PRADA ने दिली कबूली : आमची चप्पल कोल्हापुरी चपलेने Inspired -महाराष्ट्र चेंबर अॉफ कॉमर्स ला केले स्पष्ट

PRADA ने अखेर आपण फॅशन परेडमध्ये प्रदर्शित केलेल्या चपलांचे डिझाईन हे कोल्हापुरी चप्पल ने प्रेरित असल्याचे मान्य केले आहे. प्राडा म्हणते या चपला अजूनही विकसन‌ अवस्थेत आहेत व त्या त्यांनी बाजारात विक्रीसाठी अजून उपलब्ध करून दिल्या नाहीत

प्राडा व कोल्हापुरी चप्पल विवाद: महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स (MACCIA)ची मध्यस्थी

भारतीयांनी PRADA च्या फॅशन शोमध्ये हुबेहूब कोल्हापुरी चप्पल सारख्या दिसणाऱ्या चपला पाहून प्राडावर “सांस्कृतिक चोरीचा” आरोप केला. इंटरनेट वर लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. हे पाहाता महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स , इंडस्ट्री अॅंड अॅग्रीकल्चर (MACCIA) या व्यापारी संघटनेने योग्य पावले उचलली व थेट इटलीतील प्राडा च्या व्यापार विभागाशी संपर्क साधला.

प्राडा चे MACCIA ला उत्तर

प्राडा ने महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स (MACCIA )ला आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की शो मधे सादर झालेल्या चपला यांचे डिझाईन हे महाराष्ट्राच्या प्रसिद्ध कोल्हापुरी चपलांनी प्रेरित आहे पण या चपलांच्या डिझाईन वर अजूनही काम होत आहे व त्या विकसन‌शील अवस्थेत आहेत. शो मधे दिसलेल्या सदर चपलांमधील कुठलेही मॉडेल अजून प्राडा कडून विक्री साठी बाजारात उपलब्ध केले गेले नाही.प्राडा चे अधिकृत वक्तव्य…“We acknowledge that the sandals featured in the recent Prada Men’s 2026 Fashion Show are inspired by traditional Indian handcrafted footwear, with a centuries-old heritage. We deeply recognise the cultural significance of such Indian craftsmanship,”या वक्तव्यात शेवटी प्राडा म्हणते “आम्ही सादर‌ केलेल्या चपला या पारंपरिक भारतीय हस्तनिर्मित चपलांपासून प्रेरित आहेत ज्यांची अनेक शतकांची जुनी परंपरा आहे. या हस्तकलेचे सांस्कृतिक महत्त्व आम्ही मनापासून मान्य करतो.”

MACCIA ची भूमिका

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष ललित गांधी म्हणाले की या संदर्भात आम्ही प्राडा ला पत्र पाठवून खुलासा मागितला होता. भारतीय हस्तकारागीर व हस्तकला उद्योगाच्या हक्क संरक्षणासाठी हा पाठपुरावा आम्ही केली.शनिवारी PTI शी बोलताना ललित गांधी यांनी आपली भूमिका स्पष्ट करत सांगितले की “ कोल्हापुरी चप्पल ही एक अत्यंत महत्वपूर्ण सांस्कृतिक ठेव आहे. या चपलांना नवीन विक्री बाजार मिळणे आवश्यक आहे आणि असे होताना कोल्हापुरी चपलांना योग्य recognition (ओळख) मिळणे ही तितकेच आवश्यक आहे.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ने मांडलेले ठळक मुद्दे

प्राडा ला लिहिलेल्या आपल्या पत्रात MACCIA ने कोल्हापुरी चपलांच्या कारागिरांसाठी प्राडाकडे संशोधन (exploration) सहकार्य (collaborations) आणि योग्य मोबदला (fair compensation) या तीन बाबींची मागणी केली‌ व‌ याचबरोबर फॅशन व्यवसायातील नैतिकता पाळून‌ पारंपारिक कला कौशल्य व सांस्कृतिक अधिकारांचा आदर बाळगण्याची अपेक्षा केली.

प्राडा चे लॉरेन्झो बर्टेली म्हणाले

प्राडा च्या वतीने लॉरेन्झो बर्टेली ( Group head, Corporate and Social responsibilities) यांनी म्हटले की “स्थानिक कारागिरांसाठी आम्ही सांस्कृतिक देवाणघेवाण व संवाद प्रस्थापित करण्यासाठी प्रार्थमिकता देतो.यापूर्वी ही आम्ही भारतीय कारागिरांसोबत काम केले आहे व त्यांच्या कामाबद्दल मोबदला व नाव त्यांना दिले आहे “यापुढेही होणाऱ्या सहकार्य व‌ संवादाचे आम्ही स्वागत करतो असे बर्टेली म्हणाले.

कोल्हापुरी चपलेला 2019 मधेच GI Status

ललित गांधी यांनी MACCIA च्या वतीने लिहिलेल्या आपल्या पत्रात कोल्हापुरी चप्पलला भारत सरकारने 2019 मधे GI status (Geographical Indication status) दिल्याचे नमूद केले आहे. तसेच कोल्हापूरी चप्पल ही फक्त एक प्रांतीय ओळख नसून ती हजारो कुटुंबांचे उदरनिर्वाहाचे साधन आहे असेही पुढे ललित गांधी यांनी पत्रात नमूद केले आहे.

खासदार धनंजय महाडिक भेटले होते मुख्यमंत्र्यांना

खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापुरी चप्पल कारागिरांचे एक शिष्टमंडळ घेवून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुरूवारीच भेट घेतली होती . प्राडा कडून झालेल्या अनपेक्षित कृती बद्दल सरकार कडून कारवाई व्हावी असे विनंती पत्र मुख्यमंत्र्यांना देण्यात आले होते.इंटरनेट वरील लोकांच्या तीव्र प्रतिक्रियांमुळे अखेर सरकारी स्तरावर हालचाली झाल्या . MACCIA ने प्राडा ला केलेल्या संपर्काला प्राडा करून योग्य प्रतिसाद मिळाला आहे.

परामर्श

गेली काही शतके गावरानांतून चालणारी कोल्हापुरी चप्पल एका अंतरराष्ट्रीय platform वर दिमाखात पाऊल टाकते हे एक सुचिन्ह आहे. कोल्हापुरी चप्पल उद्योग व त्यातील कामगारांसाठी सुदिन येण्याची ही नांदी आहे. प्राडा ने आपला दिलेला शब्द पाळून कोल्हापुरी बनवणाऱ्या किरागिरांना योग्य मोबदला व श्रेय देत कोल्हापुरी चपलेचा व्यापार वाढवावा हीच अपेक्षा..

हे ही वाचा

फ्रेंच युवती चे भारत प्रेम: साऊथ गोव्यात चालवते Eco friendly Hem Resort

कोपि लुवाक – जंगली मांजराच्या विष्ठेतून बनणारी महागडी कॉफी

Author Profile

Storyteller by instinct, screenwriter by choice. Sharing thoughtful news and interesting facts
At pinga9.com

Leave a Comment