भारतामध्ये Crypto Currency एक्सचेंजवर सरकारी तपासणी
गेल्या काही वर्षांत Crypto Currency हा शब्द सतत ऐकायला मिळत आहे. भारतात ही बिटकॉइनसह अनेक डिजिटल करन्सीज लोकांच्या गुंतवणुकीत स्थान मिळवत आहेत. अशातच 27 Crypto Currency एक्सचेंज बाबत financial misconduct च्या तक्रारींची तपासणी सरकार ने सुरू केली आहे.
Crypto Currency वर सरकारी कारवाईचे मुख्य मुद्दे
1. आर्थिक गैरव्यवहाराची शक्यता- Financial misconduct
भारत सरकार, विशेषतः वित्त मंत्रालय आणि इनफॉरमेशन टेक्नोलॉजी मंत्रालय, यांनी देशातील २७ प्रमुख क्रिप्टोकरन्सी एक्स्चेंजेसवर तपास कार्य सुरू केले आहे. अनेक एक्सचेंजवर मनी लॉन्डरिंग, बेकायदेशीर व्यवहार, Money Laundering आणि सायबर क्राईमशी संबंधित तक्रारींमुळे चौकशी सुरू आहे.
2. ग्राहकांच्या निधीचे संरक्षण- सरकारची प्राथमिकता
Crypto Currency मध्ये गुंतवणूक वाढल्याने गुंतवणूकदारांचे संरक्षण व नियमन अत्यंत महत्त्वाचे झाले आहे.
3. कर नियमांचे पालन
काही एक्सचेंजने कर नियमांचे योग्य पालन केले नसल्याचे प्राथमिक निष्कर्षांमध्ये दिसत आहे.
जागतिक बाजारात Crypto Currency ची वाढ
भारतामध्ये तपासणी सुरू असताना, जागतिक Crypto Currency बाजाराचा आकार तब्बल 16 अब्ज रुपयांवर पोहोचला आहे. या वरून Crypto Currency जगात स्थिरावत आहे असे चित्र आहे. भारत या अपरिहार्य बदलाला एकीकडे स्वीकारत आहे व त्याच बरोबर Regularity framework देण्याबाबत आग्रही आहे.
बाजार वाढीची कारणे
- ब्लॉकचेन तंत्रज्ञानाची वाढती स्वीकार्यता
- डिजिटल व्यवहारांना पाठिंबा
- आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांचा वाढता सहभाग
- जागतिक बाजारपेठेत crypto currency चा लक्षणीय विकास पाहता Crypto Currency ला
केवळ गैरप्रकार आणि जोखीम याच्यापुरते मर्यादित ठेवता येणार नाही. जागतिक स्तरावर या उद्योगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. 2024 साली जागतिक क्रिप्टो बाजार सुमारे 2.6 अब्ज डॉलर्स (अंदाजे २१६ अब्ज रुपये) इतका आहे. आणि येत्या 2035 पर्यंत हा बाजार 15 अब्ज डॉलर्स (अंदाजे १२४५ अब्ज रुपये) पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
म्हणजेच, दीर्घकालीन दृष्ट्या क्रिप्टोकरन्सीच्या बाजारात प्रचंड वाढ होणार आहे. पण ही वाढ सातत्य पूर्ण आणि सर्वांच्या फायद्याची व्हायची असेल, तर यासाठी स्पष्ट नियमावली, सुरक्षित तंत्रज्ञान आणि जबाबदार गुंतवणूकदारांचा सहभाग हे तीनही घटक अत्यंत गरजेचे आहेत अशी भारत सरकारची भूमिका आहे.
भारतासाठी पुढील दिशा
Crypto Currency चे नियमन पारदर्शक केले तर याचा दीर्घकालीन फायदा भारतीय अर्थव्यवस्थेला होऊ शकतो. गुंतवणूकदारांचे संरक्षण, कर व्यवस्थापन आणि सुरक्षित डिजिटल व्यवहार ही तीन मुख्य क्षेत्रे सरकारला मजबूत करावी लागतील.
सरकारचा मुख्य उद्देश या डिजिटल मंचांवर नियमन लादून, गुंतवणूकदारांचे पैसे सुरक्षित करणे आहे. क्रिप्टोकरन्सी ही अजूनही एक अशी बाब आहे, जिथे पारंपरिक बँकिंगप्रमाणे कठोर नियम नाहीत, याचा फायदा घेऊन काही गुन्हेगारी तत्त्वे सामान्य लोकांना फसवू शकतात, हे सरकारला समजले आहे.
तपासात आढळलेली चिंताजनक तथ्य
सरकारच्या तपासात एक चिंताज आकडा समोर आला आहे. अंदाजे 2,872 गुंतवणूकदारांना विविध क्रिप्टो एक्स्चेंजेसमधील अनियमिततांमुळे आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे. या नुकसानीची एकूण रक्कम सुमारे 600 कोटी रुपये इतकी भरली आहे! हा आकडा केवळ अंदाजाचा नसून, चिंताजनक तथ्य आपल्या पुढे मांडतो.
जलद व मोठ्या नफ्याचे गुंतवणूकदारांना आमीष
बहुतेक वेळा, गुंतवणूकदारांना “जलद आणि मोठ्या नफ्याचे” आमीष देऊन त्यांच्याकडून पैसे घेतले जातात. काही एक्स्चेंजेस अशी सूचना देतात की त्यांच्याकडे गुंतवणूक केल्यास थोड्याच अवधीत पैसे दुप्पट-तिप्पट होतील, पण प्रत्यक्षात ते पैसे परत मिळत नाहीत. अशा प्रकारच्या गैरप्रकारांपासून सामान्य माणसाचे रक्षण व्हावे, यासाठी सरकारचा हा पाठपुरावा नक्कीच आवश्यक आहे.
भारतासाठी Crypto हे Digital Asset
भारत सरकार Crypto Currency ला CURRENCY न मानता Digital Asset या नावाने मान्यता देते.
मद्रास हायकोर्टाचा निकाल
यासंदर्भात मद्रास हायकोर्टाने नुकत्याच दिलेल्या निकालानुसार Crypto Currency ला digital property म्हणून मान्यता दिली गेली आहे.
RBI ची Crypto Currency
RBI ने स्वतः स्वतः ची Central Bank Digital Currency (CBDC) ,e-rupee नावाने pilot project स्वरूपात लॉन्च केली आहे.
Coins Act 2025 व SEBI
भारत सरकार Coins Act 2025 हा कायदा पास करून क्रिप्टो चलनाला नियंत्रित करण्याचा विचारही करत आहे. शक्यता आहे की भविष्यात Sebi Security and Exchange Board द्वारा Crypto चे नियंत्रण केले जाईल.
FIU-INDIA मधे नोंदणी
FIU (Financial Intelligence Unit-IND) या संस्थे द्वारा प्राथमिक स्तरावर आर्थिक गैरहजर (PMLA- prevention of money laundering Act) या कायद्या अंतर्गत Crypto Currency व्यवहार करणार्या संस्था FIU-IND मधे नोंदणीकृत करण्याचे बंधनकारक आहे.
Crypto Currency गुंतवणुकीसाठी सावधानतेचे मुद्दे
1. संशोधन करा: कोणत्याही एक्स्चेंजवर खाते उघडण्यापूर्वी त्याबद्दल चांगले संशोधन करा. ते exchange सरकारने मान्यता दिलेले आहे का? त्याची बाजारात मागणी चांगली आहे का?
2. KYC करा: ‘Know Your Customer ‘ (KYC) प्रक्रिया पूर्ण करणाऱ्या एक्स्चेंजेसवरच विश्वास ठेवा. यामुळे प्लॅटफॉर्मची प्रामाणिकता सिद्ध होते.
3. जोखीम समजून घ्या: क्रिप्टोकरन्सी बाजार अतिशय चढ-उताराचा (volatile) असतो. म्हणून जे पैसे गमावण्याची तयारी आहे, तेवढ्याच पैशाची गुंतवणूक करा.
4. ऑफलाइन वॉलेटचा वापर: मोठी रक्कम असल्यास, ती एक्स्चेंजवर ऐवजी सुरक्षित ऑफलाइन ‘वॉलेट’ मध्ये ठेवण्याचा विचार करा.
निष्कर्ष
क्रिप्टोकरन्सी ही भविष्याची दिशा असू शकते, पण ती दिशा सुरक्षित आणि सर्वसमावेशक असायला हवी. सरकारचा सध्या चाललेला तपास हा एक योग्य आणि आवश्यक पाऊल आहे. यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढेल आणि हा उद्योग आपल्या देशातही विश्वासार्ह रित्या रुजेल.
हे ही वाचा : भारतात Crypto Currency वर आहे कर . किती आहे हा कर ? जाणून घ्या
AI चे दोन प्रकार – Agentic AI व Assistant AI-फरक जाणून घ्या
Start-up म्हणजे काय? Start-up साठी भांडवल कसे मिळवावे







