अब मैं लिखूंगा इस कहानी का उन्नीसवा अध्याय.. ! असं म्हणणारा अग्निपथ चा कांचा– pic courtesy :Google ,Dharma productions
कांचा : अग्निपथ 2 (2012) चा खलनायक आणि त्याचे धार्मिक राजकारण -Agneepath 2 BTS
“अब मैं लिखुंगा गीता का उन्नीसवा अध्याय !!”
सिनेमा रिलीज होण्या आधी टेलीविजन प्रोमो मधे कांचा हे वाक्य म्हणताना अनेकांनी पाहिले असेल . कांचा च्या तोंडी मी दिलेल्या या वाक्या वर काही आक्षेप आल्या कारणामुळे ऐन वेळी हे वाक्य ‘री-डब’ करून ‘गीता’ शब्द वगळून ..” अब मैं लिखुंगा इस कहानी का उन्नीस वा अद्ध्याय !!” असं करण्यात आलं.
भगवद् गीतेचे चुकीचे आणि सोईचे अर्थ misinterpretation of Holi bhagwad Geeta
कांचाने गीतेच्या मूळ अठरा अध्यायांना आपल्या एकोणीसाव्या वाढीव अद्ध्यायाची जोड देण्याची उर्मट भाषा अग्नीपथ मधे केली होती .त्याने खर तर ..’मी मूळ गीतेतला एखादा अध्याय पुन्हा लिहितो’ असं म्हटलं असत तर आक्षेप घेणे काही अंशी रास्त होतं . गीतेतील एकाच श्लोकाचे दोन वेगवेगळे धर्म गूरू अथवा विश्लेषक आपापल्या परीने तसे वेगवेगळे अर्थ सांगतच असतात. ती सुद्धा एक प्रकारची गीतेला दिलेली अर्थांची जोडच नाही का?.. इथे कांचा च्या बोलण्याचे अथवा त्याच्या विचारधारेचे समर्थन मला करायचे नाही . पण लोकांना रावण सांगितल्या शिवाय त्यांना राम कसा उमगायचा?.
“कांचा हा villain नसून Evil आहे!” असं करणं मल्होत्रा ने मला सांगितले होते.
मांडवा : कांचा चे असीम सत्तास्थान -state of absolute political power- Agneepath 2 BTS
रशिया मधे गीतेवर हिंसात्मकतेचा आरोप -Russian court refused ban on Bhagwad Gita in 2011
गाजले. पुढे न्यायाधीशांनी हा दावा रद्दबातल ही केला .हा त्या गटाने काढलेला गीतेचा चुकीचा अर्थ होता . अगदी तसाच जसा कांचाने गीतेचा चुकीचा अर्थ लावला होता.
आपण बाजारात जी जाड-जूड गीता बघतो ती त्यातील वेगवेगळ्या धर्म गुरु व विचारवंतांच्या श्लोकांवरील विवेचनामुळे अथवा जोडणी मुळे विस्तारीत झालेली गीता ..
गीतेतल्या श्लोकांचे अर्थ प्रत्येक जण आप आपल्या परीने लावत असतो. असे अर्थ लावताना कधी कधी गैर अर्थ ही लागू शकतो किंवा हेतुपुरस्सर स्वार्थासाठी अथवा हिंसा ही न्याय्य दाखवण्यासाठी ही गीतेचा आधार कुणी घेऊ शकतो …अग्निपथ मधील कांचा ने ही तेच केले . अग्निपथ च्या पहिल्या स्क्रिप्ट ड्राफ्ट मधे पियूष मिश्रा यांनी गीतेचे काही श्लोक कांचा च्या तोंडी दिले होते . कांचा च्या इंट्रोडक्शन सीन मध्ये तो मांडवा गावात चालत येताना दिसतो. यावेळी त्याच्या हातात भगवद् गीता आहे. कांचा स्वतः गीता अध्यय करतो असे सूचित करणारे हे दृश्य आहे. Agneepath 2 चा सह संवाद लेखक म्हणून दुसरा ड्राफ्ट लिहिताना मी कांचा गीतेतल्या नेमक्या कुठल्या श्लोकावर आपले विचार आवरण चढवतो हे शोधून काढले.हा श्लोक मी चित्रपट संहितेत ही नमूद केला होता. १८ व्या अध्यायातील तो ४८ वा श्लोक आहे.
“सहज कर्म कौन्तेय… सदोषमपि ..नं त्यज्येत”
( अध्याय १८ /४८)
गीतेतील याच श्लोकाचा आधार घेत कांचाचे पात्र उभे रहाते.. कांचाने आपल्या कूकर्मांना ‘सहज कर्म ‘ मानले आणि आपल्या आयुष्याच्या पाप अध्यायाला धर्माचे अधिष्ठान देण्याचा विक्षिप्त अट्टहास केला आणि हीच बाब कांचाच्या अंतास कारणीभूत ठरली. चित्रपट संहिते मध्ये पात्रांची विचारधारा स्पष्ट करण्यासाठी काही संशोधन करावे लागते. बरेचदा असे संशोधन चित्रपटाच्या प्रदर्शन आवृत्तीमध्ये दिसतही नाही. पण या संशोधनानेच पात्रांना ठामपणे आपल्या पायावर उभे केलेले असते. Agneepath 2 च्या कांचा या mighty villain ने ही उभे रहाण्यासाठी वरील श्लोकाचा चुकीच्या पद्धतीने आधार घेतला आहे. सहसंवाद लेखक म्हणून मी तो आधार शोधून त्याला दिला आहे.
निवडणुका आल्या की भारतात ही धर्माचं नाव घेवून जातीवाद पेरला जावू लागतो. आपल्या राजकीय पुढार्यांनी कांचाच्या या पतना तून काही बोध घेतल्यास किती बरे होईल. विपरीत सहजकर्मांवर जो नैतीक जबाबदारीचे लगाम लावतो तोच खरा माणूस. सत्ता उपभोग हे राजकारण्यांचे जसे सहजकर्मच झाले आहे. तरीही त्यांनी त्यांची नैतीक जबाबदारी विसरू नये. अन्यथा लोकक्षोभाची क्रांती काय करू शकते हे नेपाळ मधे झालेल्या लोक क्रांती च्या उग्र रूपात जगाने पाहिलेच आहे.
– अविनाश घोडके
सह संवाद लेखक – Agneepath 2

.jpeg)







