महिलांसाठी जगातील पहिली फिटेड जीन्स जन्मली १९७७ साली : Fitted Jeans ची जन्म कथा

A girl model giving a pose
A lady model wearing fitted jeans with confidence

Fitted Jeans : महिलांच्या शरीर ठेवणी अनुरूप आकार घेणाऱ्या जीन्स प्रथमच बनवून Gloria Vanderbilt आणि मोहन मुरजानी यांनी जीन्स ला fashionable केले

Collage pictures of a girl model
ग्लोरिया वॅंडरबिल्ट‌ ची मॉडेलिंग छायाचित्रे सौजन्य Google 


कोण होती ग्लोरिया वॅंडरबिल्ट‌?

20  फेब्रुवारी १९२४ रोजी अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात जन्मलेल्या 
ग्लोरिया वॅंडरबिल्ट, या एका अमेरिकन उद्योगपतीच्या कन्या होत्या,
लहानपणापासूनच त्यांना वेशभूषा कलेची आवड‌ होती. अमेरिकेत हैलोवीन सणाच्या पार्टी साठी विचित्र पोशाख करून‌ जाण्याची प्रथा आहे. या पार्ट्यांना जाताना ग्लोरिया चे पोशाख लक्षवेधी ठरत. आपल्या वक्तृत्व कलेसाठी ती प्रसिद्ध होती.ग्लोरिया पुढे प्रसिद्ध मॉडेल झाली. आपले कपडे डिझाईन करताना ती त्यांना personal touch देई. वयाच्या तिसाव्या वर्षी एका प्रसिद्ध मासिकाने तिचे नाव जगातील सुंदर स्त्री मॉडेल्स च्या यादित छापले होते.
 वयाच्या ५३ व्या वर्षी म्हणजे १९७७ मध्ये त्यांनी भारतीय वंशीय व हॉंगकॉंग स्थित व्यापारी मोहन मुरजानी यांच्याबरोबर जगातील पहिल्या महिलांसाठी फिटेड जीन्सची निर्मिती केली. ही जीन्स महिलांच्या शरीराला अगदी “द्राक्षाच्या सालीसारखी” ( Like a skin on grape) बसते असे कल्पक घोषवाक्य या जीन्सच्या प्रचारासाठी वापरण्यात आले.
जगातील महिलावर्गाला stretch Jeans घ्या रूपात त्यांची fashion statement देणार्या Gloria Vanderbilt यांचे 2019 रोजी वयाच्या ९५ व्या वर्षी न्यूयॉर्क येथे निधन झाले.
Collage of two business persons
पहिल्या Fitted jeans चे निर्माते मोहन मुरजानिया व ग्लोरिया वॅंडरबिल्ट‌ Courtesy: Google 

७० च्या दशकात  रफ-टफ जीन्सचा महिला अनुरूपतेकडे प्रवास

७० च्या दशकात, जेव्हा “एक-स्टाईल-सर्वांसाठी” ONE STYLE FITS ALL जीन्सचे प्रचलन होते, तेव्हा हाँगकाँगमध्ये जन्मलेले भारतीय वस्त्रोद्योगी मोहन मुरजानी आणि अमेरिकन सामाजिक व्यक्तिमत्त्व व fashion Icon असलेल्या ग्लोरिया वॅंडरबिल्ट यांनी व्यावसायिक हातमिळवणी करून महिलांच्या शरीराला पूर्णतः अनुरूप अशा जीन्सची निर्मिती केली. त्यांनी महिलांच्या शरीररचनेला अनुरूप अशा डिझाईनवर भर दिला ज्यामुळे त्या जीन्स दावा केल्या प्रमाणे  महिलांच्या शरीरावर अगदी”द्राक्षाच्या सालीसारख्या” चपखल बसत होत्या.

 स्ट्रेच डेनिम कापडाचा चा शोध आणि निवड

अनेक महिने मोहन मुरजानी आणि ग्लोरिया वॅंडरबिल्ट यांनी “स्ट्रेच” असलेल्या डेनिम फॅब्रिकचा  शोध घेतला. त्यांनी इंडिगो (निळा रंग)ची एक विशिष्ट छटा निवडली, जी नंतर क्लासिक ब्लू डेनिम्सचा रंग बनली. त्यांनी हाँगकाँगमध्ये लूम्स स्थापन केले आणि लवकरच “महिलांसाठी” त्यांच्या शरीरा अनुरूप बनवलेल्या जीन्स बाजारात विक्रीसाठी पाठवण्यास सुरुवात केली.

खास महिलांसाठी ब्रँडेड जीन्सची संकल्पना Gloria Vanderbilt fitted jeans 

यापूर्वी महिलांसाठी जीन्स  बनत पण त्या महिलांच्या शरीराला अनुरूप नसत. आकार वा pattern  च्या दृष्टीने त्या पुरुषांच्या शरीरासाठी डिझाइन केलेल्या जीन्स सारख्याच असत आणि महिलांना त्या विकत घेऊन त्यात बदल करावे लागत. मोहन मुरजानी आणि ग्लोरिया वॅंडरबिल्ट यांनी ही परिस्थिती बदलण्याचा निर्णय घेतला. त्यांनी महिलांसाठी ब्रँडेड जीन्स तयार केल्या, परंतु त्या प्रीमियम किंमतीत उपलब्ध होत्या. सुरूवातीला या जीन्स च्या किंमती साधारण जीन्सच्या किंमती हून चौपट असत. असे असले तरी या जीन्स ना महिला वर्गाकडून भरभरून प्रतिसाद मिळाला.

जाहिरात मोहिम आणि यश

दिमाखदार व्यक्तीमत्व लाभलेल्या ग्लोरिया वॅंडरबिल्ट यांनी स्वतःच‌ मॉडेल  म्हणून त्यांच्या जीन्स च्या जाहिरात मोहिमेत भाग घेतला. या fitted jeans चे ब्रॅण्ड नाव ही Gloria Vanderbilt असे ठेवण्यात आले. जीन्स मधले हे पहिले Designer Label होते .

Gloria Vanderbilt jeans च्या विक्री साठी जीन्सच्या पहिल्या बॅचमध्ये एक लाखाहून अधिक जीन्स होत्या, आणि प्रत्येक जीन्स $३२ मध्ये विकली गेली, जी रॅंगलर किंवा लेव्ही स्ट्रॉसच्या जीन्सपेक्षा जवळपण चार पट जास्त होती. जाहिरातीतील “द्राक्षाच्या सालीसारख्या”  LIKE A SKIN ON A GRAPE या पंचलाइनने महिला ग्राहकांना आकर्षित केले आणि या जीन्स च्या विक्रीने उच्चांक गाठला. ( History of fitted ladies jeans)

Fitted jeans ठरली Perfect Market Fit

महिला जीन्स ने जीन्स ला उपयुक्त किंवा rough use pants घ्या श्रेणीतून fashionable व glamorous श्रेणीत आणले

हे सिद्ध झाले की, परफेक्ट मार्केट फिट (PMF) तुम्हाला यशाच्या शिखरावर नेऊ शकते. ग्लोरिया वॅंडरबिल्ट आणि मोहन मुरजानी यांनी केवळ जीन्स निर्माण केल्या नाहीत, तर त्यांनी महिलांच्या फॅशनमध्ये एक नवीन युग सुरू केले. त्यांच्या या नाविन्यपूर्ण संकल्पनेमुळे जीन्स हा केवळ एक रफ-टफ पोशाख न राहता, ती एक फॅशन स्टेटमेंट बनली.

या कहाणीतून आपल्याला एक महत्त्वाचा निष्कर्ष मिळतो: योग्य बाजारात योग्य उत्पादन (Perfect Market Fit) तुम्हाला यशस्वी बनवू शकते. ग्लोरिया वॅंडरबिल्ट आणि मोहन मुरजानी यांनी त्यांच्या नाविन्यपूर्ण डिझाईन आणि मार्केटिंग स्ट्रॅटेजीद्वारे हे सिद्ध केले.

Girl model wearing a fitted Jeans
Girl model wearing a fitted Jeans 

Fitted Jeans ची वैशिष्ट्ये 

डिझाईन आणि फिटमधील नाविन्यता

ग्लोरिया वॅंडरबिल्ट आणि मोहन मुरजानी यांनी महिलांच्या शरीररचनेला अनुरूप अशा जीन्सची निर्मिती केली. त्यांनी महिलांच्या कंबर, हिप्स आणि पायांच्या आकाराचा विचार करून जीन्स डिझाइन केल्या. यामुळे महिलांना आरामदायक आणि शैलीपूर्ण जीन्स मिळाल्या. त्यांच्या जीन्समध्ये 

  • स्लिम फिट, 
  • हाय-वेस्ट 
  • फ्लेअर्ड बॉटम्स

 सारख्या डिझाईनचा समावेश होता, जे महिलांच्या फॅशनमध्ये एक नवीन ट्रेंड सेट करणारे ठरले.

लक्झरी आणि फॅशनचे 

ग्लोरिया वॅंडरबिल्ट स्वतः एक प्रसिद्ध सामाजिक व्यक्तिमत्त्व आणि फॅशन आयकॉन असल्या कारणाने त्यांनी जीन्समध्ये लक्झरी आणि फॅशनचे संयोजन केले. त्यांच्या जीन्समध्ये  

  • स्टायलिश स्टिचिंग 
  • डिझायनर लेबल्स  
  • प्रीमियम  दर्जाचे streach फॅब्रिक्स 

चा वापर केला गेला. यामुळे जीन्स केवळ एक साधा पोशाख न राहता, तो एक उच्च फॅशन आयटम बनला. त्यांच्या जीन्सच्या कलेक्शनमध्ये ग्लॅमरस आणि सोफिस्टिकेटेड लुक देण्यावर भर होता.

जीन्स लेबल
पहिले Sofistiicated आणि high fashion मानले गेलेले Gloria Vanderbilt jeans label‌: Courtesy Google 

डिझायनर लेबलचा प्रथमच वापर

मोहन मुरजानी, जे एक यशस्वी व्यापारी होते, त्यांनी ग्लोरिया वॅंडरबिल्टच्या नावाचा वापर करून जीन्सच्या ब्रँडिंग आणि मार्केटिंगमध्ये एक नवीन दृष्टिकोन आणला. त्यांनी “ग्लोरिया वॅंडरबिल्ट”

“Gloria Vanderbilt” 

 हे नाव त्यांच्या fitted jeans लेबलवर छापले, ज्यामुळे त्या जीन्स एक प्रतिष्ठित आणि फॅशनेबल ब्रँड म्हणून ओळखल्या गेल्या. ही पद्धत त्यावेळी अत्यंत नाविन्यपूर्ण होती, कारण त्यावेळी डिझायनर लेबल्सचा वापर जीन्समध्ये फारसा केला जात नव्हता.

महिला सशक्तिकरणाचा संदेश

ग्लोरिया वॅंडरबिल्ट आणि मोहन मुरजानी यांनी त्यांच्या जीन्सद्वारे महिला सशक्तिकरणाचा संदेश दिला. त्यांच्या जीन्सने महिलांना आत्मविश्वास आणि स्वातंत्र्याची भावना दिली. या जीन्समुळे महिला केवळ घराबाहेरच नव्हे तर कामाच्या ठिकाणी आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये देखील आरामदायक आणि शैलीपूर्ण राहू शकत होत्या. त्यांच्या जीन्सने महिलांच्या फॅशनमध्ये एक नवीन मानक निर्माण केले.

Oversized महिलांसाठी प्रथमच जीन्स चा पर्याय 

 Fitted Jeans या over size महिलांसाठी ही पर्याय असू शकतात हे वैशिष्ट्यपूर्ण धोरण ही जीन्स निर्मिती करताना ठेवण्यात आले‌ व तशा पद्धतीने जीन्स ची जाहिरात ही करण्यात आली. आपल्या over size शरीराचा संकोच न बाळगता महिला प्रथमच या fitted jeans वापरू लागल्या. आपल्या व्यवसायीक महिला सशक्तीकरण धोरणाचा अवलंब Gloria Vanderbilt jeans ने केला. ( History of fitted ladies jeans)

Girl models in Jeans
Gloria Vanderbilt All size jeans 

फॅशन आणि कार्यक्षमता

ग्लोरिया वॅंडरबिल्ट‌ च्या जीन्स मधे फॅशन आणि कार्यक्षमतेचे योग्य संतुलन होते. जरी या जीन्स स्टायलिश आणि फॅशनेबल असल्या तरी, त्या टिकाऊ आणि आरामदायक देखील होत्या. यामुळे महिलांना दररोजच्या वापरासाठी आणि विशेष प्रसंगांसाठी देखील योग्य अशा जीन्स मिळाल्या. 

भारतीय तरुणींची fashion statement 

आज संपूर्ण जगात महिलांच्या फिटेड  डेनीम चे वेगवेगळे ब्रांड अस्तित्वात आले आहेत कारण महिलांकडून आशा स्ट्रेच जीन्स ची भरपूर खरेदी होत असते .  भारतात ही तरूणींमधे strech fabric घ्या fitted jeans लोकप्रिय आहेत. एकाच वेळी casual comfort देणार्या या जीन्स fashion statement म्हणून ही घातल्या जातात.

Marathi Actor Pragati Nayak making her elegant fashion statement in her strech denims 

निष्कर्ष

लेव्ही स्ट्रॉस अँड कंपनीने १९३० च्या दशकात महिलांसाठीही जीन्सची निर्मिती सुरू केली होती पण त्या स्त्री शरीरास अनुरूप नव्हत्या .१९७० च्या दशकात ग्लोरिया वॅंडरबिल्ट आणि मोहन मुरजानी यांनी सुरू केलेल्या महिला जीन्स उत्पादनाने फॅशन इंडस्ट्रीमध्ये एक नवीन आणि वेगळा अध्याय सुरू केला. Gloria Vanderbilt या जीन्स चे Like a Skin on grape हे घोषवाक्य सहजता व  एकरूपता सुचवते जो स्त्री मनाचा स्थाईभाव‌च आहे. (History of fitted ladies jeans)

Jeans and a pot of grapes at a window
Symbolic picture created with Ai

Leave a Comment