Avinash Ghodke

Screenwriter and Lyricist with 20 years of experience in Bollywood and Marathi cinema.His creative writing examines the contradictions of lived experience, while his journalism uncovers humanism beneath headlines.

शरद पवार यांचा वेगळा विजय – पवारांचा नातू आहे Basketball खेळाडू

पिंपरी–चिंचवडमधील पराभवानंतरही … नातवाच्या Basketball आंतरराष्ट्रीय खेळात रमले होते शरद पवार

पिंपरी–चिंचवड महानगरपालिका निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेससाठी अपेक्षेप्रमाणे गेली नाही.
या निवडणुकीत राष्ट्रवादीला चार जागांवर पराभव स्वीकारावा लागला होता.
स्थानिक राजकारणात हा धक्का मानला जात असला, तरी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा
शरद पवार मात्र वेगळ्याच आनंदातरमले असल्याचे चित्र दिसले होते.

राजकीय पराभव आणि वैयक्तिक समाधान

शरद पवार यांनी आपल्या दीर्घ राजकीय कारकिर्दीत निवडणुकीत अनेक विजय आणि पराभव पाहिले आहेत.
त्यामुळे पिंपरी–चिंचवडमधील निकाल हा त्यांच्यासाठी अंतिम सत्य नसून
राजकारणातील एक टप्पा होता.
निवडणुकीच्या गदारोळातून काही काळ दूर जाऊन ते
आपल्या Vijay Sule Pawar या नातवाच्या आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल खेळाचा आनंद घेत असल्याचे एका व्हिडिओ क्लिप मधून समोर आले होते.शरद पवारांचा नातू व सुप्रिया सुळे यांचा मुलगा विजय सुळे पवार हा एक Basketball खेळाडू आहे प्रथमच लोकांपुढे आले.

विजय सुळे पवार : अमेरिकेतील शिक्षण आणि बास्केटबॉल करिअर

शरद पवार यांचा वेगळा विजय - पवारांचा नातू आहे Basketball खेळाडू
Vijay Sule

खासदार सुप्रिया सुळे यांचे चिरंजीव आणि शरद पवारांचे नातू
विजय सुळे (पवार) सध्या अमेरिकेत उच्च शिक्षण घेत आहेत.
अभ्यासासोबतच त्यांनी बास्केटबॉलला गांभीर्याने करिअर म्हणून स्वीकारले आहे. आजोबाचा राजकीय वारसा न सांभाळता त्यांच्या खेळप्रेमाचा वारसा ते सध्या सांभाळताना दिसत आहेत.

विजय सुळे पवार केवळ विद्यापीठीय स्तरापुरते मर्यादित नसून
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धांमध्येही नियमितपणे सहभागी होत आहेत.

थायलंडमधील Warriors League मधील सहभाग

सध्या थायलंड येथे सुरू असलेल्या Warriors League बास्केटबॉल स्पर्धेत
विजय सुळे CNX Orion संघाकडून खेळत आहेत.
ही स्पर्धा आशियाई बास्केटबॉल (Asian Basketball)वर्तुळात महत्त्वाची मानली जाते
आणि उदयोन्मुख खेळाडूंना आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून देते.

रँकींग, उंची आणि खेळाडू म्हणून ओळख

बास्केटबॉल विश्वात विजय सुळे यांची नोंद पुढीलप्रमाणे आहे :

  • देशांतर्गत (National) रँकींग : 2391
  • आंतरराष्ट्रीय (International) रँकींग : 3754
  • उंची : 185 सेमी (सुमारे 6.1 फूट)

या आकडेवारी वरून विजय सुळे पवार यांचा प्रवास अजून सुरुवातीच्या टप्प्यात आहे असे दिसत असले तरी तो आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल नकाशावर आपली नोंद करत असल्याचे लक्षात येते.

आजोबाचा शांत आणि वैयक्तिक आनंद

पिंपरी–चिंचवडमधील निराशाजनक निवडणूक निकालानंतरही
शरद पवारांनी आपल्या विजय पवार या नातवाचा आंतरराष्ट्रीय सामना
घरी बसून पाहत आनंद घेतला होता.
राजकीय रणनीती, बैठका आणि समीकरणांपासून काही काळ दूर जाऊन,
‘नातवाच्या खेळातील प्रत्येक क्षण अनुभवणारा आजोबा‘
ही प्रतिमा शरद पवारांना अधिक मानवी बनवते. सोशल मीडिया वर ते नातवाचा बास्केटबॉल गेम पहात असलेली व्हिडिओ क्लिप viral झाली होती. 

राजकारणात पराभव तात्पुरते असतात,
पण पुढील पिढी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधित्व करत असेल,
तर तो एक दीर्घकालीन सांस्कृतिक ठेवा असतो.


Sharad Pawar यांनी आयुष्यात अनेक जय पराजय पाहिलेआहेत पिंपरी–चिंचवडमधील पराभव विसरून,
शरद पवा Vijay Sule Pawar या आपल्या नातवाच्या खेळाचा आनंद घेत होते —आजोबाच्या भूमिकेत त्यांनी एक वेगळा विजय अनुभवला असे म्हणावे लागेल .

हे ही वाचा: पॅरिस च्या आयफेल टॉवर वर सायकल चढवणारा तरूण- Aureilen -Eiffel tower record

गणपती बाप्पा ! नंतर “मोरया!” असे का म्हणतात ? मोरया गोसावी आणि त्यांच्या चिंचवड मधील संजीवन समाधी मंदिरा बद्दल जाणून घ्या

‘देव शोधा !’-राजमाता जिजाऊंनी आदेश दिला होता- पुण्याच्या मानाच्या पहिल्या गणपतीची मूर्ती कशी सापडली होती? जाणून घ्या कसबा गणपतीचा इतिहास..

About The Author

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment