मौसमक्रिकेटऑपरेशन सिंदूरक्रिकेटस्पोर्ट्सबॉलीवुडजॉब - एजुकेशनबिजनेसलाइफस्टाइलदेशविदेशराशिफललाइफ - साइंसआध्यात्मिकअन्य

Avinash Ghodke

Screenwriter and Lyricist with 20 years of experience in Bollywood and Marathi cinema.His creative writing examines the contradictions of lived experience, while his journalism uncovers humanism beneath headlines.

Dhurandhar चित्रपटावर पाकिस्तानात Ban?निर्मात्यां विरुद्ध FIR? Dhurandhar Controversy जाणून घ्या

 Dhurandhar चित्रपटावर पाकिस्तान च्या PPP पक्षाचा आक्षेप का?काय आहे Benazir Bhutto  संबंधित Dhurandhar Controversy

PPP आणि बेनझीर भुट्टो : ऐतिहासिक व राजकीय पार्श्वभूमी

 PPP पार्टी  धुरंधर वर पाकिस्तानात Ban ची मागणी करत आहे. Pakistan Peoples Party (PPP) ही पाकिस्तानमधील सर्वात जुनी आणि प्रभावशाली राजकीय पक्षांपैकी एक आहे.
या पक्षाची स्थापना झुल्फिकार अली भुट्टो यांनी 1967 साली केली.
रोटी, कपडा और मकान” या समाजवादी घोषणेमुळे PPP सामान्य जनतेत लोकप्रिय ठरली.

झुल्फिकार अली भुट्टो यांच्या फाशीनंतर त्यांची कन्या बेंनाझीर भुट्टो या PPP च्या केंद्रस्थानी आल्या.
त्या मुस्लिम जगातील पहिल्या महिला पंतप्रधान ठरल्या (1988).
बेंनाझीर भुट्टो यांचा राजकीय वारसा हा लोकशाही, नागरी हक्क, आणि लष्करी हुकूमशाहीविरोध या मुद्द्यांशी जोडलेला आहे.

PPP च्या दृष्टीने बेनझीर भुट्टो या केवळ नेत्या नव्हत्या,
तर शहिद-ए-जम्हूरीयत (लोकशाहीसाठी बलिदान देणाऱ्या नेत्या) म्हणून पाहिल्या जातात.
2007 मध्ये त्यांच्या हत्येनंतर PPP साठी त्या आणखीनच संवेदनशील व भावनिक मुद्दा झाल्या आहेत. आज बेनझीर पवित्र अशा शहीद मानल्या जातात.


Benazir Bhutto Dhurandhar Controversy : वादाची पार्श्वभूमी

भारतीय चित्रपट “धुरंधर (Dhurandhar)” च्या ट्रेलरनंतर पाकिस्तानमध्ये मोठा वाद निर्माण झाला.
या वादाच्या केंद्रस्थानी आहे —
बेनझीर भुट्टो यांची प्रतिमा आणि PPP चा “कथित” संदर्भ.

PPP आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे की
चित्रपटात बेनझीर भुट्टो यांचे फोटो, PPP ची चिन्हे आणि राजकीय दृश्ये
बिना परवानगी आणि नकारात्मक संदर्भात वापरली गेली आहेत. याच कारणामुळे PPP धुरंधर पाकिस्तानात Ban करावा अशी मागणी करत आहे.


PPP चे प्रमुख आक्षेप कोणते?

1) बेनझीर भुट्टो यांची प्रतिमा अनधिकृत वापर

PPP च्या मते, बेनझीर भुट्टो या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नेत्या असून,
त्यांची प्रतिमा वापरण्यासाठी कायदेशीर परवानगी आवश्यक होती.
चित्रपटात परवानगी शिवाय थेट दृश्ये दाखवली गेली,
जे पक्षाच्या मते मानहानीकारक आहे.

2) PPP ला आतंकवादाशी जोडल्याचा आरोप

PPP चा गंभीर आक्षेप असा आहे की
चित्रपटातील काही दृश्यांत PPP किंवा पाकिस्तानातील राजकीय वातावरण
आतंकवादी गटांना सहानुभूती देणारे असल्याचा अप्रत्यक्ष संकेत मिळतो.

PPP स्पष्टपणे सांगते की —
बेनझीर भुट्टो स्वतः आतंकवादाच्या शिकार ठरल्या,
त्यामुळे पार्टीला अशा संदर्भात दाखवणे
इतिहासाची मोडतोड आहे.

3) ल्यारी (Lyari) भागाचे नकारात्मक चित्रण

चित्रपटात कराचीतील ल्यारी भागाला
गुन्हेगारी व अराजकतेचे केंद्र म्हणून दाखवले असल्याचा आरोप आहे.
PPP च्या मते, ल्यारी हा पक्षाचा पारंपरिक बालेकिल्ला असून
तेथील सामाजिक-सांस्कृतिक वास्तव वेगळे आहे.


धुरंधर च्या निर्मात्यां विरोधात पाकिस्तानात FIR ची मागणी 

या प्रकरणी PPP कार्यकर्त्यांनी
कराची न्यायालयात अर्ज दाखल केला असून
चित्रपट निर्मात्यांविरोधात FIR नोंदवण्याची मागणी केली आहे.

सिंध प्रांतातील काही मंत्र्यांनी
“धुरंधर” हा चित्रपट
भारत-पाकिस्तान राजकीय प्रचाराचा भाग असल्याचा आरोप केला आहे.


चित्रपट, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि राजकारण

या वादामुळे एक मूलभूत प्रश्न पुन्हा समोर येतो —
चित्रपटातील कलात्मक स्वातंत्र्याची( Creative liberty ची)काही मर्यादा असते का ?

धुरंधर चित्रपटाचे निर्माते हा चित्रपट काल्पनिक राजकीय थ्रिलर असल्याचे सांगतात,
तर PPP च्या दृष्टीने
बेनझीर भुट्टो आणि PPP हे काल्पनिक विषय नाहीत,
तर जिवंत इतिहास आहे.


धुरंधर आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य

Benazir Bhutto Dhurandhar controversy

धुरंधर चित्रपटाचे making दर्जेदार व कलात्मक झाले आहे. या चित्रपटात उत्कृष्ट असे व्यावसायिक मूल्य जोपासले गेले आहे. धुरंदर जर यशस्वी झाला नसता तर हा वाद पुढे आला असता का? चित्रपट कथेच्या व पात्रांच्या अनुषंगाने अप्रत्यक्ष पणे घेतलेली एखादी राजकीय भूमिका चित्रपटाला बंदीस पात्र ठरवते का?
हा केवळ एका चित्रपटाचा वाद नाही तर कलात्मक अभिव्यक्ती च्या स्वातंत्र्याचा ही मुद्दा आहे. धुरंधर वर पाकिस्तानात Ban च्या मागणीचे फलित काय होईल हे येणारा काळच सांगेल.

हे ही वाचा : Big Alert – आधार पॅन लिंक स्टेटस चेक करा – Penalty टाळा | गिरीजा ओक ची Viral निळी साडी| Dr Babasaheb Ambedkar आणि दिलीप कुमार यांची तनावपूर्ण भेट

About The Author

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment