प्रादाची “सांस्कृतिक चोरी”: कोल्हापुरी चप्पलचा ग्लोबल अपहार?
इटालियन लक्झरी फॅशन ब्रँड Prada ने यंदा त्यांच्या २०२६ समर कलेक्शन या शो मधे हुबेहूब अशी कोल्हापूरी चप्पल लेदर फ्लॅट सँडल अशा नावाने सादर केली आहे. ही सँडल जेव्हा इंटरनेटवर व्हायरल झाली, तेव्हा भारतीयांनी, विशेषत: महाराष्ट्रीय लोकांनी, त्यावर सांस्कृतिक चोरी चा आरोप केला. Prada ने कोल्हापुरी चप्पलच्या डिझाइनची अनधिकृत नक्कल करून तिला आपली अधिकृत “नवीन फॅशन” म्हणून पेश केले आहे. PRADA च्या Summer Collection या ग्लोबल वार्षिक शो च्या यंदाच्या एकूण 56 रनवे पैकी 7 रनवे मध्ये महाराष्ट्राची प्रसिद्ध कोल्हापूरी चप्पल वेगळ्या नावाने दिसली. ही बाब लक्षात येताच इंटरनेटवर अनेकांनी PRADA च्या या कृती वर आक्षेप नोंदवला. काहिंनी याला थेट ‘चोरी’ ही म्हटले. लोकांच्या या प्रतिक्रिया impulsive असल्या तरी या मागील तथ्य वा copy right कायद्याच्या अनुषंगाने प्रादा ची कृती किती बेकायदा आहे हे ठरणे बाकी आहे.
यापूर्वीही अशा प्रकारे भारतीय पारंपारीकतेचा अपहार
भारतीय पारंपारीक मानचिन्हांचा अपहार करून त्यांना ग्लोबल मार्केट चे प्रोडक्ट बनविण्याची ही पहिली वेळ नाही—अनेक इंटरनॅशनल ब्रँड्स भारतीय संस्कृतीच्या घटकांची नक्कल करून त्यांना ते स्वतःचे “क्रेएटिव्ह डिझाइन” असल्याचे सांगतात.
कोल्हापुरी चप्पल: महाराष्ट्राचा गौरव
कोल्हापुरी चप्पल हे केवळ एक पादत्राण नाही, तर महाराष्ट्राच्या कारागिरीचे आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे. ही चप्पल १३व्या शतकापासून कोल्हापूरमध्ये हस्तकलेचा भाग म्हणून तयार केली जाते. ही हस्तनिर्मित (Hand Crafted) चप्पल
•शुद्ध लेदर,
•हाताने केलेली कारागिरी आणि
•टिकाऊपणा
यासाठी प्रसिद्ध आहे. यात कुठलेही रिवेड्स वा खिळे वापरले जात नाहीत. चप्पल च्या मुख्य भागासाठी म्हशीचे कमावलेले कातडे व इतर कलाकुसरीसाठी शेळ्यांचे कातडे वापरले जाते. कोल्हापुरातील कारागीर हे कौशल्य पिढ्यान् पिढ्या जपत आहेत. आज महाराष्ट्रात अंदाजे दहा हजार कलाकार ही कला जोपासत आहेतपण आज, जेव्हा Prada सारख्या ब्रँड्स हे डिझाइन “नवीन ट्रेंड” म्हणून सादर करतात, तेव्हा मूळ कारागिरांना त्याचा काहीही फायदा मिळत नाही. उलट, अंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांच्या कलेचे शोषण होत आहे असे चित्र दिसते.
Prada ची “नवीन” flat leather Sandal: कोल्हापुरीची नक्कल
Prada ने जी सँडल प्रदर्शित केली आहे, ती पारंपारिक कोल्हापुरी चप्पलप्रमाणेच आहे—साधे लेदर फ्लॅट डिझाइन, आणि मिनिमलिस्टिक लुक. फरक एवढाच, की Prada च्या सँडलवर “ब्रँडचा” लोगो आहे आणि तिची किंमत १ लाख रुपयांच्या वर आहे! तर मूळ कोल्हापुरी चप्पल फक्त ₹५०० ते ₹२०००पर्यंत महाराष्ट्रात मिळून जाते. याचा अर्थ असा की, Prada भारतीय हस्तकलेची नक्कल करून ती १०० पट जास्त किंमतीत विकत आहे,आणि असे करताना मूळ कारागिरांना याचे क्रेडिट किंवा रॉयल्टी दिली जात नाही आहे. ही स्पष्टपणे सांस्कृतिक चोरीच (Cultural Appropriation) आहे.
इंटरनॅशनल ब्रँड्सची “सांस्कृतिक लूट
Prada हा एकच ब्रँड नाही जो भारतीय संस्कृतीची नक्कल करतो. अनेक वेळा, ग्लोबल फॅशन हाऊसेस
•भारतीय ब्लॉक प्रिंट,
•इकत,
•बंधनी,
•नागरा शूज,
•कढाई
यांसारख्या घटकांची नक्कल करतात आणि त्यांना आपले “डिझायनर लेबल” लावून विकतात.
– अंतरराष्ट्रीय Gucci ब्रॅण्ड ने केरळच्या कासारवॅल्ली शालींच्या डिझाइनची नक्कल केली. –
-Louis Vuitton ने राजस्थानी बंधनी प्रिंटचा वापर केला पण तो “नवीन पॅटर्न” म्हणून सांगितला.
– Starbucks ने इंडियन “मसाला चाई” स्वतःचे म्हणून पेटंट करण्याचा प्रयत्न केला.
ही “सांस्कृतिक लूट” (Cultural Exploitation) आहे. यामध्ये, शक्तिशाली ब्रँड्स दुर्बल समाजांच्या कलेचा वापर करतात, पण मूळ निर्मात्यांना मान्यता देत नाहीत व मानधनही देत नाहीत.
कोल्हापुरी चप्पल कारागिरांच्या संघर्षाची वास्तविकता
कोल्हापुरी चप्पल बनवणाऱ्या कारागिरांना आजही योग्य मोबदला मिळत नाही. त्यांच्या हातामध्ये असलेल्या कलेला बाजारपेठेत योग्य दर्जा नाही. मशीनमेड चप्पल, चायनीज नकली उत्पादने आणि आता Prada सारख्या ब्रँड्सच्या नकलींमुळे त्यांचा व्यवसाय धोक्यात आहे. खुद्द भारतात ही अनेक भारतीय कंपन्या कोल्हापुरी चप्पल च्या सदृश प्रोडक्ट्स बनवून बाजारात विकत आहेत .जर Prada खरोखरच क्रेएटिव्ह असेल, तर त्यांनी:
कोल्हापुरी कारागिरांशी सहकार्य केले पाहिजे.
मूळ निर्मात्यांना रॉयल्टी दिली पाहिजे.
“इन्स्पायर्ड बाय इंडियन क्राफ्ट” असे क्रेडिट दिले पाहिजे.
पण ते असे न करता, ते भारतीय संस्कृतीचा व्यावसायिक फायदा घेत आहेत.

उपाय
१. जागरूकता पसरवणे गरजेचे – Prada सारख्या ब्रँड्सवर दबाव आणला पाहिजे. सोशल मीडियावर #GiveCreditToKolhapuri सारखे हॅशटॅग वापरून आवाज उठवायला हवा.
२. स्थानिक कारागिरांना समर्थन व प्रोत्साहन द्या – केवळ अस्सल हस्तनिर्मित कोल्हापुरी चप्पल खरेदी करून कारागिरांच्या हाताला काम व योग्य मोबदला द्या.
३. कॉपीराइट कायद्याचा वापर – भारत सरकारने योग्य GI (Geographical Indication) टॅगचा कडकपणे अंमल बजावला पाहिजे. व या कायदे संदर्भात असलेल्या तृटींवर संशोधन करून योग्य फेरबदल केले पाहिजेत.
निष्कर्ष
Prada ने केलेली ही “डिझाइन चोरी” फक्त एका चप्पलचा मुद्दा नाही, तर संपूर्ण भारतीय हस्तकलेचा अपमान आहे. आपल्या संस्कृतीचा गौरव जपणे आणि कारागिरांच्या हक्कांसाठी लढा देणे हे आपले कर्तव्य आहे. दहा हजार कोल्हापुरी चप्पल कारागिरांच्या भविष्यासाठी व त्यांच्या हक्कासाठी भारत सरकारने विशेष पावले उचलणे आता गरजेचे आहे.
हे ही वाचा
Storyteller by instinct, screenwriter by choice. Sharing thoughtful news and interesting facts
At pinga9.com