प्यासा मधला गुरूदत्त यांचा दरवाजातला शॉट -किस्सा Pyasa Cinematogrphy चा

 

50 व 60 च्या दशकातील सिनेतंंत्र आजच्या इतके विकसित नव्हते. तेंव्हाचे मिचल कंपनीचे कॅमेरे खूप जड असत. ते उचलण्यासाठी चार माणसे लागत. Visuals ला movement देणे आणि तेही jerk शिवाय ही करामत करून दाखवणारे Cinematogrpher म्हणजे VK Murthy. छाया प्रकाशाचा खेळ करून त्यांनी अनेक iconic shot दिले. त्यातलाच एक म्हणजे Pyasa Cinematography मधला गुरूदत्त यांचा दरवाजातील backlit shot.

 

Pyasa चे Cinematographer V K Murthy यांचा Accidental Shot

खोल मनातील वेदना आणि दुःखाची डूब असलेल्या गुरूदत्त यांच्या cinema विषयांना V K Murthy यांनी आपल्या छाया प्रकाशातून जीवंत केले. Studio photography च्या या काळात V K Murthy यांनी अनेक यशस्वी प्रयोग केले. पण प्यासा चा गुरू दत्त यांचा दरवाजातील तो iconic backlit shot V K Murthy यांच्या पदरात अपसूक येवून पडला होता. हा accidental shot सहज घडून गेला होता.

काय होते दृश्य

स्टूडिओ मधे गुरूदत्त यांच्या Classic Movie’प्यासा’चा क्लायमॅक्सचा देखावा चित्रित केला जात होता. प्रेक्षकांनी खच्च भरलेल्या सभागृहात एक श्रद्धांजलि कार्यक्रम सुरू असताना तीच व्यक्ति अचानक मागे दरवाजात येवून उभी रहाते आणि आपण जीवंत असल्याचे सांगते. प्रेक्षागृहात या मुळे प्रचंड गोंधळ माजतो.

कसा चित्रित झाला iconic shot

Pyasa Cinematography करताना V K Murthy या नाट्यमय प्रसंगाची प्रकाशयोजना करण्यात मग्न होते . . समोर गुरुदत्त दरवाजात उभे होते, इथूनच त्यांचा त्या दृश्यात प्रवेश होता. हा एक महत्त्वाचा Climax scene होता म्हणून मूर्तीजी लाइटिंग आणि फोकस सेट करण्यात थोडा जास्त वेळ घेत होते. गुरुदत्तजी दारात उभे उभे कंटाळले होते, म्हणून त्यांनी दोन्ही हात पसरून आता दरवाजाच्या चौकटीला टेकवले. मूर्तीजींची नजर त्यांच्यावर पडली… मागून येणारा प्रकाश आणि त्यात हात पसरून उभे असलेले गुरुदत्त, ते जणू काही येशू ख्रिस्तासारखे दिसत होते. एखादे सत्य प्रकट होत असल्यासारखा फील येत होता. मूर्तीजींनी त्वरित गुरुदत्तजींना म्हटले, “असेच उभे राहा… शॉट याच पोझिशनमध्ये घेऊ!” आणि मग मूर्तीजींनी जो शॉट चित्रित केला, तो आजतागायत एक iconic shot म्हणून Bollywood इतिहासात आजरामर झाला आहे.

90 च्या दशकात जेंव्हा  V K . Murthy यांनी पहिल्यांदा  व्हिडिओग्राफी केली…

Classic film Pyasa Cinematography करणार्या या दिग्गज छायाचित्रकाराला पुनरागमन करताना जवळून पाहण्याची संधी मला एकदा मिळाली होती.

मी माझी सिने जगतातील पहिले काम तेंव्हा श्याम बेनेगलजींबरोबर स्टिल फोटोग्राफर म्हणून करत होतो,या सिरियल साठी व्ही. के. मूर्तीजी सिनेमॅटोग्राफर होते. ते पहिल्यांदा ‘व्हिडिओ फॉरमॅट’वर काम करत होते आणि एखाद्या तरुणासारखे व्हिडिओच्या नव्या तंत्रज्ञानाला समजून घेण्याचा प्रयत्न करत होते. .

मूर्तीजींना सिगारेटची सवय होती. कॅमेरा फोकस करताना ते सिगारेट ओठांनी हलकेच पकडून ठेवायचे. जेव्हा ते बोलायचे तेव्हा सिगारेट वर खाली डोलायची. सिगारेट अशी दिसायची की केंव्हाही पडेल.

सिने कॅमेऱ्यात ध्वनी आणि चित्र वेगवेगळ्या टेपवर रेकॉर्ड होतात, पण हे व्हिडिओ शूट होते म्हणून ध्वनी आणि चित्र दोन्ही एकाच रेकॉर्डरवर रेकॉर्ड होत होते. “Start sound!!…Rolling!!” अशा प्रकारे फक्त दोन कॉल दिल्या जायच्या. यादरम्यान, फिल्म छायाचित्रणात जो “Roll Camera!!” हा तिसरा कॉल असतो, तो दिला जात नव्हता. मूर्तीजी या कॉलची वाट पाहत असत, खरं तर साउंड रेकॉर्डिस्टच्या “Rolling!!” या कॉलवरच कॅमेरा सुरू होणे अपेक्षित असायचे. सुरुवातीच्या काही अडचणींनंतर मूर्तीजींनी या नव्या ‘व्हिडिओ तंत्राला’ देखील ताब्यात घेतले होते. गुरुस्थानी पोहोचलेल्या या महान तंत्रज्ञाला एखाद्या नवशिक्याच्या उत्साहाने नवे तंत्रज्ञान आत्मसात करताना पाहणे, हा माझ्यासाठी आयुष्यातील एक मोठा धडा होता.

 



Collage of two pictures. Above picture is the iconic back-lit shot taken by cinematographer VK Murthy.  Below is Mr Murthy seen with Arri camera on shooting location

 

About The Author

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

1 thought on “प्यासा मधला गुरूदत्त यांचा दरवाजातला शॉट -किस्सा Pyasa Cinematogrphy चा”

Leave a Comment