मौसमक्रिकेटऑपरेशन सिंदूरक्रिकेटस्पोर्ट्सबॉलीवुडजॉब - एजुकेशनबिजनेसलाइफस्टाइलदेशविदेशराशिफललाइफ - साइंसआध्यात्मिकअन्य

भारतीय राष्ट्र गीताचा इतिहास: Original National Anthem 5 कडव्यांचे आहे

भारतीय राष्ट्र गीताचा इतिहास व मूळ स्वरूप

Picture of Indian flag
Indian National Anthem

आजचे आपले हिंदी राष्ट्र गीत मूलतः रविंद्रनाथ टागोरांनी बंगाली भाषेत लिहिले होते व ते पाच कडव्यांचे दीर्घ गीत होते

१९४७ च्या स्वातंत्र्य प्राप्ती नंतर तीन वर्षांनी रविंद्रनाथ टागोर यांनी लिहिलेल्या मूळ बंगाली गीताचे पहिले कडवे भारतीय राष्ट्रगीत म्हणून मान्य केले गेले. असे करताना मूळ बंगाली गीताचे हिंदी भाषेत भाषांतर केले गेले व अशाप्रकारे भारतीय राष्ट्रगीत “जन गण मन” अधिकृत रित्या 24 जानेवारी 1950 रोजी संमत झाले.

गीताचा कालक्रम

१९०५

सर्व प्रथम १९०५ साली रविंद्रनाथ टागोर यांनी हे गीत बंगाली भाषेत लिहिले होते.

१९११ डिसेंबर २७

त्यानंतर रविंद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले “जन गण मन” हे गीत पहिल्यांदा 27 डिसेंबर 1911 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कोलकाता अधिवेशनात गायले गेले.कलकत्याच्या Bow Bazar street वरील ‘भारत सभा’ या एक मजली इमारतीत हे अधिवेशन पार पडले होते. इथून पुढे हे गीत देशभरात लोकप्रिय झाले.

१९१९ फेब्रुवारी २८

१९१९ साली टागोरांनी स्वतः मदनापल्ली आंध्र प्रदेश येथील बेसेंट थिओसाॅफिकल काॅलेज मधे हे गीत गायले होते. या काॅलेज च्या शिक्षक गणांना हे गीत एवढे आवडले की त्यांनी गीताचे इंग्रजी भाषांतर करून ते काॅलेजची दैनिक प्रार्थना म्हणून स्वीकारले व आजतागायत नीत्यनेमाने ते गीत या काॅलेजमधे प्रार्थना म्हणून गायले जाते.

१९५० जानेवारी २४

अखेर भारताच्या स्वातंत्र्यानंतर, 24 जानेवारी 1950 रोजी संविधानाने या गीताला भारताचे राष्ट्रगीत म्हणून अधिकृत मान्यता दिली.

मूळ राष्ट्र गीत

रविंद्रनाथ टागोर यांनी लिहिलेल्या मूळ राष्ट्र गीता मधे पाच कडवी(Stanza)आहेत पण यातील पहिले एक कडवेच राष्ट्र गीत म्हणून स्वीकारले गेले आहे.

राष्ट्रगीतातील पहिली ओळ सामान्य नागरिकाचे नायकत्व सांगते

जन – सामान्य जन
गण– जन समुदाय ,community
मन– या सर्वांचे मन (अर्थात इच्छा आकांक्षा)
अधिनायक – हेच या राष्ट्राचे नायक आहे
जय हे – त्याचा विजय असो
भारत भाग्य विधाता – हेच सर्वसामान्य नागरिकांचे मन , त्यांच्या आशा आकांक्षा भारताचे भाग्य घडवणार आहेत.

टागोरांचे मूळ पाच पदांचे गीत खालीलप्रमाणे आहे.

जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता ||धृ||
 
पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग
विंध्य हिमाचल यमूना गंगा उच्छल जलधी तरंग
तव शुभ नामे जागे,तव शुभ आशिष मागे
– गाहे तव जय गाथा
जनगण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता
जय हे, जय हे, जय हे, जय जय जय ,जय हे! ||१||
अहरह तव आव्हान प्रसारीत, शुनी तव उदार बाणी
हिन्दू बौद्ध शीख जैन पारसिक मुसलमान खृष्टानी
पूरब पश्चिम आसे – तव सिंहासन पाशे – प्रेम हार हय गांथा |
जन गण ऐक्य विधायक जय हे भारत भाग्य विधाता
जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे! ||२||
पतन अभ्यूदय वंधुर पंथा , युग युग धावित यात्री|
हे चिरसारथी तव रथचक्रे मुखरीत पथ दिनरात्री
दारूण विप्लव माझे – तव शंख ध्वनी बाजेसंकट दुःख त्राता|
जन गण पथ परीचायक जय हे भारत भाग्य विधाता
जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे! ||३||
घोर तिमिर घन निविड निशिथे , पीडित मूर्च्छित देशे
जाग्रत छिल तव अविचल मंगल नतनयने अनिमेषे
दु:स्वप्ने आतंके – रक्षा करीले अंके – स्नेह मयी तुमी माता
जन गण दु:ख त्रायक जय हे भारत भाग्य विधाता
जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे! ||४||
रात्री प्रभातिल उदिल रविच्छवी पूर्व उदय गिरी भाले
गाहे विहंगम पूण्य समीरण नवजीवनरस ढाले|
तव करूणा रूण रागे – निद्रीत भारत जागे-
तव चरणे नत माथा |
जय जय जय हे जय राजेश्वर भारत भाग्य विधाता
जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे! ||५||

Controversy : या गीता संदर्भात टागोरांवर ब्रिटिश हुजरेगिरी चा आरोप

सन १९११ रोजी ब्रिटिश किंग जॉर्ज 5th हा‌ भारत दौऱ्यावर आला होता. या राजाचे भारतात अतिशय शाही इत्मामात स्वागत झाले होते. मुंबई च्या ज्या धक्क्याला किंग जॉर्ज 5th चे जहाज लागले होते तेथे या ब्रिटिश राजाच्या स्वागता प्रित्यर्थ ‘Gate way of India ‘ ची उभारणी केली गेली होती.
राजाच्या स्वागत समारंभात रविंद्रनाथ टागोर यांनाही आमंत्रित केले गेले होते व या स्वागत समारंभात रविंद्रनाथ टागोरांनी त्यांचे ‘जन गण मन’ हे गीत गायले होते.
पूढे काही लोकांनी टागोरांनी हे गीत खास किंग जॉर्ज 5th साठी लिहिलेले प्रशंसा गीत होते असे म्हणून टागोरांनी ब्रिटिश राजाची हुजरेगिरी केल्याचा आरोप त्यांच्यावर केला . विशेष करून गीतातील”अधिनायक” हा शब्द किंग जॉर्ज 5th साठी वापरण्यात आला आहे असे या आरोपात म्हटले गेले होते.या आरोपात पुढे असेही म्हटले गेले होते की या हुजरेगिरी चे बक्षिस म्हणून टागोरांना 1913 साली याच गीतासाठी साहित्याचे नोबेल प्राईज देण्यात आले व त्यावेळी किंग जॉर्ज 5th हा नोबेल सिलेक्शन कमीटीचा चेअरमन होता.

तथ्य काय होते

खरेतर किंग जॉर्ज 5th च्या १९११ सालच्या स्वागत समारंभात रविंद्रनाथ टागोरांसोबत रामानुज चौधरी हे कवी ही उपस्थित होते व त्यांनी त्यांचे जे गीत समारंभात वाचून दाखवले ते किंग जॉर्ज 5th साठी लिहिलेले स्तुतीपर गीत होते. उपस्थित असलेल्या ब्रिटिश पत्रकारांनी बातमी लिहिताना गफलतीने टागोरांनी किंग जॉर्ज 5th साठी स्तूतीपर गीत गायले असे लिहिले व‌ त्यामुळे टागोरांबद्दल ब्रिटीश धार्जिणे असल्याचा गैरसमज पसरला.
1913 साली किंग जॉर्ज 5th Nobel Committee चा चेअरमन नसून हेराॅल्ड गैब्रिअल हा चेअरमन होता हे उपलब्ध नोंदी व कागदपत्रांवरून सिद्ध होते.
वरील उदाहरणातून हे सिद्ध होते की महान व्यक्ती ही आरोपांच्या चीखलफेकीतून वाचत नाहीत पण सत्य हे कुणाच्या ही आरोपांमुळे बदलत नाही.
रविंद्रनाथ टागोर यांची एक दुर्मिळ चित्र फीत YouTube वर उपलब्ध आहे ‌ज्यात ते स्वतः राष्ट्र गीत गाताना दिसतात. ती चित्रफीत या लिंकवर जरूर पहा.

About The Author

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

0 thoughts on “भारतीय राष्ट्र गीताचा इतिहास: Original National Anthem 5 कडव्यांचे आहे”

Leave a Comment