Ajit Pawar Air Crash कशामुळे? Possible reason by expert – Baramati air crash च्या दुर्दैवी घटनेनंतर माध्यमांमध्ये चर्चिल्या गेलेल्या तांत्रिक मुद्द्यांचे एव्हिएशन तज्ज्ञाच्या दृष्टीने विश्लेषण.
Radar failure व Visibility ही दोन्ही कारणे नाकारली
Ajit Pawar Air Crash कशामुळे झाला असावा याचे प्राथमिक आडाखे बांधणे शक्य आहे कारण या अपघाताची footage आता उपलब्ध झाली आहेत. प्रसार माध्यमांवर प्रसिद्ध झालेली ही फूटेज पाहून विमान अपघात investigation तज्ञ व पायलट श्री M J Augustine यांनी नुकत्याच दिलेल्या Lallan Top या Youtube चॅनल ला दिलेल्या मुलाखतीत अपघाताच्या संभाव्य कारणांबद्दल आपली मते मांडली. विशेष म्हणजे Augustine यांनी Radar Failure व कमी दृश्यमानतेचा मुद्दा पूर्णपणे नाकारला आहे. आपल्या विश्लेषणात्मक Augustine यांनी खालील मुद्दे मांडले
1) रडारमुळे अपघात झाला नाही
Captain Augustine म्हणाले … लोकांचा गैरसमज असतो की एअर ट्रॅफिक कंट्रोल रडार बिघडल्याने विमान कोसळू शकते. पण प्रत्यक्षात:
- ग्राउंड रडार हे फक्त विमान ट्रॅक करण्यासाठी असते.
- विमानाचे नियंत्रण पायलट On Board उपकरणांच्या आधारे करतो.
- रडार जॅम किंवा फेल झाल्यास विमानाच्या उड्डाण क्षमतेवर थेट परिणाम होत नाही.
म्हणून या प्रकारात रडार हा अपघाताचा मूळ घटक मानला जात नाही.
2) अपघात वेळी Visibility चांगली होती
दृश्यमानता चांगली असल्यास:
- धुके, मुसळधार पाऊस किंवा ढगांमुळे दिशाभ्रम किंवा विमान भरकटण्याची शक्यता कमी असते.
- पायलटला धावपट्टी व आसपासचा परिसर स्पष्ट दिसतो.
यावरून हा अपघात हवामानामुळे झाला असेही दिसत नाही. अशावेळी लक्ष विमानाच्या वेग, कॉन्फिगरेशन आणि अँगल ऑफ अटॅककडे जाते.
3) संभाव्य कारण – डाव्या पंखाचा एरोडायनॅमिक स्टॉल
स्टॉल म्हणजे इंजिन बंद पडणे नव्हे, तर पंखावरची लिफ्ट अचानक कमी होणे. हे सहसा कमी वेग आणि जास्त अँगल ऑफ अटॅकमुळे (कमी वेगात घेतलेले वळण) मुळे होते.
स्टॉल का झाला असू शकतो?
- लँडिंग अप्रोचदरम्यान कमी वेग
- वळण घेताना वाढलेला बँक अँगल
- वजन किंवा फ्लॅप सेटिंग
जर फक्त एका पंखावर आधी स्टॉल झाला तर विमान त्या बाजूला झुकते, नंतर नाक खाली झुकते आणि अचानक उतरण होते.
140 knots असा चांगला वेग असूनही स्टॉल कसा?
स्टॉल स्पीड स्थिर नसतो. वळण, वजन आणि कॉन्फिगरेशनमुळे प्रभावी स्टॉल स्पीड वाढू शकतो. त्यामुळे दर्शनी वेग सुरक्षित दिसला तरी प्रत्यक्षात लिफ्ट कमी होऊ शकते.Ajit Pawar Air Crash footage पाहून तज्ञ Captain Augustine यांनी Ajit Pawar Air Crash footage पाहून याच मुद्याला संभाव्य कारण मानले.
कमी उंचीत stall recovery साठी पायलटने घेतली जोखीम
स्टॉलमधून सावरण्यासाठी नाक खाली करून वेग वाढवावा लागतो. पण लँडिंगच्या जवळ कमी उंचीवर हे करायला वेळ आणि जागा नसते. त्यामुळे recovery अशक्य होऊ शकते. अशा परिस्थितीत विमान Nose dive करते व थेट जमिनीवर आदळते.
Air crash investigation expert Captain Augustine यांच्या अनुमानांचा तांत्रिक सारांश
Ajit Pawar Air Crash footage पाहून असे दिसते:
- हवामान कारणीभूत नाही
- रडार कारण नाही
- लँडिंग अप्रोचमध्ये कमी वेग
- डाव्या पंखाचा स्टॉल
- अचानक roll आणि nose drop
- कमी उंचीमुळे recovery अशक्य
एव्हिएशनमध्ये याला “Low-level aerodynamic stall during approach” असे म्हणतात, जो अत्यंत धोकादायक प्रकार मानला जातो.
हे ही वाचा : Ajit Pawar Air Crash- विमानाचा दोष किती? Bombardier Learjet 45 – विमानाचा इतिहास आणि अपघातांचा मागोवा.. ||







