
क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर क्रिकेट कडे वळला तो देव आनंद यांच्या Guide चित्रपटामुळे …असे तुम्हाला सांगितले तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण ही गमतीशीर घटना सचिन तेंडुलकर यांच्या लहानपणी घडली होती ….Sachin Tendulkar childhood Trivia
कवीमनाचा cricketer भाऊ झाला सचिनचा Guide
सचिन तेंडुलकरला मोठे भाऊ अजित तेंडुलकर यांचा त्याच्या क्रिकेट प्रवासात महत्त्वाचा guidence मिळाला आहे, हे सगळ्यांनाच माहीत आहे. अजित स्वतः एक क्रिकेटर होते व पुढे सचिन तेंडुलकर यांच्या क्रिकेट जगातील दैदिप्यमान प्रवासात ते एक महत्त्वाचे Guide देखिल होते. सचिनने आपल्या cricket career मधील यशाचे श्रेय अनेकदा जाहिरपणे आपले मोठे भाऊ अजित तेंडुलकर यांना दिले आहे. अजित तेंडुलकर यांनी एका दुपारी घेतलेला सचिन बाबत चा महत्वाचा निर्णय सचिन च्या बालपणीच्या गमतीशीर घटणे नंतर घेतला होता.
Guide चित्रपटामुळे कसा घडला क्रिकेटचा देव!

1980 च्या दशकाच्या मध्यात उन्हाळ्याची एक शांत उकाड्याची दुपार होती. त्या काळात एकमेव दूरचित्रवाणी वाहिनी असलेल्या ‘दूरदर्शन’ वर Dev Anand यांचा क्लासिक चित्रपट “Guide” प्रसारित होत होता. सचिन तेंडुलकर रहात असलेल्या वांद्रे पूर्व येथील साहित्य सहवास सोसायटी मधे आणि परिसरातील सगळी कुटुंबं हा प्रसिद्ध चित्रपट पाहण्यात इतकी गुंतली होती की, या संधीचा फायदा घेऊन खट्याळ सचिन आणि त्याचे मित्र कंपनी ने सोसायटीच्या आवारातील आंब्याच्या झाडाला लागलेल्या कैर्या चोरण्याची योजना आखली.
कैरी चोरी अभियानात सचीनची wicket -Sachin Tendulkar Childhood Story
सगळी मुलं झाडाभोवती जमली. इथे ही सचिनने opening करत झाडावर चढाई केली. कैर्या हाताला लागत नव्हत्या. या short pitch आव्हानाला सचिन ने front foot वर जावून खेळण्याचे ठरवले असावे. पण Guide च्या सूचनांशिवाय घेतलेली ही एक रिस्क होती. सचिन चा अचानक तोल गेला आणि तो सरळ खाली कोसळला. परिसरातील शांततेचा भंग करणारा ‘धड्म’ असा आवाज ऐकून Guide चित्रपट पहात बसलेला सचिन चा मोठा भाऊ अजित बाहेर धावत आला. सचिन झाडाखाली पडलेला अजितने पाहिला. त्या क्षणी अजित ला वाटले, हा त्यांचा धाकटा भाऊ आपली उर्जा वाया घालवत आहे आणि अशाने तो आयुष्यात चुकीच्या मार्गाने ही जावू शकतो.

अजित हे वडिलांसारखे कवी होतेच, शिवाय चांगले क्रिकेटपटू देखील होते. त्या दिवशी अजित यांनी सचिनला क्रिकेट खेळाकडे वळवायचा निर्धार केला. कुठलाही उशीर न करता त्यांनी सचिनचे नावं प्रतिष्ठित शिवाजी पार्क क्रिकेट क्लबमध्ये नोंदवून टाकले. अजित तेंडुलकर यांच्या या निर्णायक क्षणाच्या मुळाशी होता तो प्रसिद्ध चित्रपट “गाइड”. थोडं विनोदानेच म्हणायचं तर, या Guide चित्रपटाने नकळतपणे अजित यांना सचिनला क्रिकेट कडे Guide करण्यासाठी प्रवृत्त केलं. अजित तेंडुलकर यांनी त्या दुपारी घेतलेल्या या निर्णया मुळेच पुढे जाऊन भारताला एक महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर मिळाला. क्रिकेट चा देव घडविण्यात अप्रत्यक्षपणे देव आनंद यांच्या Guide चित्रपटाचा असा हात आहे.
देव आनंद आणि Cricket
बघा कसा योगायोग आहे की, Dev Anand यांनी १९५९ मध्ये भारतातील पहिला Cricket Movie असलेल्या ‘Love Marriage‘ या चित्रपटात मध्ये काम केलं होतं. आणि नंतर १९९० मध्ये त्यांनी ‘अव्वल नंबर’ हा क्रिकेटवर आधारित चित्रपट देखील प्रोड्यूस केला. या चित्रपटात आमिर खान मुख्य भूमिकेत होता. देव आनंद यांची इच्छा होती की आमिर खान याच्या विरुद्ध पाकिस्तान चे क्रिकेटर इम्रान खान यांनी भूमिका करावी . इम्रान खान यांना देव आनंद यांनी याबाबत विचारणा ही केली होती पण हा रोल नेगेटीव्ह असल्यामुळे मी करणार नाही असे म्हणून इम्रान खान याने देव आनंद यांची offer नाकारली…
1989 मधे सचिन तेंडुलकर याने पाकिस्तान दौऱ्यात आपले cricket पदार्पण केले तेंव्हा पाकिस्तान चा हाच कप्तान व दिग्गज गोलंदाज इम्रान खान याचा सचिनने सामना केला. यावेळी सचिन खूप लहान व नवखा खेळाडू होता. पुढे 1992 मध्ये इम्रानने पाकिस्तान साठी World Cup ची ट्रॉफी जिंकली आणि 2011 मध्ये सचिनच्या कामगिरी मुळे विश्वचषक भारताकडे आला.
सचिन तेंडुलकर आणि देव आनंद यांच्या या अप्रत्यक्ष cricket connection ची गोष्ट तुम्हाला कशी वाटली …..Hows that ?!!

Sachin Tendulkar Childhood Story कशी वाटली ते नक्की कळवा..
हे ही वाचा :क्रिकेटर स्मृती मंधाना आहे सांगलीची- विजय हजारे ही होते सांगलीचे- Sangaliter cricketer Smriti Mandhana || Follow On Rule आणि 2001 ची राहुल द्रविड ची Wall








सुंदर माहिती
Thanks. Do share
Very nice and amazing