Avinash Ghodke

Screenwriter and Lyricist with 20 years of experience in Bollywood and Marathi cinema.His creative writing examines the contradictions of lived experience, while his journalism uncovers humanism beneath headlines.

Prada – छोट्याशा दुकानापासून जागतिक ब्रँड पर्यंत -Prada Luxury Fashion Brand चा इतिहास जाणून घ्या

Prada history – Prada ने कोल्हापुरी चप्पल सदृश चप्पल वेगळ्या नावाने आपल्या Prada Summer Show मधे प्रदर्शित केली होती. या कृतीमुळे भारतीयांचा रोष प्राडाने आपल्या वर ओढवून घेतला . या पार्श्वभूमीवर चर्चेत आलेल्या PRADA बद्द्ल जाणून घेणे औचित्यपूर्ण ठरेल . PRADA ची Brand History रंजक आहे.

Prada चा प्रवास – मारीओ प्राडा यांचे छोटे दुकान ते जागतिक ब्रांड – Prada history

Water colour sketch of Mario Prada the founder of Prada shows him sitting in his small shop

PRADA हा एक जगप्रसिद्ध इटालियन लक्झरी फॅशन ब्रँड आहे. त्याची स्थापना 1913 साली मिलान, इटली येथे श्री Mario Prada यांनी आपले बंधु Martino Prada यांच्या सोबत केली होती. सुरूवातीला हे एक छोटेसे चामड्याच्या वस्तू विकणारे असे मारीओ यांचे दुकान होते. ज्याला Fratelli Prada असे नाव होते. Fratelli शब्दाचा अर्थ ‘बंधू’- म्हणजे हे ‘प्राडा बंधू’ नावाचे दुकान होते.PRADA चे पहिलेच product ज्याने त्यांना प्रसिद्ध केले ते म्हणजे Fratelli Prada Trunk. प्राडा ची ही ट्रंक अर्थात मोठी पेटी ही एखाद्या compact कपाटा सारखी होती. या ट्रंक मधे अनेक कप्पे होते ज्यात कपडे व इतर सामान राहू शकत होते. 1913 च्या काळात ही एक नाविन्यपूर्ण कल्पना होती व ती उच्चभ्रू ग्राहकांच्या पसंतीस उतरली होती.‌ Prada ची Fratelli ‌Prada Trunk एक Status symbol म्हणून मिरवली जाऊ लागली होती.

Fratelli ‌Prada ट्रंक ने दिला राजेशाही दर्जा:‌Prada History

Fratelli Prada Trunk picture courtesy Google

Prada बंधूंची Fratelli Prada Trunk तिच्या वैशिष्ट्यपूर्ण रचने मुळे प्रसिद्ध झाली. उच्च दर्जाच्या चामड्याचा वापर करून या ट्रंका संपूर्णतः हाताने (Hand Crafted)बनवल्या जात. श्रीमंत समाजात ही Trunk म्हणजे एक Status symbol ठरली. याच ट्रंक च्या प्रसिद्धी मुळे Prada ला 1919 मधे इटली च्या शाही राजघराण्याचे Official Supplier to the Italian Royal House’ नियुक्त करण्यात आले. Prada च्या वाटचालीतील इतिहासातील हा मैलाचा दगड होता. याच घटनेमुळे Prada Brand ला पुढे Royal (राजेशाही) मानले जावू लागले.

मरिओ प्राडा च्या नातीने Prada ला Global Brand बनवले – Prada history

Prada इटली मधे शाही Brand होता पण जागतिक पातळीवर Global Brand होण्यासाठी सात दशकांचा काळ जावा लागला. 80 च्या दशकात Mario Prada यांची नात Miuccia Prada यांनी CEO म्हणून Prada ची धुरा वाहिली. त्यांनी आपल्या कल्पकतेतून या ब्रांड ची दिशा बदलली आणि 1980 च्या दशकात याला Global Luxury Fashion Brand मध्ये अग्रगण्य स्थान मिळवून दिलं. Miuccia Prada या Prada च्या ‘Ugly Chic‘ संकल्पनेच्या ही जनक आहेत.

(खालील चित्रात Miuccia Prada या एका समारंभात – Prada history – Photo courtesy Google)

Miuccia Prada at a social gathering

मारिओ प्राडांचा स्त्रीयांबाबत रूढीवाद पण मुलीचे व नातीचे PRADA मधे योगदान


मारिओ प्राडा यांचे वैयक्तिक मत असे होते की महिलांनी व्यवसायात पडू नये, त्यामुळे त्यांनी आपल्या कुटुंबातील स्त्रियांना Prada कंपनीत काम करण्यास सक्त मनाई केली होती. पण नियतीचा खेळ बघा, मारिओ यांच्या मुलाला व्यवसायात अजीबात रस नव्हता. अखेर मारिओ यांच्यानंतर त्यांची मुलगी लुइसा (Luisa) हिने हा व्यवसाय सांभाळला आणि त्यानंतर तिची मुलगी मिउचिआ प्राडा (Miuccia Prada) हिने १९७८ मध्ये कंपनीची धुरा हाती घेऊन प्राडाला जागतिक फॅशन जगताचा राजा बनवले!

आज Prada ची फॅशन शोजमधील स्टायलिश आणि प्रभावी उपस्थितीअसते .Prada हा हॉलिवूड स्टार आणि सेलिब्रिटींचा आवडता ब्रँड झाला आहे.

PRADA चे Products

  • महागड्या हँडबॅग्स
  • लक्झरी फुटवेअर
  • डिझायनर कपडे (पुरुष व महिला दोघांसाठी)
  • स्टायलिश सनग्लासेस आणि
  • परफ्युम्स
  • हाय-फॅशन अ‍ॅक्सेसरीज

खाली PRADA च्या प्रसिद्ध उत्पादनांची यादी आणि त्याच्या डिझाईन शैलीचं विश्लेषण दिलं आहे.


प्रसिद्ध उत्पादने

PRADA हा ब्रँड जगभर प्रसिद्ध आहे त्याच्या दर्जेदार, स्टायलिश आणि नाविन्यपूर्ण उत्पादनांसाठी. खाली प्राडा च्या काही सर्वाधिक चर्चेत असलेल्या उत्पादनांची यादी दिली आहे:

1. PRADA Galleria Bag

  • PRADA ची क्लासिक आणि सर्वात ओळखली जाणारी बॅग.
  • Saffiano लेदरचा वापर.
  • ऑफिस, पार्टी आणि फॉर्मल लूकसाठी आदर्श.

2. PRADA Cloudbust Sneakers

  • अत्याधुनिक आणि futuristic डिझाईन.
  • हलके वजन आणि आरामदायक वापरासाठी प्रसिद्ध.

3. PRADA Symbole Sunglasses

  • अष्टपैलू डिझाईन आणि मजबूत फ्रेम.
  • लक्झरी आणि ट्रेंडी स्टाईलचा उत्तम संगम.

4. PRADA Ready-to-Wear Collection

  • महिला आणि पुरुष दोघांसाठी प्रगत आणि प्रयोगशील कपडे.
  • गडद रंगसंगती, अनपेक्षित कट्स, आणि मिनिमल फिनिश.

5. PRADA Paradoxe Perfume

  • Miuccia Prada यांच्या विशिष्ट स्टाईल संकल्पने प्रमाणे – जुनं आणि नवं यांचा संगम.
  • स्त्रीत्वाचा नवीन अर्थ अधोरेखित करणारा सुगंध.
  • Prada ने भारतीय मसाला चहाच्या सुगंधाचा एक Chaai Perfume ही नुकताच बाजारात आणला आहे.

6. PRADA Nylon Backpack

  • 1980 च्या दशकात लाँच झालेला गेम-चेंजर प्रॉडक्ट.
  • हाई-फॅशनमध्ये नायलॉनसारख्या सामान्य मटेरियलला प्रतिष्ठा मिळवून दिली.
Prada Nylon Backpack PIC courtesy Google

Prada चे दोन प्रवाह : एकीकडे Minimalist डिझाईन शैली – ‘कमी म्हणजे जास्त’ आणि दुसरीकडे Ugly Chic ची वेगळी संकल्पना

PRADA ची Design Philosophy ही इतर लक्झरी ब्रँड्सपेक्षा थोडी वेगळी आहे. तिची खास शैली ही मिनिमलिझम, सर्जनशीलता आणि विरोधाभास याभोवती फिरते.

1. मिनिमलिझमचा प्रवाह

PRADA च्या डिझाईनमध्ये साधेपणा असतो, पण तो उच्च दर्जाचा आणि प्रभावशाली वाटतो. कोणताही बोजड अतिप्राचीनपणा किंवा उगाच झगमगाट न करता, subtle detailing ला महत्त्व दिलं जातं. 2026 च्या Summer Collection मधे Prada ने प्रस्तूत केलेल्या कोल्हापुरी चप्पल ने प्रेरित अशा Toe ring sandle या साध्या पण दिमाखदार श्रेणीत मोडतात.

Prada - छोट्याशा दुकानापासून जागतिक ब्रँड पर्यंत -Prada Luxury Fashion Brand चा इतिहास जाणून घ्या

2. Mid 90s – फॅशनमधील विरोधाभास – Ugly Chic

Models on ramp walk dressed in Ugly Chic concept fashion by Prada

Miuccia Prada ने 90 च्या दशकाच्या मध्यात ‘बेढब सौंदर्य’ (Ugly chic) ही संकल्पना फॅशनमध्ये मांडली. म्हणजेच जे पारंपरिक सौंदर्याच्या चौकटीत बसत नाही, त्यालाच सौंदर्य मानणे. सौंदर्यांची विशिष्ट अशी संकल्पना नाकारून , सौंदर्य हे वैशिष्ट्यपूर्णतेमधे व व्यक्तिगत ग्रेस मधे असते असा विचार प्रभावीपणे या Ugly Chic संकल्पनेतून पूढे आला. (Prada history)

आजचे 2026 मधे Gen Z ज्या प्रकारची Fashion करते ती Miuccia Prada यांच्या 90 च्या दशकातील Ugly Chic ची घेतलेली प्रेरणाच आहे.

3. नवीन आणि जुन्याचा संगम

PRADA ची ओळख म्हणजे traditional elements + futuristic vision. उदाहरण: नायलॉनचा वापर + हाय-फॅशन फिनिश.

4. विचार प्रवण फॅशन (Intellectual Fashion)

PRADA ची फॅशन उत्पादने फक्त सुंदर दिसण्यासाठी नाही, तर विचारप्रवृत्त फॅशनसाठी ओळखली जाते. Prada च्या शोमध्ये अनेकदा सामाजिक, राजकीय किंवा तात्त्विक संकल्पनाही दिसतात.


साधेपणात सौंदर्य

PRADA Luxury Fashion Brand म्हणजे केवळ फॅशन नाही तो एक दृष्टीकोन आहे. ती सौंदर्याची नवी व्याख्या आहे. एकाच वेळी साधेपणामधून उठून दिसणं आणि प्रस्थापित सौंदर्य संकल्पनांना Ugly Chic सारख्या संकल्पनेतून आव्हान देणं ही Prada ची खरी ताकद आहे.

जर तुम्ही फॅशनमध्ये गंभीर विचार करणारे, प्रयोगशील आणि उच्च दर्जा व अभिरुची बाळगणारे असाल तर PRADA तुमच्यासाठी योग्य ब्रँड आहे…..पण हो ! जगातला अतिश्रीमंतांचा हा प्रसिद्ध ब्रांड आपल्या खिशाला किती परवडतो याचा विचार ही आपल्यालाच करावा लागणार आहे.

Prada - छोट्याशा दुकानापासून जागतिक ब्रँड पर्यंत -Prada Luxury Fashion Brand चा इतिहास जाणून घ्या

FAQ

प्राडा ब्रँडची सुरुवात कधी आणि कोणी केली?

१९१३ मध्ये मिलान (इटली) येथे मारिओ प्राडा आणि त्यांच्या भावाने Prada Brand ची सुरूवात केली. सुरुवातीला हे चामड्याच्या प्रवासी बॅग्ज आणि चामड्याच्या वस्तूंचे दुकान होते.

प्राडाच्या त्रिकोणी लोगोचा इतिहास काय आहे?

१९१९ मध्ये प्राडाला इटालियन राजघराण्याचे अधिकृत पुरवठादार बनण्याचा मान मिळाला. त्यामुळे राजघराण्याचा ‘कोट ऑफ आर्म्स’ (राजचिन्ह) आणि दोरीचे डिझाईन लोगोमध्ये वापरण्याचा अधिकार त्यांना मिळाला

प्राडाला जागतिक स्तरावर खरी प्रसिद्धी कधी मिळाली?

Prada Nylon Backpack PIC courtesy Google

मारिओ यांच्या नातीने—मिउचिआ प्राडा यांनी १९७८ मध्ये धुरा सांभाळली. त्यांनी १९८४ मध्ये आणलेला ‘Classic Nylon Backpack’ प्रचंड हिट ठरला आणि हा ब्रँड जागतिक लक्झरी फॅशन हाऊस बनला.

प्राडाच्या नावापुढे ‘SpA’ का लिहिलेले असते?

‘SpA’ (Società per Azioni) हा इटालियन कायदेशीर संक्षेप आहे. भारतात कंपन्यांच्या नावापुढे जसे Ltd. किंवा Pvt. Ltd. लिहितात, तसेच ते इटलीमध्ये वापरले जाते.


हे ही वाचा

फ्रेंच युवती चे भारत प्रेम : दक्षिण गोव्यातील तिचे इको फ्रेंडली रेसॉर्ट

Prada Kolhapuri controversy – इटलीच्या फॅशन शोमध्ये कोल्हापुरी चप्पल ला Leather Flat Sandal नावाने Prada ने सादर केले

About The Author

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment