हा मानवतेचा अपमान – Ghibli च्या मियाझाकींचे दशका पूर्वीचे वक्तव्य
![]() |
Ghibli च्या हायाओ मियाझाकी यांचे चित्र |
AI निर्मित Ghibli च्या Animation चित्रांची copy मियाझाकी यांनी दहा वर्षांपूर्वी पाहिली होती. परिणाम प्राथमिक स्वरूपात होते . Ghibli चे सह प्रवर्तक हायाओ मियाझाकी तेंव्हाच म्हणाले होते – हा मानवतेचा अपमान आहे. आज Ghibli ने Open AI वर copyright अंतर्गत खटला चालवला आहे. या खटल्याचा निकाल AI च्या वाटचालीसाठी निर्णायक ठरणारा आहे.
स्टुडिओ जिबलीचा इतिहास आणि कलेतील मानवीयता जोपासण्याचा दृष्टीकोन
स्टुडिओ जिबली Ghibli हा एक जगप्रसिद्ध जपानी एनिमेशन स्टुडिओ आहे, जो १९८५ मध्ये हायाओ मियाझाकी, इसाओ ताकाहाटा आणि तोशियो सुझुकी यांनी स्थापन केला. हा स्टुडिओ त्याच्या भावनाशील व कलात्मक चित्रपटांसाठी ओळखला जातो. “स्पिरिटेड अवे”, “माय नेबर टोटोरो”, “हाउल्स मूव्हिंग कॅसल” सारखे जिबली चे चित्रपट जगभरातील प्रेक्षकांना भुरळ घालतात.
२००३ च्या Oscar ने दिली जागतिक ओळख
Ghibli स्टुडिओचे संस्थापक हयाओ मियाझाकी हे एक दूरदर्शी दिग्दर्शक आहेत, ज्यांनी स्पिरिटेड अवे सह एनिमेशन इतिहासातील काही सर्वात प्रतिष्ठित आणि लोकप्रिय चित्रपट निर्माण केले आहेत.
२००३ मध्ये Spirited Away या चित्रपटाने अकादमी पुरस्कार (सर्वोत्कृष्ट एनिमेटेड फीचर) जिंकला होता.
. या चित्रपटाच्या यशामुळे केवळ स्टुडिओ घिबलीची जागतीक पातळीवर ओळख वाढली नाही तर उच्च दर्जाचे, कल्पनारम्य ऍनिमेशन तयार करण्याच्या त्यांच्या क्षमतेचीही पुष्टी झाली.
सामाजिक बांधिलकी व मानवता तत्व
स्टुडिओ जिबलीच्या चित्रपटांमध्ये निसर्गाचे सौंदर्य, मानवी भावना आणि काल्पनिक जगाचे पण समृद्ध असे चित्रण असते. हायाओ मियाझाकी यांच्या चित्रपटांमध्ये पर्यावरणाचे संवर्धन, शांतता आणि स्त्री सक्षमीकरण यासारख्या विषयांना प्राधान्य दिले जाते. प्रत्येक चित्रपट हा परीश्रमपूर्वक रित्या हाताने काळजीपूर्वकपणे रेखाटलेल्या एक एक फ्रेम्सने बनलेला असतो. यात कुठेही संगणक तंत्राचा वापर नसतो ज्यामुळे जिबलीचे चित्रपट एका जिवंत कलाकृतीसारखे वाटतात.
AI द्वारे स्टुडिओ जिबली शैलीचे पुनर्निर्माण: एक वादग्रस्त ट्रेंड
अलीकडे, OpenAI च्या GPT-4o या नवीन AI इमेज जनरेटरमुळे सोशल मीडियावर स्टुडिओ जिबली शैलीतील प्रतिमांचा एक वादग्रस्त ट्रेंड सुरू झाला आहे. यामध्ये लोक त्यांच्या स्वतःच्या फोटोंना “Ghiblify” करत आहेत, म्हणजेच त्या फोटोंना स्टुडिओ जिबलीच्या एनिमेशन शैलीमध्ये रूपांतरित करत आहेत .
हा ट्रेंड का वादग्रस्त आहे?
1. कलाकाराच्या दृष्टिकोनाचा विरोध: हायाओ मियाझाकी यांनी २०१६ मध्ये AI जनरेटेड आर्टवर टीका करताना म्हटले होते की, ” this is an insult to humanity”. मियाझाकी मानवी हाताने साकारलेल्या कलेचे समर्थक आहेत आणि AI द्वारे त्यांच्या मानवीय शैलीचे अनुकरण करणे हे त्यांच्या ‘कला विषयक तत्त्वज्ञानाच्या’ विरुद्ध आहे .
2. कॉपीराइट चिंता: AI द्वारे स्टुडिओ जिबलीच्या शैलीतील प्रतिमा तयार करणे हे कॉपीराइट कायद्यांशी संबंधित गंभीर प्रश्न निर्माण करते .
3. ऊर्जेचा वापर: AI इमेज जनरेशनसाठी मोठ्या प्रमाणात ऊर्जेचा वापर होतो, जो स्टुडिओ जिबलीच्या पर्यावरणविषयक तत्वाशी विसंगत आहे .
समाजाची प्रतिक्रिया
या ट्रेंडला काही लोकांनी मनोरंजक म्हणून स्वीकारले आहे. OpenAI चे CEO सॅम अल्टमन यांनीही त्यांच्या X (पूर्वीचे ट्विटर) प्रोफाइल पिक्चरला जिबली शैलीत रूपांतरित केले आहे . परंतु, कलाकार आणि जिबली चित्रपट प्रेमींनी याला मियाझाकी यांच्या कलात्मक वारशाचा अपमान म्हणून आल्टमन यांच्यावर टीका केली आहे .
निष्कर्ष
स्टुडिओ जिबलीच्या Ghibli चित्रपटांमधील जादू ही त्याच्या कलाकारांच्या समर्पणातून निर्माण झालेली आहे. AI द्वारे त्याच्या शैलीचे अनुकरण करणे हे तांत्रिकदृष्ट्या प्रभावी असले तरी, कलाकारांचे समर्पण आणि मानवी कष्ट यांच्या दृष्टीने ही चर्चेची बाब आहे. भविष्यात AI आणि कलेचे संबंध कसे विकसित होतात हे पाहणे मनोरंजक ठरेल.
जाता जाता
Ghibli चा उच्चार घिबली, गिबली की जिबली ?
“Ghibli” (スタジオジブリ) या जपानी शब्दाचा योग्य उच्चार “जिबली”(Jibli) आहे, “गिबली” किंवा “घिबली” नाही.
उच्चाराचे तपशील:
1. जपानी भाषेतील उच्चार : जपानीमध्ये “ジブリ” (Jiburi) असे लिहिले जाते आणि “जि-बु-री” अशा स्वरांनी उच्चारले जाते.
– “जि” (Ji) – “ज” हा व्यंजन आणि “ि” हा ह्रस्व स्वर.
– “बु” (Bu) – “ब” हा व्यंजन आणि “ु” हा ह्रस्व स्वर.
2. इंग्रजी/आंतरराष्ट्रीय उच्चार: बहुतेक देशांमध्ये “Ghibli” हे “जिबली”(Ghibli) असे उच्चारले जाते, कारण स्टुडिओने स्वतः हा उच्चार अधिकृतरित्या मान्य केला आहे.
गोंधळ का होतो?
– “Ghibli” हा शब्द इटालियन शब्द “Ghibli” (उच्चार: गिबली) वरून घेतला आहे, जो एका प्रकारच्या वाऱ्याला उद्देशून आहे. पण जपानी भाषेतील लिपीमुळे त्याचा उच्चार “जिबली” झाला.
– मराठी/हिंदीमध्ये “G” चा उच्चार “ग” असल्याने काही लोक चुकीचे “गिबली” म्हणतात.
Ghibli स्टुडिओची उच्चाराबाबत अधिकृत स्पष्टता:
स्टुडिओ जिबलीने अधिकृतपणे सांगितले आहे की त्यांच्या नावाचा उच्चार “जिबली” (Jiburi) आहे. म्हणून, लेखातील “Ghibli” चा उच्चार “जिबली” (Jibli) असे समजावे.
![]() |
कला क्षेत्रात AI चा प्रवेश सूचित करणारे चित्र |
.
.