AGNEEPATH BTS –
Dharma Productions चे office तेंव्हा खार पश्चिम ला होते. मी Agneepath चे सह संवाद लेखन करत होतो. आधी तयार असलेल्या पहिल्या ड्राफ्ट वर मी स्वतंत्र पणे काम करत होतो. दिग्दर्शक करण मल्होत्रा ने मला पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. Shooting dates जवळ येत होत्या. एकीकडे लोकेशन visits तर कधी song recording , करणं ची धावपळ वाढली होती. अशातही संध्याकाळी वेळ काढून माझ्या केलेल्या कामाचा आढावा घेई. एकदा आम्ही चर्चा करत बसलो होतो.
सच्चिदानंद – कांचा चे अध्यात्म
अग्निपथ च्या संवादा मधला “सच्चिदानंद” शब्द वाचून करण ने सहज विचारले “सच्चिदानंद”
मतलब क्या अविनाशजी ?”धर्मा प्रॉडक्शन्स च्या केबिन मधे होमियोपथी च्या गोळ्यांचा डोस हातावर घेत करण
मल्होत्रा बोलत होता .करण च्या या अनपेक्षित अध्यात्मिक प्रश्नाने
मी जरा आश्चर्यच चकित झालो. करण ला थोडक्यात उत्तर अपेक्षित
होतं.मी क्षणात विचार करून म्हटलं “Bliss!! Eternal joy ..आनंद जो कभी
खत्म नही होता ” तळहातावरून टेबलावर घरंगळलेली पांढरी गोळी हिकमतीने आडवत
तो म्हणाला “अच्छा..!” आता गोळ्या तोंडात टाकत त्याने दिग्दर्शकाच बेअरिंग
सोडलं.. दिलखुलास मिश्कील हसत म्हणाला ” मैं तो कांचा हुं..!!”
आपण सच्चिदानंदापेक्षा ऐहीक सुखाचा विचार करतो असं करणला म्हणायचं होतं.अध्यात्मिक शब्दाचा आपण क्षणात अर्थ सांगितला याचा ‘विजय’ भाव माझ्या चेहर्यावर होताच. प्रेमकथांचे दिग्दर्शक आपल्या नाईकांच्या प्रेमात पडतात पण सूड कथेचा हा दिग्दर्शक खलनायकाच्या आकंठ प्रेमात होता. कांचाने करणला अक्षरशः झपाटून टाकले होते
a strongest undefeatable villain only can make Hero’s struggle real and interesting
करण ची ही philosophy खूप practicle अशी होती.आपल्या Heroines च्या प्रेमात दिग्दर्शक पडतात. AGNEEPATH चा दिग्दर्शक Karan Malhotra मात्र कांचा या महा खलनायकाच्या प्रेमात होता.
लेखक: अविनाश भानू आशा घोडके
सह संवाद लेखक / अग्निपथ
Collage





