हौशी खगोल छायाचित्रकार मिशेल हर्नांडेझ बे लिस यांचे आकाशगंगा छायाचित्रणात मोठे यश
Messier 94: क्रोक्स आय गॅलेक्सीचे छायाचित्रण


व्हर्माँटमधील खगोल छायाचित्रकार मिशेल हर्नांडेझ बे लिस( Michele Hernandez Bayliss) यांनी Messier 94 (Croc’s Eye Galaxy) चे एक अद्वितीय छायाचित्र टिपले आहे. ही आकाशगंगा आपल्या सौरमालेपासून सुमारे ३४ दशलक्ष प्रकाशवर्षे दूर आहे.
२० आणि २१ एप्रिलच्या रात्री, त्यांनी Takahashi TOA-130NFB Refractor आणि Stellarvue SVX140T-R telescope चा वापर केला. LRGB (ल्यूमिनन्स, रेड, ग्रीन आणि ब्लू) फिल्टर्सच्या मदतीने अथक २० तासांचा डेटा संकलित करून त्याचे एकत्रिकरण करण्यात आले.
त्यांनी सांगितले, “ Crocs eye galaxy ( M 94) खूप लहान वाटली, त्यामुळे थोडं क्रॉप करावं लागलं. मध्यभाग खूप तेजस्वी असल्याने तो light reflection देत होता यासाठी HDR compression करून galaxy ची रचना चित्रीत करावी लागली.”
Whirlpool Galaxy: Messier 51 चे तपशीलवार निरीक्षण

Crocs eye galaxy चित्रित करण्याच्या दोन महिने आधीच म्हणजे फेब्रुवारी महिन्यात, त्यांनी प्रसिद्ध Whirlpool Galaxy (Messier 51) चेही सुंदर छायाचित्र टिपले. RGB आणि Hydrogen-Alpha (Ha) फिल्टर्सच्या वापरातून १६ तासांचा डेटा मिशेल ने गोळा केला होता.
M51 शेजारी NGC 5195 ही छोटी galaxy
Whirlpool Galaxy ची ही प्रतिमा व्हर्लपूल गॅलेक्सीचा तेजस्वी मध्यभाग, गडद धूळपट्ट्या आणि नवीन तारकांच्या निर्मितीचे क्षेत्र दाखवते. NASA च्या मते, M51 ची रचना त्या galaxy शेजारीच वर दिसणाऱ्या NGC 5195 या लहान गॅलेक्सीच्या प्रकाशामुळे अधिक स्पष्ट झाली असून ते हर्नांडेझ यांच्या छायाचित्रात स्पष्टपणे दिसते.
हौशी खगोल छायाचित्रकार मिशेल ने आपल्या Backyard observatory ( परसदारी ची /हौशी वेधशाळा) मधून प्रयत्नपूर्वक एखाद्या व्यावसायिक खगोल छायाचित्रकाराला लाजवेल असे आकाश गंगांचे चित्रण केले आहे व खुद्द NASA ने तिच्या या प्रयत्नांना दाद दिली आहे.
उत्तर पूर्व अमेरिकेच्या व्हर्माँटमधील डोंगराळ भागात वेधशाळा आणि हवामानाचे आव्हान
मिशेल हर्नांडेझ यांनी याआधी बरीच वर्षे दृश्य खगोलशास्त्रात काम केले आहे. पण खगोल छायाचित्रणात त्या गेल्या दोन वर्षांपासूनच रस घेत आहेत .मागील दोन वर्षांत त्यांनी व्हेब्रिज, व्हर्माँट येथे स्वतःच्या घराजवळ एक लहान वेधशाळा (Backyard observatory)उभारली आहे. आपल्या जर्मन शेफर्ड जातीच्या पाळीव कुत्र्याची साथ त्यांना इथे असते.
व्हर्मांट च्या हवामानाने साथ दिली
व्हर्मांट हा उत्तर पूर्व अमेरिकेचा समुद्रा पासून जवळ असलेला डोंगरी भाग आहे . इतिहास प्रसिद्ध Boston (Boston part) ला लागूनच हा प्रदेश आहे . इथे कायम ढग आच्छादित असे आकाश असते व इथले हवामान अतिशय लहरी आहे. आपल्या spce.com ला पाठवलेल्या ईमेल मधे मिशेल म्हणतात “व्हर्माँटमध्ये स्वच्छ आणि चंद्रविरहित आकाश फारच कमी वेळा मिळतं, त्यामुळे सलग दोन रात्री ढगांशिवाय, चंद्राशिवाय आकाश मिळणं म्हणजे चमत्कारच होता!” आणि या दोन रात्रींमधे २० तास काम करत त्यांनी imaging data रेकॉर्ड केला व M94 Crocs eye galaxy चे अद्भुत चित्रण केले.
निष्कर्ष
हिंदी मधील एक प्रसिद्ध शेर आहे ” कौन केहता है के असमान में छेद नहीं हो सकता| एक पथ्थर तो तबियत से उछालो यारो!” मिशेल हर्नांडेझ यांनी या काव्य पंक्ती खर्या ठरवत आपल्या घराच्या परसदारातून थेट ३४ दशलक्ष प्रकाश वर्षे दूर असलेल्या आकाशगंगेचे छायाचित्र टिपले आहे यावरून हे सिद्ध होते की माणसाच्या इच्छाशक्ती पुढे गगन ही ठेंगणे होते.
FAQ
Galaxy किंवा आकाश गंगा म्हणजे काय?
आकाशगंगा म्हणजे तारे, धूळ, वायू आणि अंधारक पदार्थांनी बनलेली एक मोठी रचना असते. आपली पृथ्वी ज्या “मिल्की वे” आकाशगंगेचा भाग आहे, त्यात अब्जावधी तारे आहेत .
एक प्रकाश वर्षे म्हणजे किती अंतर?
एक प्रकाश वर्ष म्हणजे प्रकाश एका वर्षात जेवढं अंतर पार करतो, ते. ते सुमारे 9.46 ट्रिलियन किलोमीटर इतकं असतं. ( प्रकाश किरणांना सूर्यापासून पृथ्वी पर्यंत यायला आठ मिनिटे इतका वेळ लागतो आणि पृथ्वी पासून सूर्याचे अंतर १४ कोटी ९६ लाख किलोमीटर आहे यावरून प्रकाश वर्ष अंतराचा अंदाज येवू शकतो.)
हौशी खगोल निरीक्षणासाठी बेसिक उपकरणे काय लागतात?
सुरुवातीसाठी: बायनोक्युलर (7×50 किंवा 10×50)स्टार मॅप किंवा मोबाइल अॅप्स (जसे Sky Map, Stellarium)
(जर पुढे रुची असेल तर) टेलिस्कोप व ट्रायपॉड
हौशी खगोल निरीक्षणासाठी प्रशिक्षण मिळते का?
हो, अनेक विज्ञान केंद्रे, खगोल संस्था आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून मूलभूत प्रशिक्षण घेता येते. काही संस्थांकडून प्रमाणपत्र अभ्यासक्रमही उपलब्ध असतात.काही वेबसाईट्स व यूट्यूब चॅनल ही हे प्रशिक्षण देतात







