मौसमक्रिकेटऑपरेशन सिंदूरक्रिकेटस्पोर्ट्सबॉलीवुडजॉब - एजुकेशनबिजनेसलाइफस्टाइलदेशविदेशराशिफललाइफ - साइंसआध्यात्मिकअन्य

Avinash Ghodke

Screenwriter and Lyricist with 20 years of experience in Bollywood and Marathi cinema.His creative writing examines the contradictions of lived experience, while his journalism uncovers humanism beneath headlines.

धर्मेंद्र यांना discharge-सनी देओल ने आणले घरी-Dharmendra health update

धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर- ब्रीच कॅंडी वरून जुहूच्या घरी आणले-Dharmendra health update

सध्या ताज्या माहितीनुसार, बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता श्री. धर्मेंद्र यांना आज सकाळी, १२ नोव्हेंबर २०२५ रोजी, मुंबईतील ब्रीच कॅंडी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आले आहे. त्यांचा मोठा मुलगा सनी देओल यांच्या टीमकडून ही माहिती अधिकृतपणे पुष्टी करण्यात आली आहे. धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर असून, पुढील उपचार आणि रिकव्हरीसाठी त्यांना आता त्यांच्या जुहू स्थित घरी नेण्यात आले आहे.

काय झाले होते

89 वर्षांचे धर्मेंद्र यांना श्वाच्छोश्वासाचा त्रास जाणवल्या मुळे 1 नोव्हेंबर रोजी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. योग्य उपचारांनंतर आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे कुटुंबियांनी सांगितले.

घरी उपचाराचा निर्णय

हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झाल्यानंतर आता धर्मेंद्र यांचे उपचार त्यांच्या घरीच सुरू राहतील. हा निर्णय कुटुंबानेच घेतला असून, त्यामागे धर्मेंद्र यांना पारिवारिक वातावरणात आणि जवळच्या लोकांच्या सहवासात उपचार घेता यावेत हा विचार आहे.

ब्रीच कॅंडी हॉस्पिटलचे डॉ. प्रतीत समदानी यांनी ही माहिती PTI ला देताना स्पष्ट केले की, “धर्मेंद्र यांना आज सकाळी ७:३० वाजता हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आले आहे. त्यांची रिकव्हरी आणि उपचार आता घरीच सुरू राहणार आहेत”. डिस्चार्जच्या वेळी बॉबी देओल स्वतः हॉस्पिटलमध्ये हजर होते आणि तेच त्यांना घरी नेण्यासाठी एम्बुलन्समध्ये सोबत होते.

कुटुंब आणि डॉक्टरांचे अपील

धर्मेंद्र यांच्या आरोग्यावर सतत चर्चा होत असल्याने, सनी देओल यांच्या टीमकडून Dharmendra health update संदर्भात एक अधिकृत निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. या निवेदनात मीडिया आणि चाहत्यांना कुटुंबाची खाजगीता राखण्याची विनंती करण्यात आली आहे. तसेच, कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेऊ नयेत असे सांगितले आहे. हॉस्पिटलने देखील असेच एक निवेदन जारी करून सर्वांच्या प्रेम आणि शुभेच्छांबद्दल आभार व्यक्त केले आहेत.

चाहते आणि सेलिब्रिटी मित्रांच्या शुभेच्छा

गेल्या काही दिवसांपासून धर्मेंद्र यांच्या आरोग्याच्या कल्याणासाठी देशभरातील लाखो चाहते प्रार्थना करत होते. बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार जसे की सलमान खान, शाहरुख खान, अमिषा पटेल इत्यादी हॉस्पिटलमध्ये त्यांना भेट देण्यासाठी आले होते. गायक मीका सिंह यांनी सोशल मीडियावर धर्मेंद्र यांच्या आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

चाहत्यांना संदेश

धर्मेंद्र यांच्या आरोग्यात सुधारणा होत असून, त्यांचे लाखो चाहते आणि समर्थक प्रार्थना करत आहेत  की, ते लवकरात लवकर पूर्ण बरे होवून सर्वांच्या सन्मुख येवोत.

सूचना: धर्मेंद्र यांच्या health update ची ही माहिती वृत्तसंस्था आणि बातम्यांच्या संकेतस्थळांवर प्रसिद्ध झालेल्या माहितीवर आधारित आहे. अधिक अद्ययावत माहितीसाठी अधिकृत स्रोतांचा संदर्भ घ्यावा.

About The Author

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment