How to do Bhumi Sparsh Mudra: भूमी स्पर्श मुद्रा करून भगवान बुद्धांनी आकाश तत्वापेक्षा पृथ्वी तत्वाला महत्व दिले होते असे एका पुरातन बौद्ध कथेत दिसून येते. गौतम बुद्धांची ही Bhumi Sparsha Mudra मनातील Negativity पृथ्वी मधे विलीन करत
सोपी व प्रभावी भूमी स्पर्श मुद्रा
भूमी स्पर्श मुद्रा ही अत्यंत सोपी अशी मुद्रा आहे. कुठल्या वयातील व्यक्ती ही मुद्रा सहज करू शकते. ही मुद्रा धारण करून केलेले ध्यान आपल्या मन:स्वस्थ्यास अत्यंत लाभदायी ठरते.
कशी करावी भूमी स्पर्श मुद्रा – How to do Bhumi Sparsha Mudra

• सूखासनात बसून पाठिचा कणा ताठ ठेवावा.
•डाव्या हाताचा तळवा उघडा ठेवून तो पाहता येईल असा डाव्या मांडीवर ठेवावा.
• उजव्या हाताचा तळवा उलटा करत गुडघ्यापुढे नेऊन बोटे भूमीला स्पर्श करतील अशा पद्धतीने उजवा हात मांडीवर ठेवावा.
•डोळे मिटून सुरूवातीला ५ ते १० मिनीट या मुद्रा स्थितीत ध्यान करावे.
• श्वसन खोल श्वास घेत धीम्या गतीने व एकाग्रतेने करावे
• सुरूवातीस ५ मिनीट भूमिस्पर्श मुद्रेत ध्यान करावे व पुढे हळूहळू हा वेळ १५ मिनिटे किंवा अधिक वाढवावा
भूमी स्पर्श मुद्रा Buddhist Yoga Mudra – पृथ्विचे महत्व सागणारी बुद्ध कथा..

कथा-भगवान बुद्ध यांनी भूमि स्पर्श करून मार राक्षसाला दिली होती पृथ्वी ची साक्ष
घनदाट वनात वृक्षा खाली बसलेल्या ध्यानस्थ बुद्धा पुढे मार राक्षस थयथयाट करत होता . ” तू कसला ज्ञानी ..? तुझ्यापेक्षा मी मोठा ज्ञानी! ” माराच्या असंख्य पाठिराख्यांनी आता त्याचा जयघोष केला . बुद्ध अविचल व शांत होता. मार चिडला . बुद्धावर ओरडून म्हणाला ” हे हजारो पाठिराखे पुरावा देतील माझ्या श्रेष्ठत्वाचा . पाठिराख्यांनी माराचा पुन्हा जयजयकार केला. बुद्ध अजूनही शांत होता. मारानी आता बुद्धाला थेट प्रश्न केला ..”या घनदाट जंगलात एकटाच झाडाखाली डोळे मिटून बसला आहेस..! कुणी आहे का तुझ्या पाठिशी? जर असशील महाज्ञानी तर कोण देणार तुझ्या तपस्वी पणाची साक्ष ? भगवान बुद्ध यांनी आता शून्यमुद्रेतला आपला उजवा हात उचलला आणि बोटांनी धरणी ला स्पर्श करत ते म्हणाले.
” ही पृथ्वी साक्ष आहे!”
पृथ्वीची साक्ष देताना व तिला स्पर्श करत भगवान बुद्ध यांनी जी मुद्रा केली तीच आहे भूमी स्पर्श मुद्रा Buddhist Yoga Mudra.
मनातलं देवत्व..आणि पृथ्वी ची साक्ष..!
बुद्धानी आकाश व आकाशातल्या देवांपेक्षा पृथ्वीला महत्व दिले. हे त्यांच्या विचारांमधले वेगळेपण व वैशिष्ट्य आहे. वरील कथा रूपकात्मक आहे. मार राक्षस म्हणजे काम, क्रोध,लोभ, मोह,मद, मत्सर या षड्-रिपूंचे प्रतीक आहे. गौतम बुद्धांची भूमिस्पर्श मुद्रा हे मात्र सत्य आहे. ही Bhumi Sparsha Mudra बुद्ध स्वतः ध्यानधारणे मधे करायचे.
वेदिक धर्माचे पृथ्वी ला देवत्व पण गौतम बुद्धांसाठी पृथ्वी ही अंतीम सत्य
वेदिक धर्मात निसर्ग तत्वांना देव मानले गेले होते. पुढे सनातन धर्मात ही हा विचार अंतर्भूत केला गेला. याला अनुसरून विष्णू पुराणातील खालील मंत्रात पृथ्वी ला ही देवत्व दिले गेले. या श्लोकात पृथ्वी ला भगवान विष्णू ची पत्नी मानले गेले आहे. मंत्र पुढीलप्रमाणे आहे.
समुद्रवसने देवि पर्वतस्तनमण्डले।
विष्णुपत्नि नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे॥
हा श्लोक सकाळी उठल्यावर पृथ्वीला पायाने स्पर्श करण्यापूर्वी क्षमा मागणारा सनातन धर्मातील एक प्रचलित श्लोक आहे .
गौतम बुद्धांनी मात्र याहीपुढे जावून पृथ्वी हीच अंतीम सत्य आहे असे मान्य केले आहे. गौतम बुद्धांनी पृथ्वी चे कुठल्याही आकाशस्थ देवाशी नाते प्रस्थापित केले नाही व तिला एक स्वतंत्र आणि एकमेव ऊर्जा स्थळ मानले.
आकाश व आकाशातल्या देवांपेक्षा पृथ्वी ला महत्व देवून तिला Endorsing final Authority मानणारे हे फक्त गौतम बुद्धच आहेत. भूमिस्पर्श मुद्रा ही Buddhist Yoga Mudra भारतीय योग परंपरेला भगवान बुद्ध यांनी दिलेली एक अमूल्य ठेव आहे. या मुद्रेत Yoga आणि आध्यात्मिक विचाराचा संगम आहे.
ध्यान धारणेत गौतम बुद्धांची ही सहज सोपी Bhumi Sparsha Mudra केल्यास मनातली नकारात्मकता पृथ्वी तत्वात विलीन होईल व मनाला शांती लाभेल.
हे ही वाचा : Buddha Paurnima 2025: बुद्धांचा जन्म, तत्वज्ञान आणि भविष्यातील मैत्रेय बुद्ध

