भारतातील कोट्यवधी लोकांसाठी Aadhaar Pan Link करण्याची प्रक्रिया आता अनिवार्य झाली आहे. हे linking करण्यासाठी अंतीम मुदत (Deadline) अजून संपली नाही, तरी नुकतीच linking प्रक्रिया संपलेल्या किंवा ज्यांनी अजून प्रक्रिया सुरूच केली नाही अशांना भीती आहे की त्यांचे PAN Card रद्द झाले असेल की काय. जर तुम्ही प्रक्रिया सुरू करून ₹१००० चा दंड (Penalty) भरला असेल, तरीही स्टेटस अपडेट झालेला नसेल, तर काळजी करू नका! तुम्ही Status बाबत online खात्री करून घेवू शकता . Mobile वर पॅन आधार लिंक स्टेटस कसे तपासायचे याबद्दल खालील माहिती वाचा.
1. Aadhaar Pan link status check by Mobile कसे तपासावे?
तुमचे आधार आणि पॅन लिंक झाले आहे की नाही हे तपासणे खूप सोपे आहे. यासाठी खालील सोप्या स्टेप्स फॉलो करा:
- सर्वप्रथम Google Search मध्ये जा आणि ‘Income Tax e-Filing Portal‘ सर्च करा, किंवा थेट वेबसाइटवर जा.
- होमपेजवर डाव्या बाजूला ‘Quick Links’ विभागात, “Link Aadhaar Status” नावाचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
- नवीन पेजवर, तुम्हाला तुमचा PAN Number आणि Aadhaar Number विचारला जाईल. ही माहिती अचूक भरा.
- “View Link Aadhaar Status” बटणावर क्लिक करा.
स्टेटसचे निष्कर्ष आणि त्यांचा अर्थ
- “Aadhaar-PAN Link is not available” (तुमचे आधार-पॅन लिंक झालेले नाही): तुम्हाला लवकरात लवकर ₹१००० दंड भरून लिंकिंग प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
- “Your PAN is linked to Aadhaar number [XXXX]” (तुमचे पॅन आधारशी जोडले आहे): अभिनंदन! तुमचे काम पूर्ण झाले आहे.
- “Payment Details Not Found” (दंड भरल्याची माहिती मिळाली नाही): हा सर्वात सामान्य प्रॉब्लेम आहे. याचा अर्थ तुम्ही दंड भरला आहे, पण तो अजून IT विभागाच्या सिस्टीममध्ये अपडेट झालेला नाही.
2. तुमचे PAN Card रद्द झाले आहे की नाही, कसे तपासायचे?
जर तुमचे पॅन कार्ड ॲक्टिव्ह (Active) नसेल, तर मोठे आर्थिक व्यवहार थांबतात. तुमचे पॅन कार्ड कार्यरत आहे की नाही, हे तुम्ही एका मिनिटात तपासू शकता:
- Income Tax e-Filing Portal वर जा.
- ‘Quick Links’ मध्ये “Verify Your PAN” (तुमचे पॅन तपासा) या पर्यायावर क्लिक करा.
- येथे तुमचा PAN Number, पूर्ण नाव (Full Name), जन्म दिनांक (Date of Birth) आणि मोबाइल नंबर भरा.
- तुमच्या मोबाइलवर आलेला OTP (वन टाइम पासवर्ड) भरा.
जर स्टेटस “PAN is Active and details are as per PAN” असे दाखवत असेल, तर तुमचे पॅन कार्ड सुरक्षित आहे, भलेही आधार लिंकचा स्टेटस अपडेट झालेला नसेल!
3. दंड भरण्याची प्रक्रिया (Penalty Payment Process) आणि Challan 280
जर तुमचा Adhar Pan Link झाला नसेल, तर तुम्हाला ₹१००० चा दंड भरावा लागेल. हा दंड भरताना अनेक लोक ‘Challan 280’ मध्ये मोठी चूक करतात.
दंड (Penalty) भरण्याची सोपी पद्धत
दंड भरण्यासाठी खालील स्टेप्स अचूकपणे फॉलो करा:
- e-Pay Tax या पर्यायावर क्लिक करा.
- “Income Tax” (IT) हा टॅक्स ॲप्लिकेबल हेड निवडा.
- Assessment Year (निर्धारण वर्ष) म्हणून तुम्ही सध्याचे वर्ष (उदा. 2024-25) निवडा.
- Payment Type (पेमेंटचा प्रकार) मध्ये “Other Receipts (500)” हा पर्याय निवडा. हा सर्वात महत्त्वाचा आहे!
- तुमच्या दंडाची रक्कम ₹१००० भरा आणि पेमेंट पूर्ण करा.
या प्रक्रियेत ‘Major Head 0021 (Income Tax – Other than companies)’ आणि ‘Minor Head 500’ बरोबर निवडणे आवश्यक आहे.
दंड भरल्या नंतर: Payment Details दिसत नसतील तर काय करायचे?
जर तुम्ही दंड भरला असेल, पण स्टेटस ‘Payment Details Not Found’ दाखवत असेल, तर घाबरू नका. IT विभाग तुमचा दंड (Challan) प्रोसेस करण्यासाठी ४ ते ७ दिवस वेळ घेतो. ७ दिवसांनंतर पुन्हा Aadhaar pan link status check by mobile करा.
तपासा. एकदा दंड स्वीकारला गेला की, तुम्ही दुसऱ्या प्रयत्नात सहजपणे Aadhaar Pan Link करू शकाल।
वरील प्रमाणे ‘पॅन आधार लिंक स्टेटस कसे तपासायचे’ ही महत्वपूर्ण माहिती आपल्या मित्र परिवारा सोबत जरूर शेअर करा जेणे करून त्यांचे पॅन कार्ड रद्द होणार नाही!
हे ही वाचा : start up म्हणजे काय ? कसे उभारायचे भांडवल
Aadhaar Pan Link ची शेवटची तारीख -Last date वाढवली
Girija Oak ची viral निळी साडी – ब्रांड कोणता ? किंमत काय?
FAQ:
आधार-पॅन लिंक होण्याची प्रक्रिया पूर्ण व्हायला नेमका किती वेळ लागतो?
आधार-पॅन लिंक होण्याची प्रक्रिया साधारणपणे दोन टप्प्यांत विभागलेली आहे:दंड भरण्याची पुष्टी (Payment Confirmation): दंड भरल्यानंतर (Challan 280), आयकर विभागाला तुमच्या पेमेंटची पुष्टी करण्यासाठी ४ ते ५ कामकाजाचे दिवस लागतात.लिंकिंगची अंतिम पुष्टी (Final Linking Confirmation): पेमेंटची पुष्टी झाल्यानंतर तुम्ही लिंकची विनंती करता. ही विनंती यशस्वी झाल्यावर, आधार-पॅन लिंक झाल्याची स्थिती (Status) पोर्टलवर अपडेट होण्यासाठी साधारणपणे ४८ तास लागू शकतात.







