New York च्या RAT WAR चा युद्धनामा
New York च्या RAT WAR चा युद्धनामा
Kathleen Corradi ला New York शहराची प्रथम RAT ZAR नियुक्त करून या लढ्याचे बिगुल वाजवले गेले होते.
Written by Avinash Bhanu Asha Ghodke
New York मधे 2014 पर्यंत च्या सर्वेक्षणा नुसार 20 लाख उंदिर होते पण गेल्या दशकभरात ही संख्या 30 लाख पेक्षा अधिक झाली आणि New York च्या मेयर साहेबांनी 2023 पासून या उंदरांविरुद्ध मोहिम उघडली .
![]() |
Rat War यु्द्धाची कमान Kathleen Corradi कडे |
चीनी वंशाचे उंदीर
New York च्या या उंदरांच्या प्रजातीला Norway Rat म्हटले जाते. तसे Norway या देशाशी या उंदरांचा काही एक संबंध नाही. खरंतर या उंदरांचं जन्मस्थान चीन देश आहे. चीन हून हजारो किलोमीटर चा प्रवास करून हे उंदीर अमेरिकेत कसे आले याचा एक इतिहास आहे.
हे उंदिर New York मधे कसे आले?
![]() |
Kathleen Corradi giving her speech after appointment as Rat Zar: pic courtesy Google |
Rat Zar पदाची कमान Kathleen Corradi कडे
Rat Zar या पदाची कमान सांभाळताच Kathleen Corradi हिने New York च्या आरोग्य खात्याशी सल्ला मसलत करत या RAT WAR च्या लढ्याची आखणी केली व अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली.
Kathleen ची पार्श्वभूमी व नवी जबाबदारी
New York शहराची पहिली Rat Zar झालेली Kathleen Corradi New York शहराच्या शिक्षण खात्यात Director of space planning या पदावर कार्यरत होती.
उंदरांना मिळणारे खाद्य स्त्रोत नष्ट करून नवीनतम तंत्रांचा वापर करून उंदिर विरोधी मोहीम तडीस नेण्याची जबाबदारी आता Kathleen वर आहे.या अनुषंगानेच Carbon Monoxide या विषारी वायू ची फवारणी झाडांखाली असलेल्या उंदीर बिळांमधे करून उंदराना संपविण्यात येत आहे.
Kathleen च्या उपाय योजना
- New York शहराच्या रस्त्यावर जमा झालेला कचरा पालिकेकडून कमित कमी वेळेत उचलला जाण्याचे प्रयोजन Kathleen ने केले.
- Department of Sanitation ने नवे नियम जाहीर करत वेगवेगळ्या events मधे होणार्या Outdoor dinning programmes वर निर्बंध घालण्यात आले.
- उंदरांच्या बिळांमधे कार्बन मोनोक्साईड वायूची फवारणी सुरू केली
पूर्वी पासून कार्यरत असलेले उपाय अधिक सक्षम केले
जसे 2007 पासूनच New York च्या आरोग्य खात्याने RAT ACADEMY सुरू करून.
New York च्या नागरिकांना उंदरांपासून कसे मुक्त व्हावे यावर Zoom Meeting द्वारे प्रशिक्षण सुरू केले होते. तीन तास अवधीच्या या प्रशिक्षणाची रूपरेखा आता नव्याने आखण्यात आली आहे. सुरूवातीला हे प्रशिक्षण फक्त सफाई कामगार व बिल्डिंग सुपरीटेंडंट साठी होते पण आता हे प्रशिक्षण नागरीकांना ही देण्यात येत आहे.
City Councilman एरिक बोचर (Erick Bottcher) यांची विनोद बुद्धी
New York शहराचे City Councilman असलेल्या एरिक बोचर (Erick Bottcher ) यांनी 1 April हा ‘एप्रिल फुल’ दिवस साजरा करण्यासाठी New York च्या नागरीकांना एक ई मेल पाठवून त्यात असे नमूद केले की “
स्वच्छता कर्मचारी उंदीर विरोधी मोहीमेत शहराच्या कानाकोपऱ्यात पोहचू शकत नसल्याने स्थानिक प्रशासनाने असा निर्णय घेतला आहे की शहरातील घरांच्या परसदारात ड्रोन च्या सहाय्याने साप सोडण्यात येतील”
बोध
छत्रपती शिवाजी महाराजांचे ते फर्मान
उंदीर(Rat )हा प्राणी शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान करतो व उंदरांनी पेटत्या दिव्याच्या वाती पळवून नेल्यामुळे धान्यसाठा व गवताच्या गंजींना कशा आगी लागतात या विषयावर प्रत्यक्ष क्षत्रपती शिवाजी महाराजांनी काढले होते ते शासकीय फर्मान ही इथे आठवल्या वाचून रहात नाही.