Avinash Ghodke

Screenwriter and Lyricist with 20 years of experience in Bollywood and Marathi cinema.His creative writing examines the contradictions of lived experience, while his journalism uncovers humanism beneath headlines.

संत तुकाराम आणि शेक्सपिअर – 8 वर्षांची समकालीनता – Ashadhi Special

संत तुकाराम आणि शेक्सपिअर: 1608 ते 1616 – इंद्रायणी काठचे देहू गाव आणि Avon नदी काठचे Stratford

Saint Tukaram – Ashadhi Special : १६०८ साली संत तुकाराम यांचा देहू मध्ये जन्म-आणि सन १६१६ मधे शेक्सपियर चा मृत्यू, या तारखा पाहता संत तुकाराम आपल्या बालपणीची आठ वर्षे इंद्रायणी काठच्या देहू मध्ये जगत असताना त्या काळात शेक्सपियर हा महान इंग्रजी नाट्यकार आपल्या आयुष्याची शेवटची व निवृत्ती ची काही वर्षे(१६११-१६१६) इंग्लंडमध्ये स्ट्राईटफर्ड या Avon नदी  काठच्या गावात रहात होता. 

1608 – शेक्सपियर च्या नातीचा व संत तुकारामांचा जन्म एकाच वर्षी (Shakespeare and Saint Tukaram -8 years Contemporary)

सन १६०८ मध्ये देहू गावी बोल्होबांच्या घरी संत तुकाराम( Saint Tukaram)यांचा जन्म झाला. याच वर्षी तिकडे इंग्लंडमध्ये स्ट्राटफर्ड येथे शेक्सपियरची नात एलिझाबेथ हिचा जन्म झाला होता. शेक्सपियरची थोरली मुलगी सुझाना (Susanna) हिची ती पहिली मुलगी होती. एलिझाबेथ ही Shakespeare च्या वंशावळीतील शेवटची व्यक्ती‌ ठरली.

आपल्या नातीच्या जन्माच्या बारा वर्षांपूर्वी म्हणजे 1596 साली शेक्सपियर चा एकुलता एक मुलगा हॅम्नेट (Hamnet)वयाच्या अकराव्या वर्षी निधन पावला होता. आपल्या मुलाच्या मृत्यूनंतर बारा वर्षांनी १६०८ मधे झालेल्या नातीच्या जन्माने Shakespeare च्या दु:खावर फुंकर घातली असेल का?माहित‌ नाही पण इकडे देहू गावात बोल्होबांच्या घरी तुकारामांच्या जन्माचा आनंद नक्कीच साजरा झाला असणार.

काव्यमयता: शेक्सपियर च्या नाट्यात आणि तुकारामांच्या अभंगांतील साम्य दुवा

ब्रिटनमध्ये वरचेवर प्लेगच्या साथी येत असत. पण १६०३ मध्ये ब्रिटन मध्ये प्लेगची फार मोठी साथ आली होती. यात नाट्य व्यवसाय ठप्प झाला होता. या साथीनंतर आणि पुढे आपल्या नातीच्या जन्मा नंतर च्या काळात सण 1608 पासून शेक्सपियर च्या लेखन शैलीमध्ये काही अमुलाग्र बदल झाल्याची निरीक्षणे समीक्षक मांडतात.

सन १६०८ पासून पुढे जे काही शेक्सपियर चे लिखाण झाले आहे ते काव्यमयतेकडे (Poetic)झुकत असल्याचे दिसते. Venus and Adonis हे‌ प्रसिद्ध काव्य Shakespeare ने या काळात लिहिले. हा काळ म्हणजे Saint Tukaram यांचा जन्म व पुढे देहूतल्या बालपणाचा काळ होता ज्यांनी काव्यमय अभंगांतून जीवनाचे तत्त्वज्ञान व भक्ती मार्ग जगाला सांगितला.भागवत धर्माचा कळस अध्याय लिहिणारे संत तुकाराम “जगत् -गुरू” संबोधले गेले.

देहू मध्ये संत तुकाराम ( Saint Tukaram) अगदी लहान वयातच अध्यात्मिक किंवा भक्ती मार्गाला लागलेले दिसतात. वयाच्या पाच किंवा सातव्या वर्षी त्यांनी वारकरी संप्रदायातील गुरु श्री बाबाजी चैतन्य यांच्याकडून दीक्षा घेतली. आपल्या एका काव्यमय अभंगा मध्ये संत तुकाराम म्हणतात ….

बाळपणी गुरु माझा आला | दिला उपदेश विठ्ठलाचा ||

1616 मधे  संत तुकाराम यांचे पितृछत्र हरपले -आणि इंग्लंड मधे English Theatre चा पितामह निवर्तला

सन १६१६ साली Shakespeare यांचे इंग्लंडमध्ये निधन झाले अंदाजे त्याच वर्षी किंवा एक वर्ष आधी संत तुकारामांचे वडील बोल्होबा यांचे निधन झाले.
वडिलांच्या निधनानंतर आठ वर्षांच्या कोवळ्या वयाच्या तुकारामांवर घराची जबाबदारी पडली देहू गावातील आपल्या वडिलांचे दुकानदारीचे काम ते करू लागले.

देहू ते मुंबई पायी प्रवास

देहू व आसपासच्या गावातील काही वाणी (Grocery shop owners)एकत्रित पणे बॉम्बे अर्थात आजच्या मुंबईस वडाळा येथे मिठा च्या वखारींवर दुकानात विक्रीसाठी लागणारे मीठ घेण्यास पायी चालत येत असत. हा व्यापार-प्रवास संत तुकाराम ही करत. गाढवांच्या पाठीवर मीठाच्या गोण्या लादून घाटाच्या दुर्गम मार्गाने बॉम्बे ते देहू पायी चालत गाठले जाई. तुकारामांनी मुंबईतील वडाळ्यात विठ्ठल मूर्ती ची स्थापना ही केली आहे जिथे आज प्रती पंढरपूर म्हणवले जाणारे विठ्ठल मंदिर उभे आहे. त्या काळात बॉम्बे म्हणजे पोर्तुगीजांच्या इथल्या वसाहतीचे एक दुय्यम ठिकाण होते कारण पोर्तुगीजांचे मुख्य ठाणे तेंव्हा वसई होते. ब्रिटिशांचा भारतातील वसाहतवाद अजून सुरू व्हायचा होता. ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीने सूरत मधे जी पहिली वखार स्थापली ती संत तुकारामांच्या जन्म वर्षीच .

ब्रिटिश राजवटीचा जन्म आणि संत तुकाराम जन्म

१६०८ या संत तुकाराम( Saint Tukaram) यांचे जन्म वर्षीच ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने आपली पहिली वखार सुरत येथे स्थापित केली व भारतातील आपल्या व्यापारी कारकीर्दीचा शुभारंभ केला. एका अर्थी हा भारतातील ब्रिटिश राजवटीचा जन्म होता जे संत तुकारामांच्या जन्मवर्षीच झाला. Shakespeare च्या नाटक कंपनी मधील एखादा नट या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी मधे रुजू होवून भारतात आला असेल का?

१६०८ या संत तुकाराम( Saint Tukaram – Ashadhi Special) यांचे जन्म वर्षीच ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने आपली पहिली वखार सुरत येथे स्थापित केली व भारतातील आपल्या व्यापारी कारकीर्दीचा शुभारंभ केला. एका अर्थी हा भारतातील ब्रिटिश राजवटीचा जन्म होता जे संत तुकारामांच्या जन्मवर्षीच झाला. Shakespeare च्या नाटक कंपनी मधील एखादा नट या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी मधे रुजू होवून भारतात आला असेल का?

संत एकनाथांचा प्रभाव

संत तुकारामांच्या बालपणीच्या काळात महाराष्ट्रात निजामशाहीचे राज्य होते. पण निजामशाहीच्या सामाजिक पडसादांची नोंद कुठेही संत तुकाराम यांच्या संदर्भातील ऐतिहासिक नोंदीच्या कागदपत्रांमध्ये आढळून येत नाही. मात्र सांस्कृतिक व धार्मिक पातळीवर संत एकनाथांच्या अभंगांचा प्रचंड प्रभाव समाजावर या काळात दिसतो जो संत तुकाराम यांच्या कुटुंबावर आणि खुद्द तुकारामांवरही होता.

ब्रिटिश सरकारनेच पहिल्यांदा छापले संत तुकारामाचे साहित्य( Saint Tukaram Literature)

संत तुकारामांचे साहित्य हे १८७३ साली ब्रिटिश सरकारनेच संत तुकारामांच्या सन्मानार्थ प्रकाशित केले होते ही वस्तुस्थिती आहे. या आधी संत तुकारामांचे साहित्य पुस्तक रूपात प्रकाशित झाले नव्हते.संत तुकारामांच्या ४,६०७ अभंगांचा समग्र संग्रह ब्रिटिश सरकारने ‘इंदु प्रकाश प्रेस’ द्वारे प्रकाशित केला व याच्या पंचविश हून अधिक आवृत्त्या पुढे प्रकाशित झाल्या. या प्रकाशनाने संत तुकाराम यांचे आध्यात्मिक लेखन क्षेत्रातील अग्रणी स्थान सुनिश्चित झाले.

भारतातील ब्रिटिश आमदनीचा काळ तुकारामांनी पाहिला नाही तो काळ त्यांच्या जन्मानंतर २१० वर्षांनी म्हणजे १८१८ साली सुरू झाला. देहू पासून ३० एक किलोमीटर अंतरावरील पेशव्यांच्या शनिवार वाड्यावर तेंव्हा ब्रिटिश झेंडा फडकला होता.

ब्रिटिश हे वसाहत वादी होते पण ते मूलतः सुधारणावादी होते.‌ लॉर्ड एल्फिन्स्टन सारखा गव्हर्नर मराठी संत साहित्याचा अभ्यासक होता. पण असे असले तरी ब्रिटिशांच्या काही गव्हर्नर्स नी दडपशाही व अमानवीय अत्याचारी धोरणे इथे राबवली ज्याचा निषेध ब्रिटन मधे ब्रिटिश पार्लमेंट मधे ही केला गेला.‌(Saint Tukaram – Ashadhi Special)

बीटल्स या प्रसिद्ध ब्रिटिश बॅंड ची गाथेतली रुची

साठच्या दशकात प्रसिद्धीस आलेल्या Beatles या ब्रिटिश बॅंड चे वैशिष्ट्य असे होते की ते थोडेसे आध्यात्मिक कलाने आपले संगीत सादर करत. त्यांच्या आध्यात्मिक रुचीमुळेच त्यांनी 1968 साली भारत यात्रा ही केली होती. भारतीय अध्यात्म समजून घेताना बीटल्स चे ड्रमर सदस्य रिंगो स्टार यांच्या वाचनात संत तुकारामांचे इंग्रजी अनुवादित अभंग आले. संत तुकारामांच्या अभंग शैली ने ते बरेच प्रभावित झाले होते असे कळते.

शेक्सपियर (Shakespeare )च्या लेखणीतले अध्यात्म

साहित्य इतिहासात अजरामर ठरलेल्या शेक्सपियर(Shakespeare )व संत तुकाराम( Saint Tukaram) या दोन महान विभूती आहेत. दोघांची कर्म स्थळे भारत व ब्रिटन अशी वेगवेगळी तरी त्यांच्या संवेदनांचे अवकाश माणूस पणाने भारलेले आहे. शेक्सपिअर ने मानवी मनाचे कांगोरे टिपले तर संत तुकाराम यांनी मानवी मनातले देवत्व उजागर केले .

रूढीं विरुद्ध जावून बोलण्याची किंवा लिहिण्याची दोघांची धमक एकाच मुशीतली. शेक्सपियर ने अध्यात्मावर थेट असे भाष्य केले नसले तरी त्याच्या नाटकांच्या पात्रांसाठी त्याने लिहिलेले अनेक संवाद तुकारामांच्या अभंगाप्रमाणेच अध्यात्मिक भाष्य करतात असे दिसते.

उदाहरणार्थ:

मानवी गर्वावर भाष्य: शेक्सपियर आणि तुकाराम


 १. Measure for Measure (Isabella)
शेक्सपियर:
“Man, proud man,
Drest in a little brief authority,
Plays such fantastic tricks before high heaven
As make the angels weep.”
भावार्थ:
सत्ता मिळालेला माणूस गर्व करतो आणि पुढे त्याचे वर्तन इतके अतिरेकी होते की देवदूतही रडतात.


तत्सम अभंग: संत तुकाराम( Saint Tukaram Literature)


तत्सम अभंग: संत तुकाराम
“अरे देवा, तुज सांगु कोणता |
दुजा अंतरीचा खोटा ||”
“झाकली मुठ सव्वा लाखाची |
उघडतां धांदरटाची ||”
अर्थ:
माणूस वरकरणी मोठा व सत्त्वशील वाटतो, पण त्याच्या अंतःकरणात गर्व, अहंकार आणि खोटेपणा असतो.
 उघडपणे देवभक्त किंवा सज्जन असल्याचा देखावा करणाऱ्यांवर तुकाराम महाराजांनी कठोर पण सूक्ष्म भाष्य केलं आहे.


निर्मळ प्रार्थना भाव


🔹 २. Hamlet (Claudius’ Prayer)
शेक्सपियर:


“My words fly up, my thoughts remain below:
Words without thoughts never to heaven go.”

भावार्थ:
शब्द जर अंतःकरणातून आलेले नसतील, तर ती प्रार्थना स्वर्गात पोहोचत नाही.


तत्सम अभंग: संत तुकाराम


“देहासी नमवुनिया । मनु न वश होई तया ।।”
“मुखी म्हणे पांडुरंगा । अंतरी काही दुरंगा ।।”
अर्थ:
नम्रतेचा आव आणून प्रार्थना केली, पण मन शांत, शुद्ध नसेल, तर ती प्रार्थना व्यर्थ ठरते.
हा अभंग Hamlet मधील प्रार्थनेच्या अप्रामाणिकतेवर केलेल्या शेक्सपियरच्या भाष्याशी नातं सागतो.


दया भावाची महती

३. The Merchant of Venice (Portia – Mercy) शेक्सपियर:

तत्सम अभंग: संत तुकाराम


“The quality of mercy is not strained;
It droppeth as the gentle rain from heaven…
It is an attribute to God himself.”
भावार्थ:
दया ही बळजबरीची नसते. ती स्वाभाविक असावी, आणि ती स्वतः दैवी गुण किंवा देवत्व आहे.


“आपुला दोषु पाहावा | अवघा वंध्य तो क्षमावा ||”
“जैसी दृष्टि वैसें रूप | दया करणे पापभ्रुप ||”
अर्थ:
आधी आपले स्वतःचे दोष पहावेत आणि दुसऱ्याच्या दोषांवर पांघरून घालून माफ करावे. हेच खरं दयाळूपण
Portia चं विधान आणि हे अभंग — दोन्ही ‘दयेला’ ईश्वराचा गुण मानतात.

Shakespeare ने आपल्या नाट्यलेखनातून मानवी भाव भावनांचे गडद ढग आकारले आणि संत तुकाराम यांनी भक्ती च्या पाऊस धारांत भिजलेले चिंब हात थेट आभाळाला टेकले. या दोन महान शब्द प्रभूंचे केवळ आठ वर्षांचे समकालीनत्वाचे अन्वयार्थ उगाच शोधण्यात ही रोमांच आणि सार्थकता आहे.


टीप: वरील उदाहरणांतून कुठल्याही प्रकारची तुलना वा प्रभाव सूचीत करण्याचा उद्देश नसून शेक्सपियर व संत तुकाराम या महान विचारवंतांच्या वैश्विक विचारसरणीतील समांतर धागे शोधण्याचा प्रयत्न आहे.


हे ही वाचा:

➡️150 वर्षांपूर्वी शोधली मुंबई मिल कामगारांनी पावभाजी -Pav Bhaji ची Link अब्राहम लिंकन पर्यंत जाते

➡️पहिली Mumbai Local Train -उद्घाटनाला नाना शंकरशेठ हजर होते पण गव्हर्नर फॉकलंड गायब होते..

About The Author

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment