फ्रेंच युवतीचे भारत प्रेम:South Goa येथे नदी-समुद्राच्या संगमावर साकारले सुंदर Hem Eco Farm Resort

फ्रेंच युवतीचे भारत प्रेम : सुरू केलय दक्षिण गोव्यात नदी व समुद्राच्या संगमावर रेसॉर्ट South Goa Resort 

French girl wearing Indian Saree
Vanessa a french girl who started Hem Eco Farm and stay Resort at South Goa 

कला आसक्त व आध्यात्मिक वृत्तीची व्हनेसा ही मुळची फ्रांसची आहे. दक्षिण गोव्यात काणकोण येथे हिरव्या डोंगराच्या पायथ्याला व  तलपोना नदीच्या आणि अरबी समुद्राच्या संगमावर Eco friendly Resort चे स्वप्न तिने पाहिले आणि साकार ही केले. South Goa Resort 

दक्षिण गोव्यातील काणकोणच्या निसर्गरम्य परिसरात वसलेला हेम इको फार्म आणि स्टे रिसॉर्ट ( Hem Eco Farm & Stay  Resort) हा दक्षिण गोव्यात येणाऱ्या  पर्यटकांसाठी एक वेगळा आणि संस्मरणीय अनुभव ठरणार आहे.  

व्हनेसा चा फ्रान्सच्या गॅरोन (Garonne) नदी पासून गोव्याच्या तलपोना नदी पर्यंत चा प्रवास

व्हनेसा मूळची फ्रान्समधील गॅरोन नदी काठच्या बोर्डो ( Bordeaux) या शहरातली. पॅरिस पासून काही अंतरावर असलेले बोर्डो हे शहर Mini Paris म्हणून ही ओळखले जाते. बोर्डो ची दुसरी ओळख म्हणजे हे शहर जग प्रसिद्ध रेड वाईन चे माहेर घर आहे.  

वयाच्या चौदाव्या वर्षी एक दिवस व्हनेसा ला अचानक भौतिक जगाची रूढ जीवन पद्धती झुगारून द्यावी वाटली. नृत्य निपूण असलेली व्हनेसा जीवनाचा अर्थ शोधू लागली व  पुढे तिची भारतीय अध्यात्माशी विशेषतः तंत्र शाखेची ओळख झाली. अशीच काही वर्षे गेल्यावर मग तिचे भारतात येणे होवू लागले.  या दरम्यान ती Healing तंत्र शिकली .एक दीड दशक भारतात येत राहिल्यानंतर  अखेर तिने  इथेच स्थाईक होण्याचा निर्णय घेतला. तिच्या या निर्णयावर फ्रान्समधील तिच्या आप्तांनी तिला वेड्यात काढले पण व्हनेसा आपल्या निर्णयावर ठाम होती. 

European girl  on a spiritual location at India
Vanessa while on her India tour

European girl at Indian historic monument
Vanessa on her India tour 

व्हनेसा उत्कृष्ट ड्रायव्हर आहे व आपल्या Caravan गाडीतून तिने काही काळ संपूर्ण भारत स्वत: गाडी चालवत पाहिला व अनूभवला आहे . आपल्या भारत भ्रमंतीत  व्हनेसाला गोमांतक भूमीचा शांत व निसर्ग रम्य दक्षिण प्रांत विशेष आवडला. कोविड साथीच्या लॉकडाऊ काळात व्हनेसा ने दक्षिण गोव्यात Eco friendly Resort बांधण्याच्या प्रकल्पावर काम सुरू केले. आज  तिचा हा रेसॉर्ट प्रकल्प साकार झाला आहे. Hem Eco Farm and stay Resort या  तिच्या Resort प्रकल्पाला नवनवीन सुविधा व जोड प्रकल्प देण्यात ती सध्ध्या प्रयत्नरत आहे. 

आध्यात्म आणि प्राणि प्रेम

व्हनेसा ची भगवान शिव यांच्यावर विशेष श्रद्धा आहे. रोज नेमाने ती अग्नीहोत्र हवन करते. ती स्वतः रेकी मास्टर व हीलर आहे व तिचे हीलिंग चे वर्ग ही सुरू असतात.  व्हनेसा ने सुरु केलेले कानकोण येथील Hem Eco Farm and stay रेसॉर्ट दोन एकर च्या विस्तीर्ण परीसरात पसरले आहे . वर एका बाजूला मुख्य रस्ता व  खाली तलपोना नदीचा काठ यांच्या मधोमध असलेल्या उतरंडी वर हे रेसॉर्ट आहे. आजुबाजुच्या परीसरात दाट जंगल आहे. 

जंगली प्राण्यांच्या भीती बद्दल तिला विचारले असता ” माणसांपेक्षा जंगली प्राणी कमी हिंस्त्र असतात ” असं  उपरोधिक उत्तर व्हनेसा देते. 

 आपल्या रेसॉर्ट मधे विविध प्राणी आणन्याचा तिचा मानस आहे. तूर्तास काही बदके ,एक कुक्कुटपालन केंद्र व पाळीव कुत्री तिने पाळल्याचे पहावयास मिळते. जंगलातील माकडांचे ही वरचेवर दर्शन इथे होत असते. प्राण्यांच्या संगोपन व सानिध्यामुळे माणुस grounded रहातो असे व्हनेसा म्हणते.

Hem Eco friendly Resort चे Unique location : नदी-समुद्र संगमावर स्नान 

काणकोण येथील तलपोना नदीच्या अगदी काठावर व्हनेसा चे हे  इकोफ्रेंडली रेसॉर्ट आहे. रेसॉर्ट ला लागूनच असलेल्या हिरव्या डोंगराच्या पायथ्याला इंग्रजी U आकारात वळन घेत तलपोना नदी पुढे अरबी समुद्रात विलीन होते. हा नदी व समुद्राचा संगम आहे ज्याला इंग्रजीत Estuary म्हणतात. अशा ठिकाणाला Bio Diversity चा Hot Spot मानले जाते. इथले पाणि खारे व गोडे असे संमिश्र असते. या पाण्यात माश्यांचे प्रजनन मोठ्या प्रमाणात होत असते.  समुद्राच्या भरती ओहोटी नुसार इथे तलपोना नदीचे पात्र ही दीवसातून एकदा फुलून गेलेले पहावयास मिळते.  नदी ला खूप खोली नसल्याने इथे नदी स्नानाचा वेगळा अनुभव ही घेता येतो.
Two friends having a cozy chat on a River bank
Hem Eco friendly Resort ला लाभलेला तलपोना नदीचा काठ

माती व बांबू चा वापर करून बांधलेली इको-फ्रेंडली निवास व्यवस्था 

सस्टेनेबल म्हणजेच नैसर्गिक व टिकाऊ साहित्य वापरून बांधलेली येथील कॉटेजेस परिसराच्या निसर्गसौंदर्यात एकरूप होतात. प्रत्येक निवासस्थानात आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत, जेणेकरून तुमचा इथला मुक्काम आरामदायी आणि आनंददायी होईल.  

निसर्गाच्या समीप जगण्याचा अनुभव नक्की घ्या

हेम इको फार्म आणि स्टे (Hem Eco Farm and stay) या South Goa च्या काणकोण येथील रिसॉर्ट मधे  राहून तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात शांत आणि जीवनाचा अनुभव घेऊ शकता:  

साहस आणि मनोरंजन  

येथे विविध रोमांचक आणि आरामदायी उपक्रम अनुभवता येतील:  

✔ जवळच्या जंगलात निसर्ग भ्रमण आणि पक्षीनिरीक्षण  

✓ तलपोना नदीच्या संथ वाहत्या प्रवाहातून नौका विहार

✓ नदीवरील मासेमारी चा अनुभव

✔ तलपोना नदीकाठी निसर्गाच्या सान्निध्यात योग आणि ध्यानधारणा सत्रे  

✔ हिरव्यागार व शांत परीसरात सायकल सफर 

✔  योग साधना व Healing सेशन चे वर्ग जे  व्हनेसा स्वतः चालवते.

✓ कयाकिंग (Kayaking) स्व/ एकल‌ नौकाचलन

येथे कसे पोहोचाल?  

हेम इको फार्म आणि स्टे(Hem Eco Farm and stay) South Goa Resort  हे दक्षिण गोव्यात मनोहर पर्रीकर काणकोण बायपास रस्त्यावर स्थित आहे.  

– दाबोळीम विमानतळापासून: सुमारे ४५ किमी

– मडगाव रेल्वे स्थानकापासून: सुमारे ३५ किमी 

आपण ट्रेन ने‌ आल्यास : मडगाव रेल्वे स्थानका वरून‌ १५० रूपयांत रिक्षा वा बाईक टैक्सी ने बस स्टॅण्ड पर्यंत व तिथून बसने काणकोण चौक बस स्थानका पर्यंत येता येते. बस स्थानका पासून १० कि मी अंतरावर‌ हे रेसॉर्ट आहे. 

स्वतः चे वाहन नसल्यास: स्थानिक कदंबा बसने मडगाव हून Hem Eco Farm and stay ला पोहोचता येतं

तरूण Backpackers कडे स्वतः चे वाहन नसल्यास इथे पोहोचणे किंचित प्रयास पूर्ण होते पण जिकीरीचे नाही .हा प्रवास अनुभव स्वतःला भौतिक वादी जगण्यापासून निसर्ग वादाकडे नेणारा असाच ठरतो आणि सार्थक ही ठरतो.   

मडगाव ला ट्रेन ने उतरल्यास तिथून बाईक टैक्सी ने मडगाव बस डेपो ला जावून रेसॉर्ट पर्यंत जाणारी बस पकडावी लागते.  काही बसेस काणकोण च्या चौंडी स्थानका पर्यंत आपल्याला सोडतात जे रेसॉर्ट पासून अंदाजे १० कि मी आहे  तर काही बसेस थेट रेसॉर्ट पर्यंत ही जातात ज्यांची frequency थोडी कमी आहे.

निष्कर्ष 

हेम इको फार्म आणि स्टे रिसॉर्ट( Hem Eco Farm and stay)हा South Goa येथील एक अद्वितीय आणि निसर्गसंपन्न रिसॉर्ट आहे. तुम्ही निसर्गप्रेमी असाल, साहस आवडत असेल किंवा केवळ शांतपणे निसर्ग अनुभूती चा आनंद घेण्यासाठी जागा शोधत असाल तर हे ठिकाण तुमच्यासाठीच आहे!  

दक्षिण गोव्याच्या खऱ्या सौंदर्याचा अनुभव घ्यायचा असेल तर व्हनेसा च्या या हेम इको फार्म आणि स्टे रिसॉर्टला अवश्य भेट द्या! 

तुमच्या मुक्कामासाठी बुकिंग करा:

बुकिंगसाठी संपर्क : गुरूशरण – +91 98779 88244 , +91 7219313811

Email: hemecovillage@gmail.com

Address: Cancona, Sadolxem, South Goa Pin – 403702

Leave a Comment