डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत-नीती वर प्रश्नचिन्ह
अमेरिकेचे पूर्व सचिव ख्रिस्तोफर पेडीला यांनी ट्रम्प सरकारला चेतावणी दिली आहे की भारत आपल्या अपमनाला कधीच विसरणार नाही. भारत नवीन व्यापार संबंध, बाजार आणि खरेदिदार शोधून घेईल.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारतावरील टेरिफ दबाव नीतीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे पूर्व अवर सचिव ख्रिस्तोफर यांनी डोनाल्ड ट्रंप यांच्या भारत नीती वर प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे. टेरिफ सारख्या तात्कालीक मुद्द्यासाठी अमेरिका आपल्या एका जुन्या मित्र राष्ट्राला गमावून बसण्याची शक्यता आहे असे ते म्हणाले.
भारतासारख्या एका जिवंत राष्ट्राला दबावा खाली आणण्याची नीती सफल होणार नाही
ख्रिस्तोफर पेडीला यांनी पुढे असेही सांगितले की भारतावर असाच दबाव आणला तर भारत आपल्यासाठी नवे बाजार व नवे व्यापारी हितसंबंध शोधून घेईल.भारत आपल्या स्वतंत्र अशा विदेश नीती मध्ये कुठल्याही बाह्य हस्तक्षेपाला स्वीकारणार नाही.भारतासारख्या एका जिवंत राष्ट्राला दबावा खाली आणण्याची नीती सफल होणार नाही
फक्त भारत का?
गेल्या काही दिवसात अमेरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताविरुद्ध एक प्रकारची दबावनीती वापरली आहे. त्यांची वक्तव्य व एकूणच भारताबद्दलची दडपशाहीची भूमिका पाहून खुद्द अमेरिकन पत्रकारांनी ट्रम्प यांना “फक्त भारत का?” असा प्रश्न विचारला आहे. असे असताना आता अमेरिकेचे माजी सचिव ख्रिस्तोफर पेडीला यांनी ट्रम्प यांना एक प्रकारे सावधगिरीचा इशारा दिला आहे.
क्रिस्टोफर पेडीला हे अमेरिकेच्या 2002 दशकातील सिविल परमाणु करारामध्ये तसेच महत्त्वपूर्ण व्यापारी वार्तालापांमधे मध्ये सहभागी होते. अमेरिकेच्या व्यापार विभागाचे पूर्व अवर सचिव तसेच विदेश नीती चे विशेषज्ञ राहिले आहेत .ख्रिस्तोफर यांनी ट्रम्प यांना दिलेली ही चेतावणी म्हणजे एक प्रकारचा घरचा आहेरच आहे. भारतासारख्या एका जिवंत राष्ट्राला दबावाखाली आणणे घातक ठरेल. भारत हा काही छोटा देश नाही जो आपल्या मूलभूत हितांसाठी कॉम्प्रोमाइज करेल. भारत हा असा देश नाही की जो आपला अपमान सहजासहजी विसरेल. केवळ आपल्या वोट बँक साठी डोनाल्ड ट्रम्प वारंवार भारताविरुद्ध वक्तव्य करीत आहेत व दबाव पूर्ण अशा भारत नीती चा अवलंब करत आहेत .यामुळे भारतात अमेरिका विरोधी जनमत तयार होवू लागले आहे जे चांगले चिन्ह नाही.
इतिहासातील चुका
1971 च्या युद्धाच्या वेळी अमेरिकेने घेतलेली पाकिस्तान ची बाजू ही बाब अजूनही भारतासाठी अमेरिकेबद्दल मनात एक अविश्वास बाळगून आहे. सध्याच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांमुळे या अविश्वासाला अजूनच बळकटी मिळत आहे.टेरीफ सारख्या छोट्या मुद्द्यावरून अमेरिका भारतासारखा जुना मित्र गमावू शकतो अशी मला चिंता वाटते असे ख्रिस्तोफर म्हणाले. ट्रंप यांच्या या हटवादामुळे अमेरिका व भारत यांच्यामध्ये एक अशी दरी निर्माण होईल जी कधीही पुन्हा जोडली जाऊ शकत नाही. भारत हा देश कधीही आपला अपमान विसरणार नाही व याचे विपरीत व्यापारी परिणाम अमेरिका भविष्यात भोगेल. अमेरिका खरंच आपला मित्र आहे का अशी एक संशय भावना भारताच्या मनात तयार होत आहे हे चांगले चिन्ह नाही.
इतिहासाला उजळणी देत ख्रिस्तोफर म्हणाले की अमेरिकेने एकेकाळी भारताला गहू व अन्य जीवनावश्यक गोष्टींसाठीही अपमानित केले होते. 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धा मध्ये अमेरिकेने पाकिस्तान ला झुकते माप दिले होते. भारत विरुद्ध आपण आपले सैन्य पाठवून देऊ अशी धमकीही त्यावेळी अमेरिकेने दिली होती पण ऐनवेळी रशियाने असे झाल्यास आम्हीही भारताच्या बाजूने आमचे सैन्य युद्धात उतरवू असे बजावले होते. या घटनेला 54 वर्षे झाली तरीही भारत अमेरिकेची ती भूमिका अजूनही विसरू शकला नाही. संकटाच्या काळात कधीही अमेरिकेने भारताची साथ दिली नाही. रशियाने नेहमीच भारताला आपला मदतीचा हात दिला आहे. भारतात कुठलेही सरकार असले तरी भारत व राशीया संबंध नेहमीच मजबूत राहिले आहेत.
भारताच्या अंतर्गत व्यापारी धोरणांमध्ये अमेरिकेची दखल
भारतीय कृषी आणि डेअरी व्यापार मुक्त करावा यासाठी ट्रम्प यांचा दबाव आहे खरे तर ही भारताची अंतर्गत बाब आहे व भारताच्या विदेश नीती व व्यापाराशी तो संलग्न आहे त्यामुळे बाह्य दबाव आणने अयोग्य आहे.
भारतासाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठांचे विकल्प
ख्रिस्तोफर म्हणाले की भारतावर जर टेरिफचा दबाव टाकला तर तो आंतरराष्ट्रीय बाजारात विकल्प शोधेल.रत्ने आणि परिधाने यांच्यासाठी आधीच जागतिक बाजारपेठ उपलब्ध आहेत. तसेच भारतात बनणारे आयफोन ही विकत घेणारे इतर देश आहेतच.
अमेरिकेची चीन बरोबर आश्चर्य कारक नरमाई
एकीकडे अमेरिका भारताविरुद्ध कठोर व्यावसायिक धोरण अवलंबत आहे तर दुसरीकडे चीन सोबत मात्र तो नरमाईने वागत आहे जे आश्चर्यकारक आहे असे क्रिस्तोफर म्हणाले.यालाच दुजोरा देत अमेरिकेच्या स्टेट साऊथ कॅरोलिना च्या पूर्व गव्हर्नर व संयुक्त राष्ट्राच्या पूर्व अमेरिकी राजदूत राहिलेल्या निक हेली यांनीही असे प्रतिपादन केले की “अमेरिकेने भारतावर एक ऑगस्ट पासून अधिक टेरिफ लागू केले पण चीनला या संदर्भात 90 दिवसांची मोहलत दिली हे आश्चर्यकारक आहे.“अमेरिकेचे हे दुटप्पी व्यापारी धोरण स्पष्ट करत निक म्हणाल्या की चीनला सूट दिल्याने कदाचित भारत पुढे चीनशी व्यापारी युती करेल.ख्रिस्तोफर पेडीला यांनी पुढे असे सांगितले की डोनाल्ड ट्रम्प यांच्या या भारत नीती मुळे भारत रशिया व चीनशी जवळीक साधू शकतो जे अमेरिकेच्या व्यापारी हिताच्या दृष्टीने अयोग्य आहे.”भारत हा काही छोटा देश नाही .तो एक जिवंत आत्मनिर्भर डेमोक्रॅटिक देश आहे तो दबावनीती कधीच स्वीकारणार नाही. आपल्या मूलभूत हितांसाठी तो कधीच compromise करणार नाही” असे ख्रिस्तोफर पेडीला म्हणाले.








Nice perspective.