मौसमक्रिकेटऑपरेशन सिंदूरक्रिकेटस्पोर्ट्सबॉलीवुडजॉब - एजुकेशनबिजनेसलाइफस्टाइलदेशविदेशराशिफललाइफ - साइंसआध्यात्मिकअन्य

Avinash Ghodke

Screenwriter and Lyricist with 20 years of experience in Bollywood and Marathi cinema.His creative writing examines the contradictions of lived experience, while his journalism uncovers humanism beneath headlines.

फक्त 20 दिवसात थायलंड मधे उभा केला Dhurandhar चा Lyari Town Set – बॅंकॉक मधे पाकिस्तानी धमाका करणारा कलादिग्दर्शक

Dhurandhar चा Lyari Town set- थायलंड मधला पाकिस्तानचा Set

चित्रपटाच्या पडद्यावर दिसणारा वास्तववाद केवळ अभिनय किंवा कॅमेऱ्यामुळे निर्माण होत नाही; त्यामागे असते कला दिग्दर्शनाची सूक्ष्म, कष्टसाध्य प्रक्रिया.  Dhurandhar चा Lyari Town Set हे त्याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. सध्या गाजत असलेल्या धुरंधर या चित्रपटात पाकिस्तानच्या कराची शहरातील कुख्यात ल्यारी टाऊनचा संपूर्ण हुबेहूब set थायलंडमध्ये उभारण्यात आला आहे—आणि यामागे आहे कला दिग्दर्शक Sainy S Joharay यांची सूक्ष्मता टिपणारी कलादृष्टी आणि श्रम.

कला दिग्दर्शक Sainy S Joharay : संक्षिप्त परिचय

Sanjay S Joharay यांनी अमिताभ बच्चन यांचा रण , शाहिद कपूर यांचा कमीने व बहूचर्चित वेबसीरीज Family Man (मनोज वाजपेयी अभीनित) यांचे यापूर्वी कला दिग्दर्शन केले आहे. पुण्याच्या FTII या प्रतिष्ठित सिने प्रशिक्षण संस्थेचे ते स्नातक आहेत.

Lyari Town set उभारणारे Sainy S Joharay हे भारतीय चित्रपटसृष्टीतील अनुभवी कला दिग्दर्शक (Art Director) म्हणून ओळखले जातात.
त्यांच्या कला दिग्दर्शनाचे खास वैशिष्ट्य म्हणजे—

* लोकेशन्स ची वास्तववादी पुनर्निर्मिती
* सामाजिक-राजकीय विषयांची पार्श्वभूमी असलेल्या कथांना प्रभावीपणे उभे करण्यासाठी वास्तववादी सेट डिझाईन
* सूक्ष्म बारकावे दाखवणारे कलात्मक Set designing

अधोविश्वाचे काळोखे जग प्रकाशात आणन्याची हातोटी

संजय जोहरे यांनी यापूर्वी अनेक हिंदी चित्रपट आणि वेब-सीरिजमध्ये आर्ट डिपार्टमेंट / सेट डिझाइन संदर्भात महत्त्वाची जबाबदारी सांभाळत आले आहेत.  शहरी झोपडपट्टी, कामगार वस्ती, underworld (अधोविश्व)परिसर अशा अवघड भौगोलिक-सांस्कृतिक जागांचे चित्रण हे त्यांचे बलस्थान मानले जाते. या विश्वाची गूढता ,आक्रोश व वेदना हे सर्व ते आपल्या कलादिग्दर्शनातून प्रभावीपणे मांडतात.

Dhurandhar चा Lyari Town Set : एक आव्हान

Dhurandhar चित्रपटाची कथा 1999 ते 2009 काळात पाकिस्तान च्या सिंध प्रांतातील Lyari Town या कामगार वस्तीत घडते. हा भाग पाकिस्तान च्या crime world चा विस्फोटक केंद्रबिंदू झाला होता. या सर्व संदर्भासहित 1999 ते 2009 चा काळ  सेट मधून पुन्हा उभा करण्याचे आव्हान कला दिग्दर्शक Sainy S Joharay यांच्या पुढे होते.  Hollywood Reporter च्या जस्टिन राव यांना दिलेल्या मुलाखतीत Sainy S Joharay यांनी सांगितले की Lyari Town चे त्या काळातील visual references उपलब्ध नव्हते. अशा परिस्थितीत जुने News paper Cutting व Youtube Archive मधील चित्रफितींचा आधार घेत त्यांनी Lyari Town चे स्केच डिझाईन केले.
पाकिस्तानच्या कराची चे ल्यारी टाऊन म्हणजे—

* अरुंद गल्ल्या
* एकमेकांवर दाटीवाटीने चढलेली घरे
* रंग उडालेल्या ,झिजलेल्या भिंती
* उघड्या विजेच्या तारा व केबल  वायर, साईनबोर्ड, गंजलेले जिने
* सामाजिक अस्थिरतेची सतत जाणवणारी गडद छाया

हे सर्व Geographical आणि social charachteristics धुरंधर च्या सेट मधून स्पष्ट पणे दिसणे महत्वाचे होते. यासाठी बार कमी प्रमाणात visual references उपलब्ध होते. या references चा अभ्यास करून कला दिग्दर्शक Sainy S Joharay यांनी Larry Town चे set model परिश्रमपूर्वक निश्चित केले.


Lyari Town चा हा परिसर केवळ भौगोलिक नाही, तर मानसिक आणि राजकीय वातावरण  घेऊन येतो. ल्यारी टाऊन चा सेट पडद्यावर खरा वाटण्यासाठी केवळ जशाच्या तशा वास्तू उभ्या करणे गरजेचे नव्हते, तर त्या जागेचा गुदमरलेला श्वास पकडणे ही आवश्यक होते. हे सर्व करताना वेळेची व बजेटची एक मर्यादा ही कलादिग्दर्शक Sainy S Joharay यांना पाळायची होती. ही सर्व आव्हाने त्यांनी योग्य रित्या पेलली.Dhurandhar चा Lyari Town Set  प्रत्यक्ष उभा करण्याचे काम 20 दिवसात पूर्ण करण्यात आले.  या आधीच्या अंदाजे अडीच महिन्यांच्या काळात production designing team चे Research-Designing व planning सुरू होते. Dhurandhar चा Lyari Town Set उभा केला.

Model making for Cinema set

थायलंडमध्येच सेट का?

पाकिस्तानमध्ये प्रत्यक्ष चित्रीकरण शक्य नव्हते. सुरूवातीला मुंबई मधे Lyari Town चा सेट लावावा असे निर्मात्यांनी ठरवले होते पण stars च्या मिळालेल्या तारखा जुलै महिन्याच्या म्हणजे पावसाळ्याच्या होत्या.मुंबईचा पाऊस सेट च्या दृष्टिने हानीकारक होता. अखेर चर्चेअंती धुरंधर चित्रपटातील हा सेट थायलंड मधे बॅंकॉक पासून‌ काही किलोमीटर अंतरावर उभारण्याचे निश्चित झाले.

* उत्पादन खर्चावर नियंत्रण :सेट थायलंड मधे उभारल्यामुळे उत्पादन खर्चावर बरीच कपात होत होती कारण थायलंड मधे सेट चे कामगार तुलनात्मक दृष्ट्या कमी खर्चात उपलब्ध होत होते.
* अनुभवी स्थानिक क्रूची उपलब्धता: थायलंड मधे अनेक विदेशी चित्रपटांचे शूटिंग सातत्याने होत असल्या मुळे इथल्या कामगारांना सेट उभारणीचा विशेष अनुभव आहे. हा अनुभव सेट चे काम वेळेत पूर्ण करण्यास कामी आला. बॅंकॉक च्या एकूण 400 स्थानिक कारागिरांनी या सेट उभारणीत सहकार्य केले.
* मोठ्या आउटडोअर सेटसाठी मोकळी आणि योग्य जागा: Dhurandhar चा Lyari Town Set उभारण्यासाठी 6 एकर चा मोकळा प्लॉट आवश्यक होता जो बॅंकॉक मधे सहज उपलब्ध झाला.
* सुरक्षितता व परवाने (permissions)
बॅंकॉक मधे शूटिंग संदर्भात घ्यावयाच्या परवानग्या वाजवी शुल्कात सहज व सोप्या पद्धतीने मिळू शकतात .

या वरील कारणांमुळेच थायलंडची निवड निश्चित करण्यात आली व Dhurandhar चा Lyari Town Set कलादिग्दर्शक Sainy S Joharay यांनी इथे हुबेहूब उभारला. हा सेट इतका वास्तव वादी व प्रभावी आहे की धुरंधर चित्रपट पाहताना Lyari Town चा हा Set केवळ एक नेपथ्य न राहता तो चित्रपटाचे एक महत्वाचे पात्र बनतो व चित्रपटाचा परिणाम आणखीनच गडद करतो .

सोबत च्या The Factboii Insta Account च्या Instagram Reel LINK मधे आपण या सेट ची एक झलक पाहू शकता

पडद्यामागील धुरंधर कलाकार

धुरंधर च्या दिग्दर्शकांचे व कलाकारांचे व संगीताचे सर्वत्र कौतुक होत आहे. अशा परिस्थितीत पडद्यामागे महत्वाची भूमिका पार पाडणाऱ्या कलादिग्दर्शक Sainy S Joharay यांचे कलात्मक योगदान समजून घेणे ही महत्वाचे आहे. यापुढे धुरंधर चे दृश्य वा एखादी क्लिप पाहताना हे नक्कीच लक्षात असू द्या की या दृश्याच्या मागे कलादिग्दर्शक सैनी एस जोहरे यांचा ही हात आहे व ते पडद्या मागचे धुरंधर कलाकार आहेत.

FAQ

Sainy S Joharay यांनी यापूर्वी कोणत्या चित्रपटांचे कला दिग्दर्शन केले आहे?

उत्तर – Sainy S Joharay यांचे हे काही महत्त्वाचे चित्रपट आहेत: Family Man (2021-Web Series), Kaminey (2009),Night Manager (2023)

Dhurandhar चित्रपटाचे बजेट किती आहे?

उत्तर – Dhurandhar चित्रपटाचे बजेट 250 ते 280 करोड असण्याचा अंदाज वर्तवला जातो . पण हा official आकडा नाही हे लक्षात घ्यावे

हे ही वाचा :

Dhurandhar चित्रपटावर पाकिस्तानात Ban? Dhurandhar Controversy || FA9LA गाण्याचे टायटल कोड सारखे का? यातील 9 चा अर्थ काय ? || आधार पॅन लिंक स्टेटस Online check करा || Dr Babasaheb Ambedkar : मामूट्टी आधी आंबेडकरांची भूमिका Robert de Niro करणार होते

About The Author

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment