![]() |
Kancha Bhau of Agneepath 2 |
अग्निपथ : कांचा ने काढलेले गीतेचे अन्वयार्थ
गीते संदर्भातल्या काही गोष्टी काही आक्षेपांमुळे
अग्निपथ मधून वगळाव्या लागल्या. धर्मा चा आधार घेवून हिंसा करणार्या
प्रवृत्तींच प्रतिक.. असंच कांचा या पात्राच प्रयोजन होतं. कांचा च्या
लहानपणी च एक दृश्य होतं ..
अंगावर केस न येण्याच्या आजाराने विचित्र दिसणार्या कान्चाला गावातली मुलं
चिडवू लागतात .. आत्मविश्वास हरवलेल्या लहानग्या कांचाची त्याचे बाबा
मुंबईला शिक्षणासाठी पाठवणी करतात… त्याच्या हातात गीता देत ते म्हणतात
..” बडे शहर में रहेगा तो तेरी सोच भी बडी हो जायेगी… ये गीता तुझे जीवन
का मार्ग बातायेगी !!” कांचा गीता आत्मसात करतो पण तो गीतेचे आपल्या
परीने;आपल्या सोयीचे असे चुकीचे अर्थ लावतो. कांचा गीतेला
हिंसात्म्क्तेच्या “उन्निस्व्या अध्यायाची ” जोड देण्याचा अट्टहास करतो .
मोठा कांचा हातात गीता घेवूनच मांडवा गावात प्रवेश करतो ..
कृष्णाने गीतेमध्ये स्वतः चे रूप विशद करताना “मी अक्षर आहे ” असे म्हटले
आहे .. ‘अ-क्षर’ ..अर्थात ज्याचा विनाश होत नाही ते अविनाशी तत्व
.सद्दविचार हे पवित्र आत्म्याचे हुंकार असतात ..आणि ते कागदावर उमटले की
‘अक्षर’ होतात. जगावर सूड उगावण्याच्या भावनेने पछाडलेला कांचा गीतेतल्या
या पुण्य अक्षरांना त्यांच्या विकृत विचारांचा मुलामा देतो … दुसरी कडे
लहानग्या विजयला त्याच्या बाबांनी गीतेतल्याच अक्षरांचा धर्म सांगणारी
‘अग्निपथ’ ही कविता सांगितली… आणि ती छोटीशी कविता
विजय च्या आयुष्याच्या धर्म-युद्धाची प्रेरणा ठरली.तीच त्याची गीता झाली ..
प्रत्येक व्यक्तीच आयुष्य हे त्याच स्वतःच अस एक धर्मयुद्धच असतं
..त्याला त्याची गीता कुठल्या स्वरूपात मिळेल सांगता येत नाही …
अविनाश घोडके
सह संवाद लेखक / अग्निपथ