Gwalior च्या Dr Kunal Adhikary ची नृत्यातील मास्टरी पाहून नेटकरी झाले मोहित
Gwalior च्या Dr Kunal Adhikary ची नृत्यातील मास्टरी पाहून नेटकरी झाले मोहित
नृत्यातील नजाकत व अदाकारी हा नर्तका चा आत्मीय आविष्कार असतो जिथे स्त्री पुरुष भेदाची सीमारेषा अलगद पुसली जाते
![]() |
Screen shot of Dr Kunal Ahikary’s |
Viral Dance video on Instagram as he Auditions for Gwaliors local talent hunt show.
ग्वाल्हेर Gwalior च्या स्थानिक SUPER 30 या नृत्य स्पर्धेतAudition देताना कुणीतरी कुणाल च्या नृत्याचा व्हिडिओ शूट केला आणी Instagram वर share केला.
या व्हिडिओ मधे कुणाल पूर्ण बाह्यांचा इन केलेला निळा शर्ट व पॅन्ट आणि पायात black shoes अशा executive किंवा formal वेशात ही अगदी सहज पणे भूल भूलैया या हिंदी चित्रपटातील ‘मेरे ढोलना’ (Mere Dholna song from Bhool Bulayya film) गाण्यावर शास्त्रीय नृत्य करताना दिसतोय. कुणालचे पदन्न्यास , मुद्रा व भाव दर्शन पाहाणार्याच्या मनाला मोहून टाकते. ही short clip @ragh.padukone या Instagram account वर शेअर झाली आहे. कुणालचे पदलालित्य व भाव विभ्रम एवढे मोहक आहेत की एकदा पाहून सुद्धा ही clip पुन्हा हमखासपणे पाहिली जाईल.
तो मीच आहे
कुणालच्या या clip वर नेटकर्यांच्या भरभरून स्तूतीपर comment येत आहेत. एका कमेंटमधे “या नर्तका बद्दल कुणाकडे काही माहिती आहे का?” असे विचारले गेल्यावर कुणाल ने स्वतः ” तो मीच आहे!”असे उत्तर दिले आणि नेटकर्यांना एक नवा कलाकार माहित झाला. पुढील एका comment च्या त्याच्या उत्तरावरून तो ITM UNIVERSITY , Gwalior येथे प्राध्यापक असल्याचे कळते.
कुणालचे Instagram अकाऊंट
Instagram वर कुणालचे @kunal_art_lover हे account आहे व त्या अकाऊंट वरही कुणालने हा व्हीडिओ share केला आहे.कुणालचे पूर्ण नाव कुणाल अधिकारी Kunal Adhikary आहे व तो नावापूढे Dr लावतो यावरून त्याने PhD केलीय हे लक्षात येते
सदर स्पर्धेत कुणाल अंतिम Nomination मधे आला आहे. मनोरंजन जगतात कुणाल पुढे वाटचाल करेल हे त्याच्या पदन्न्यासावरून लक्षात येतंच आहे. कुणालचा हा viral dance video या लिंक वर नक्की पहा.
हे ही पहा:
झारखंड च्या अमराठी बहिणींची मराठी लावणी ‘वाजले की बारा’ Unplugged : Lawani- wajle ki bara