का चेहरा
सिनेमा बनाना एक कला प्रक्रीया है लेकिन आजकल बढती व्यावसायिकता को देेखते सिनेमा को व्यावसायिक प्रकल्प के तौर पर देखा जा रहा है । सिनेमा भी करोडो के आकडोंमें मुनाफा बटोर रहा है ये अच्छी बात है लेकिन तांत्रिकता के अवडंबर में सिनेमाने अपनी आत्मा खो दी है ये भी एक कडवा सच है। अब सिनेमा में जीवन दर्शन कहां होता है जैसे पुरानी फिल्मोंमें होता था।
.jpeg)
प्रतिकात्मक दृश्य चित्रण अर्थात Symbolism
अतिवास्तववाद (Surrealism) को छूता सत्यजित रे का वास्तववाद
-अविनाश घोडके

.jpeg)






