विनोद खन्ना : आठवणीची रांगोळी
Vinod Khanna यांना भेटण्याचा योग ९० च्या दशकात आला होता. भारतीय बाजारात मोबाइल च्या ही आधी Pager हे Messaging Device आले होते. या pager च्या उपयुक्तते बाबत विनोद खन्ना एक bite देणार होते.
Written by Avinash Bhanu Asha Ghodke
मोबाईल भारतात येण्या आधी ९० च्या दशकाच्या मध्यावर भारतात पेजर्स आले होते. माचिस सारखी छोटी डबी ज्यावर मेसेज पाठवता येत. ही डबी कमरेच्या पटट्याला लावली जायी. या पेजर्स ची उपयुक्तता समाजातल्या वेगवेगळ्य प्रतिष्ठितांकडून बाईट्स च्या रूपात व्हीडीओ रेकॉर्ड करायची असं असाईनमेंट होतं. आमचा equipment hiring चा व्यवसाय होता . नुकताच भारतात आलेला Sony Beta Cam Camera चं सेट अप आम्ही झी टीव्ही ला भाड्याने द्यायचो. Zee tv च्या क्रू बरोबर मी ही असायचो. हींदूजा हाॅस्पिटल च्या एका मोठ्या डॉक्टरांची बाईट घेवून आम्ही थेट मलबार हील वरील विनोद खन्नांच्या फ्ल्याटवर पोहोचलो. प्रशस्त व भरपूर उजेड असलेला हॉल होता. मोठ्या फ्रेंच विंडोज मधून दूरवर महालक्ष्मी चा रेसकोर्स दीसत होता हे विशेष . विनोद खन्ना यांना हॉर्स रेस चा छंद होता म्हणून त्यांनी हा व्ह्यू असलेला फ्ल्याट घेतला असणार असे वाटले. हॉल मधे सोफा सेट भोवती स्टड फार्म मधे असते तशी सागवान लाकडांच्या फळ्यांची रेेलींग लावून चौकट बनवली होती. या चौकटीतून आत जायला फळ्यांचे छोटे चौकोनी गेट ही होते. ते ढकलून आम्ही आत सोफ्यावर जावून बसलो. विनोद खन्ना आले. काळी जीन्स, ढगळ पांढरा शर्ट पायात स्लीपर्स. ते रंगाने सावळे होते. त्यांच्या वागण्यात खूप मोकळेपणा नव्हता पण बढेजाव ही नव्हता. विचारी शांत व प्रायव्हेट टाईप वाटले. पेजर च्या उपयुक्ततेवर ते काही वेळ बोलले. स्टिल फोटोग्राफर फोटो काढायला सरसावला तेंव्हा त्यांनी फोटो मात्र काढू दीला नाही. फोटोचा उपयोग जाहीराती सारखा होवू शकतो असे त्यांना वाटले. मधेच त्यांचे लक्ष माझ्या हातातल्या Betacam video Camera वर गेले. हा तो नवीन टेक्नोलॉजी चा बिटाक्याम आहे का असे म्हणत त्यांनी कॅमेरा माझ्या हातून घेतला. एखाद्या कॅमेरामन प्रमाणे ते सहज कॅमेरा हँडलला पकडून गोल फिरवत बराच वेळ निरखत होते. लेन्स व सेटिंग चा पॅनल बघून त्यांनी ‘ ये किसका कॅमेरा है?’ असे कुतुहलाने विचारले . तेंव्हा मुंबईत तीन चार लोकांकडेच हा Sony Betacam Camera होता. मी पटकन ‘हमारा है !’ असे म्हटले. त्यांनी अलिप्त भावाने पुन्हा क्यामेरा माझ्याकडे दीला. Vinod Khanna यांना photography ची आवड होती व आपल्याकडे विविध प्रकारच्या video camera चे संग्रहण त्यांनी केले होते. आम्ही निघालो तेंव्हा स्वतः दारापर्यंत आम्हाला सोडायला ते आले होते. अनेक चित्रपटांत दिसलेला त्यांचा स्वतःचा पांढरा घोडा ते बिल्डिंग खाली पार्किंगमधे बांधतात असे ऐकुन होतो पण त्या दिवशी तो घोडा माझ्या नजरेस पडला नाही.
डाकू पासून प्रोफेसर पर्यंत च्या भूमिका
पडद्यावर डाकूच्या भूमिकेत घोड्यावर बसलेले Vinod Khanna जबरदस्त वाटायचे. हेच विनोद खन्ना सायकल चालवणारा मध्यमवर्गीय माणूसही सहजतेने रंगवायचे. त्यांची एक प्रोफेसरची भूमिका तर मला खूप आवडलेली “रुक जाना नहीं तू कहीं हारके ” असं थीम सॉंग त्यांच्यावर चित्रित झालं होतं. अमिताभ बच्चन बरोबर त्यांची जोडी विशेष जमायची. पुढे करीअर ऐन भरात असताना ते अचानक चित्रपट सृष्टीला सोडून रजनीश यांच्या आश्रमात राहू लागले . “असं झालं असतं तर विनोद खन्ना आज या पदावर असते ..किंवा तसं झालं असतं तर तसे झाले असते” असे तर्क विनोद खन्नांबद्दल आज ही केले जातात. पण विनोद खन्ना यांचे exclusive पणच असे बोलून आपण अधोरेखित करीत असतो असे वाटते .
career journey- खलनायका पासून हीरो पर्यंत
सुरूवातीला खलनायक म्हणून यशस्वी अशी अभिनय कारकिर्द सुरू करून विनोद खन्ना पुढे नायक झाले होते ते ही अशा काळात जेंव्हा प्रेक्षक पडद्यावरील इमेजला फारच गंभीरतेने घेत. प्रेक्षकांनी या खलनायकाला नायक म्हणून स्वीकारले. विनोद खन्ना अध्यात्मिक वाटेवर जावून पुन्हा एकदा चित्रपट सृष्टी कडे वळले तेंव्हाही प्रेक्षकांनी त्यांना स्वीकारले. Hollywood च्या God Father वर बेतलेला आणि माटुंग्याच्या वरदा राजन च्या जीवन पटाला स्पर्श करणारा चित्रपट दयावान (१९८८) विनोद खन्नाचे जवळचे मित्र असणारे फिरोज खान यांनी निर्मित व दिग्दर्शित केला होता. हा कमल हसन च्या मूळ तमिळ चित्रपट नायकन चा रिमेक होता. यातील वयोवृद्ध डाॅन ची भूमिका Vinod Khanna यांनी मोठ्या ताकदीने उभी केली होती. आपल्या तरूण मुलाची वैमनस्यातून झालेली हत्या पाहून या डाॅन ची झालेली मानसिक अवस्था विनोद खन्नानी ज्या बारकाव्याने पडद्यावर साकारली त्याला तोड नाही.
Vinod Khanna यांचे portrait मी रांगोळी medium मधे काढले होते
खन्ना यांच्या याच second innings काळात प्रसिद्ध छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष यांनी विनोद खन्ना यांचे एक अप्रतीम पोर्ट्रेट क्लिक केले होते, त्याच पोर्ट्रेट वरून मी एका रांगोळी स्पर्धेत रांगोळी माध्यमातून त्यांचे ते पोर्ट्रेट चितारले होते. ते रांगोळी चित्र या लेखा सोबत पोस्ट करत आहे.. इमारतीच्या पार्किंग लॉट मधे घोडा बांधणारे व त्याच वेळी येवू घातलेल्या डिजिटल क्रांती बद्दल आशादायक बोलणारे विनोद खन्ना आज आपल्यात नाहीत . एका शुभ्र अलिप्त आणि उमद्या घोड्यासारखे ते कायम स्मरणात राहतील एवढे नक्की
Some readers may not understand Rangoli medium painting. For their convenience sharing a demo reel of Rangoli Art below. The work shown in above picture is mine but the work shown in below video is not mine.
The demonstration video shows Technique and process of Rangoli Art- Courtesy YouTube






