Priyanka Chopra Marathi बोलते-अग्निपथ मधे मराठी संवादांसाठी ती आग्रही होती. AGNEEPATH 2 चे सह संवाद लेखक अविनाश घोडके यांनी सांगितलेला BTS अनुभव ..

करण मल्होत्राने माझी Priyanka Chopra शी करून दिलेली ओळख
‘अग्निपथ ’च्या शूटिंगमधला एक किस्सा-Priyank Chopra Marathi
करण मल्होत्राने माझी प्रियांका चोप्राशी ओळख करून दिली, तेव्हा Agneepath 2 चे शूटिंग वर्सोव्यात उभारलेल्या चाळीच्या सेटवर सुरू होते. ओळख करून देताना करण फक्त एवढंच म्हणाला,“ये अविनाशजी है…”त्याने ज्या विश्वासाने आणि आदराने हे वाक्य उच्चारले, त्यातूनच माझी ओळख प्रियांकाला पुरेशी झाली असावी. तिनेही हसत हस्तांदोलन केले. मी सहसंवाद लेखन करत असल्याचे समजल्यावर ती म्हणाली, “मुझे कुछ बताना है,” आणि मला गॅलरीत घेऊन गेली.तिने एका भावनिक दृश्याबद्दल सांगितले. त्या दृश्यात ‘काली’च्या तोंडी अजून काही मराठी शब्द असावेत, अशी तिची इच्छा होती. करणला मात्र त्या दृश्यात खूप मराठी शब्द नकोत असे वाटत होते. प्रियांका मात्र मराठीबाबत आग्रही होती. मी थोडा पेचात पडलो. शेवटी तिच्या अपेक्षेप्रमाणे संवाद लिहून मी तो सीन करणच्या मुख्य सहाय्यकाकडे दिला. दिग्दर्शकाला वगळून थेट अभिनेत्रीला स्क्रिप्ट देणे मला नैतिकदृष्ट्या योग्य वाटले नाही.
Agneepath 2- वर्सोवा सेटवर Tea Break मधे
संध्याकाळच्या टी-ब्रेकमध्ये प्रियांकाकडून मला पुन्हा बोलावणे आले. सेटवर मच्छरप्रतिबंधक धुराची फवारणी सुरू होती. ‘काली’च्या वेषातली प्रियांका चाळीच्या अंगणात खुर्ची टाकून बसली होती. धुरामुळे तिने चेहऱ्यावर दुपट्टा गुंडाळला होता— अगदी पुणेरी मुली जसा गुंडाळतात तसा.मी पोहोचताच ती विचारली, “वो सीन लिख लिया आपने?”मी तिच्यासमोर संवाद वाचून दाखवू लागलो. नवीन मराठी वाक्ये ती काळजीपूर्वक कागदावर लिहून घेत होती. दृश्यात ‘काली’ विजयला धीर देत म्हणते — “तू जा विजय!” Priyanka म्हणाली,“ये जो ‘जा’ वर्ड है ना… वो मैं मराठी ‘जा’ जैसे बोलूंगी — (जिभेच्या टोकावर)”मराठी उच्चारांबद्दल तिच्या या बारकाव्यांचे मला प्रचंड कौतुक वाटले. माझ्यासारख्या मराठी माणसाने तिची स्तुती केल्यावर ती शाळकरी मुलीसारखी आनंदाने हसली. बरेली आणि न्यूयॉर्क येथे बालपण गेलेली, मुंबई पासून दूर लहानाची मोठी झालेली Priyanka Chopra Marathi इतकी चांगली बोलते, हे खरोखरच उल्लेखनीय आहे.—
Priyanka Chopra Marathi संवादांसाठी आग्रही
प्रियांका मराठी संवादांबद्दल उत्साही होती. पण ती एवढे मराठी बोलेल तर pan-India प्रेक्षकांना ते कदाचित कळणार नाही, असे दिग्दर्शक करण मल्होत्रा ला वाटत होते. करण आणि प्रियांकामध्ये चर्चा सुरू राहिली आणि शेवटी दिग्दर्शकाने आपला व्हेटो वापरला. तो सीन अतिरिक्त मराठी शब्दांशिवायच चित्रित झाला.करणचा दिग्दर्शकीय मुद्दा मला पूर्ण पटला. करण मल्होत्रा स्वतः आवडीने कोल्हापुरी चप्पल घालतो; मराठी संस्कृतीबद्दल त्याला मनापासून आदर आहे. पण मोठं काम करताना केवळ भावनेवर चालत नाही
व्यावसायिकता महत्वाची…
—व्यावसायिक तर्कांना प्राधान्य हे हिंदी चित्रपटसृष्टीचं एक महत्त्वाचं सूत्र आहे, जे मी DHARMA PRODUCTION मध्ये प्रत्यक्ष अनुभवलं.तिथे व्यावसायिकता राखताना मनाचा कोतेपणा दाखवला जात नाही. गुणांना योग्य मान मिळतो. नवीन किंवा अनोळखी कलावंतांना कमी लेखण्याची वृत्ती तिथे दिसत नाही. मराठी चित्रपटसृष्टीत मला याच्या उलट अनुभव आले आहेत.एक आघाडीची अभिनेत्री असूनही ज्या विश्वासाने प्रियांका चोप्राने एका संवाद लेखकासोबत सर्जनशील चर्चा केली, त्यातून तिचं भाषाप्रेम आणि कलात्मक बांधिलकी स्पष्ट दिसते.सध्या ती दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांच्या मेगाबजेट चित्रपटाच्या शूटिंगसाठी भारतात आहे. सोशल मीडियावरील तिच्या पोस्टमध्ये ती संवादांतील तेलगू शब्दोच्चारांचा सराव करताना दिसते — हीच तिच्या कामावरील निष्ठेची ओळख आहे.
लेखक –अविनाश घोडके
सहसंवाद लेखक Agneepath 2
हे ही वाचा : Priyanka Chopra la south Director Rajamouli ni kele sign-record break maandhan-
कांचा च्या संवादातील ‘गीता’ शब्द का बदलला गेला – AGNEEPATH 2 BTS
हातात Bhagvad geeta घेवून कांचा ची Entry का?- Agneepath 2 चित्रपटात न दाखवलेले कांचाचे बालपण ….







