Avinash Ghodke

Screenwriter and Lyricist with 20 years of experience in Bollywood and Marathi cinema.His creative writing examines the contradictions of lived experience, while his journalism uncovers humanism beneath headlines.

‘जनं गणं मनं’ गीताचे फक्त पहिले कडवे National Anthem झाले – मूळ गीत 5 कडव्यांचे आहे – टागोरांनी लिहिलेले पूर्ण राष्ट्रगीत जाणून घ्या

भारतीय राष्ट्र गीताचा इतिहास – Indian National Anthem History व मूळ गीताची 5 कडवी

Picture of Indian flag
Indian National Anthem History

१९४७ च्या स्वातंत्र्य प्राप्ती नंतर तीन वर्षांनी रविंद्रनाथ टागोर यांनी लिहिलेल्या मूळ बंगाली गीताचे पहिले कडवे भारतीय राष्ट्रगीत म्हणून मान्य केले गेले. असे करताना मूळ बंगाली गीताचे हिंदी भाषेत भाषांतर केले गेले व अशाप्रकारे भारतीय राष्ट्रगीत “जन गण मन” अधिकृत रित्या 24 जानेवारी 1950 रोजी संमत झाले.

Ravindranath Tagore writing on his desk - Imaginary AI pic

Indian National Anthem History : आजचे आपले हिंदी राष्ट्र गीत मूलतः रविंद्रनाथ टागोरांनी बंगाली भाषेत लिहिले होते व ते पाच कडव्यांचे दीर्घ गीत होते. आपण जे राष्ट्रगीत गातो ते या मूळ गीताचे पहिले कडवे आहे. हे मूळ गीत काय होते व या गीता संदर्भात रवींद्रनाथ टागोर यांच्यावर ब्रिटिश धार्जिणे पणाची टीका का झाली होती यासंदर्भात ये लेखात माहिती घेवू.

मूळ गीत सादरीकरण : कालक्रम

१९०५

सर्व प्रथम १९०५ साली रविंद्रनाथ टागोर यांनी हे गीत बंगाली भाषेत लिहिले होते.

१९११ डिसेंबर २७ – पहिले सार्वजनिक वाचन

त्यानंतर रविंद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले “जन गण मन” हे गीत पहिल्यांदा 27 डिसेंबर 1911 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कोलकाता अधिवेशनात गायले गेले.कलकत्याच्या Bow Bazar street वरील ‘भारत सभा’ या एक मजली इमारतीत हे अधिवेशन पार पडले होते. इथून पुढे हे गीत देशभरात लोकप्रिय झाले.

१९१९ फेब्रुवारी २८ – टागोरांनी स्वतः गायले

१९१९ साली टागोरांनी स्वतः मदनापल्ली आंध्र प्रदेश येथील बेसेंट थिओसाॅफिकल काॅलेज मधे हे गीत गायले होते. या काॅलेज च्या शिक्षक गणांना हे गीत एवढे आवडले की त्यांनी गीताचे इंग्रजी भाषांतर करून ते काॅलेजची दैनिक प्रार्थना म्हणून स्वीकारले व आजतागायत नीत्यनेमाने ते गीत या काॅलेजमधे प्रार्थना म्हणून गायले जाते.

राष्ट्र गीत म्हणून मान्यता- २४ जानेवारी १९५०

अखेर भारताच्या स्वातंत्र्यानंतर, 24 जानेवारी 1950 रोजी संविधानाने या गीताला भारताचे राष्ट्रगीत म्हणून अधिकृत मान्यता दिली.

रविंद्रनाथ टागोर यांनी लिहिलेल्या मूळ राष्ट्र गीता मधे पाच कडवी(Stanza)आहेत पण यातील पहिले एक कडवेच राष्ट्र गीत म्हणून स्वीकारले गेले आहे.

भारतीय राष्ट्रगीत: पहिली ओळ व शब्दार्थ

राष्ट्रगीताची पहिली ओळ अर्थात ध्रुव पद हे भारताच्या सामान्य नागरिकाचे नायकत्व सांगते म्हणून तिचे महत्त्व आहे . या ओळीचा शब्दागणिक अर्थ समजून घेणे महत्त्वाचे आहे.

राष्ट्रगीताची पहिली ओळ व शब्दागणिक अर्थ – Indian National Anthem – Meaning of First line

"जन गण मन अधिनायक जय हे | भारत भाग्य विधाता"
जन – सामान्य जन
गण– जन समुदाय ,community
मन– या सर्वांचे मन (अर्थात इच्छा आकांक्षा)
अधिनायक – हेच या राष्ट्राचे नायक आहे
जय हे – त्याचा विजय असो
भारत भाग्य विधाता – हेच सर्वसामान्य नागरिकांचे मन , त्यांच्या आशा आकांक्षा भारताचे भाग्य घडवणार आहेत.

टागोरांचे मूळ पाच पदांचे गीत खालीलप्रमाणे आहे.

खालील मूळ गीतातील फक्त पहिले पद आपण राष्ट्रगीत म्हणून गातो. त्याखालील ४ पदे मिळून हे मूळ गीत आहे

जन गण मन

जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता
||धृ||

पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग
विंध्य हिमाचल यमूना गंगा उच्छल जलधी तरंग
तव शुभ नामे जागे,तव शुभ आशिष मागे
गाहे तव जय गाथा
जन गण मंगल दायक जय हे - भारत भाग्य विधाता
जय हे! जय हे! जय हे! जय जय जय जय हे!..||१||


अहरह तव आह्वान प्रसारित, शुभी तव उदार वाणी
हिन्दू बौद्ध शीख जैन पारसिक मुसलमान ख्रिस्तानी
पूरब पश्चिम आस - तव सिंहासन पासी - प्रेम हार हय गाथा।
जन गण ऐक्य विधायक जय हे भारत भाग्य विधाता
जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे! ||२||

पतन अभ्युदय बंधुर पंथ, युग युग धावित यात्री।
हे चिरसारथी तव रथचक्रे मुखरित पथ दिनरात्री
दारुण विप्लव माझे - तव शंख ध्वनी बाजे - संकट दुःख त्राता।
जन गण पथ परीचायक जय हे भारत भाग्य विधाता
जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे! ||३||

घोर तिमिर घन निविड निशीथे, पीडित मूर्च्छित देशे
जाग्रत छिल तव अविचल मंगल नत नयने अनिमेषे
दुःस्वप्ने आतंक - रक्षा करिले अंके - स्नेहमयी तुमी माता
जन गण दुःख त्रायक जय हे भारत भाग्य विधाता
जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे! ||४||

रात्री प्रभातिल उदिल रविच्छवी पूर्व उदय गिरी भाले
गाहे विहंगम पुण्य समीरण नवजीवनरस ढाले।
तव करुणा रूण रागे - निद्रित भारत जागे-
तव चरणे नत माथा ।
जय जय जय हे जय राजेश्वर भारत भाग्य विधाता
जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे! ||५||

-रविंद्रनाथ टागोर
१९०५





Controversy : या गीता संदर्भात टागोरांवर ब्रिटिश हुजरेगिरी चा आरोप

सन १९११ रोजी ब्रिटिश किंग जॉर्ज 5th हा‌ भारत दौऱ्यावर आला होता. या राजाचे भारतात अतिशय शाही इत्मामात स्वागत झाले होते. मुंबई च्या ज्या धक्क्याला किंग जॉर्ज 5th चे जहाज लागले होते तेथे या ब्रिटिश राजाच्या स्वागता प्रित्यर्थ ‘Gate way of India ‘ ची उभारणी केली गेली होती.राजाच्या स्वागत समारंभात रविंद्रनाथ टागोर यांनाही आमंत्रित केले गेले होते व या स्वागत समारंभात रविंद्रनाथ टागोरांनी त्यांचे ‘जन गण मन’ हे गीत गायले होते.पूढे काही लोकांनी टागोरांनी हे गीत खास किंग जॉर्ज 5th साठी लिहिलेले प्रशंसा गीत होते असे म्हणून टागोरांनी ब्रिटिश राजाची हुजरेगिरी केल्याचा आरोप त्यांच्यावर केला . विशेष करून गीतातील”अधिनायक” हा शब्द किंग जॉर्ज 5th साठी वापरण्यात आला आहे असे या आरोपात म्हटले गेले होते.या आरोपात पुढे असेही म्हटले गेले होते की या हुजरेगिरी चे बक्षिस म्हणून टागोरांना 1913 साली याच गीतासाठी साहित्याचे नोबेल प्राईज देण्यात आले व त्यावेळी किंग जॉर्ज 5th हा नोबेल सिलेक्शन कमीटीचा चेअरमन होता.

तथ्य काय होते

खरेतर किंग जॉर्ज 5th च्या १९११ सालच्या स्वागत समारंभात रविंद्रनाथ टागोरांसोबत रामानुज चौधरी हे कवी ही उपस्थित होते व त्यांनी त्यांचे जे गीत समारंभात वाचून दाखवले ते किंग जॉर्ज 5th साठी लिहिलेले स्तुतीपर गीत होते. उपस्थित असलेल्या ब्रिटिश पत्रकारांनी बातमी लिहिताना गफलतीने टागोरांनी किंग जॉर्ज 5th साठी स्तूतीपर गीत गायले असे लिहिले व‌ त्यामुळे टागोरांबद्दल ब्रिटीश धार्जिणे असल्याचा गैरसमज पसरला.1913 साली किंग जॉर्ज 5th Nobel Committee चा चेअरमन नसून हेराॅल्ड गैब्रिअल हा चेअरमन होता हे उपलब्ध नोंदी व कागदपत्रांवरून सिद्ध होते.

वरील उदाहरणातून हे सिद्ध होते की महान व्यक्ती ही आरोपांच्या चीखलफेकीतून वाचत नाहीत पण सत्य हे कुणाच्या ही आरोपांमुळे बदलत नाही.
रविंद्रनाथ टागोर यांची एक दुर्मिळ चित्र फीत YouTube वर उपलब्ध आहे ‌ज्यात ते स्वतः राष्ट्र गीत गाताना दिसतात. ती चित्रफीत या लिंकवर जरूर पहा.

हे ही वाचा:

➡️‘दिल्ली दरबार’ हे मुघल नाही ब्रिटिश राज सोहळे होते – ब्रिटिशांनी 3 भव्य ‘दिल्ली दरबार’ भारतात केले.. जाणून घ्या कधी..

➡️पहिली Mumbai Local Train -उद्घाटनाला नाना शंकरशेठ हजर होते पण गव्हर्नर फॉकलंड गायब होते..

➡️The Great Maratha Mahadji Shinde यांचे जन्मगाव कोणते? श्रीगोंदा, जामगाव की कण्हेर खेड..

▶️गणपती बाप्पा ! नंतर “मोरया!” असे का म्हणतात ? मोरया गोसावी आणि त्यांच्या चिंचवड मधील संजीवन समाधी मंदिरा बद्दल जाणून घ्या

About The Author

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

2 thoughts on “‘जनं गणं मनं’ गीताचे फक्त पहिले कडवे National Anthem झाले – मूळ गीत 5 कडव्यांचे आहे – टागोरांनी लिहिलेले पूर्ण राष्ट्रगीत जाणून घ्या”

Leave a Comment