Dhurandhar चित्रपटाचा हिरो रणवीर सिंग आहे. पण….. असे असून ही त्याची भूमिका प्रेक्षकांवर प्रभाव टाकू शकली नाही. याउलट अक्षय खन्ना ने आभिनीत केलेला रेहमान डकैत या खलनायकाने प्रेक्षकांमधे एक craze निर्माण केली. रणवीर सिंग ची धुरंधर ची गुप्तहेराची भूमिका नेमकी कुठे कमी पडली ?अभिनय उत्तम असूनही ‘धुरंधर’ मधील रणवीर सिंगचा गुप्तहेर प्रेक्षकांशी का जोडला जात नाही?Dhurandhar Ranveer Singh look design विषयीची ही चिकित्सा माझ्या अनेक वर्षांच्या पटकथा लेखनाच्या अनुभवावर आधारलेली आहे. (IMDB Profile)
रणवीर च्या ‘हमजा’ पात्राचा look हेर पात्राशी मेळ खात नाही
Dhurandhar चित्रपटातील हमजा ही पाकिस्तानातील भारतीय गुप्तहेराची भूमिका रणवीर ने अतीशय मेहनतीने व प्रभावी पणे साकारली आहे. रणवीर सिंग ने स्वतः एका मुलाखतीत ” मी हमजा च्या भूमिकेसाठी खूप मेहनत घेतली आहे” असे विधान केले आहे. रणवीर सिंग ने निःसंशय पणे अभिनय उत्तम केला आहे पण… Dhurandhar Ranveer singh look design व Aura हा Bollywood Hero सारखा जास्त व ‘आंतरराष्ट्रीय हेरा’ सारखा फार कमी वाटतो. रणवीर सिंग चा look असा ठेवण्यामागे व्यावसायिक निर्णय ही असू शकतो पण एकूणच Dhurandhar चित्रपटाच्या Realistic treatment शी हा निर्णय मेळ खात नाही.
रणवीर चा ‘हमजा चा look’ हेरगिरीचा मूलभूत नियम मोडणारा

हेरगिरी मधला एक मूलभूत नियम असा असतो की हेर हा लक्षवेधी व्यक्तीमत्वाचा नसावा. हेराने सर्वसामान्य लोकांमधे बेमालूम पणे मिसळून आपले मिशन पूर्ण करायचे असते. हेर हा जर उठून दिसला तर तो पकडला जाण्याची शक्यता असते. धुरंधर मधील सुरूवातीच्या एका दृश्यात हमजा हे हेराचे पात्र ल्यारी भागात प्रथम येते असे चित्रित झाले आहे. त्या पहिल्या रात्रीच रस्त्यावर उभा हमजा ल्यारी च्या गुंडांच्या लक्षात येतो. ” हा कोण नवीन माणूस ?” असा प्रश्न त्यांना पडतो. हा प्रसंग screenplay साठी घेतलेली liberty असली तरी Ranveer Singh च्या हेराच्या पात्राचा एक मोठा flaw मांडून जातो. चित्रपटाच्या Hero ने लक्षात येणे गरजेचे असते पण आंतरराष्ट्रीय हेर जर लक्षात आला तर तो हीरो ठरत नाही या वास्तवाची कुठेतरी प्रेक्षकांच्या अंतर्मनात नोंद घेतली जाते.
Dhurandhar Ranveer singh look design मधील त्रुटी
1) हमजा ची कमावलेली शरीर यष्टी (Jim Body )
एक आंतरराष्ट्रीय हेर कधीच शरीर कमावून किंवा ‘डोले शोले’ बनवून मिशनवर निघत नाही. हेराचे काम शारीरिक व मानसिक पातळीवर जास्त असते. ही मानसिकता रणवीर सिंग च्या चेहर्यावर अचूक व प्रभावी पणे दिसणे पण त्याचे पेहलवानी ढंगाचे व्यक्तीमत्व हेराचे वाटत नाही. धुरंधर हा crusador वाटतो.
2) पेहलवानी ढंगाचे body language
छाती फुलवून दंड उचलून चालणे ही heroic body language खूप Obvious आणि cliche वाटते. म्हणूनच हा obvious हीरो Akshay Khanna रेहमान डकैत realistic dynamic energy पुढे फिक्का व कृत्रिम वाटू लागतो.
3) Super model सारखे लांब सिल्की केस
Charachter Sillhoutes प्रेक्षकांच्या नेहमीच लक्षात रहातात. पुरुष पात्राचे लांब केस एक Aura निर्माण करतात. या गिमिकचा वापर अनेकवेळा चित्रपटांमधून प्रभावीपणे झाला आहे. संजय दत्त च्या खलनायक चित्रपटातील लूक याचं उत्कृष्ट उदाहरण आहे. धुरंधर मधील हमजा चे लांब सिल्की केस मात्र हेराच्या पात्राला logically शोभत नाहीत. हीरोला प्रेक्षकांच्या लक्षात आणून द्यायच्या प्रयासात कथेतल्या हेर पात्राला ठळक करण्याची चूक रणवीर सिंग च्या look design मधे झाली आहे.
या वरील तीन घटकांमुळे रणवीर ने Dhurandhar मधे रंगवलेल्या हमजा या भारतीय गुप्तहेर पात्राचा प्रेक्षकांवरील प्रभाव कमी झाला आहे.
Under Cover agent चे Over the cover दिसणे
. Dhurandhar हा चित्रपटाचा Title Role व हीरो असूनही तो म्हणावा तसा कथानकात आपले स्थान प्रभावी पणे निर्माण करू शकत नाही.
धुरंधर चित्रपटाची एकूण दृष्यात्मकता ही वास्तववादी स्वरूपाची आहे. रणवीर सिंह चे पात्र जर सर्वसामान्य शरीर यष्टीचे (lean body ) , common man ची शरीर भाषा , छोटे केस अशा घटकांसह Dhurandhar Ranveer Singh look design केले गेले असते तर त्याचे हमजा पात्र जास्त खरे वाटले असते व प्रेक्षक त्याच्याशी relate करू शकले असते.
वास्तविक पहाता .. कुठलाही under cover agent आपण लोकांच्या लक्षात येवु अशा पद्धतीचे वागणे व दिसणे टाळतो हा हेरगिरी चा बेसिक नियम आहे. हा नियम धुरंधर पात्राने तोडल्या सारखा दिसतो. आपले केस , शरीरयष्टी व शरीर भाषेतून तो लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधतोय असे वाटत रहाते.
Hollywood ची उदाहरणे
बॉलिवूडमध्ये स्टार-कास्टिंग, look design आणि realism यांचा संघर्ष नवीन नाही.
Dhurandhar Ranveer Singh look design मूळ पात्राशी misalign झाला तशी parallel उदाहरणे Hollywood मधे ही आहेत.

Hero look की Character look या दुविधे मुळे फसलेल्या भूमिकांची hollywood मधे ही अनेक उदाहरणे आहेत. एक ठळक उदाहरण… म्हणजे Brad Pitt या अभिनेत्याची TROY (2004) चित्रपटातील Achilles ची भूमिका.
Brad Pitt as Achilles हा हॉलीवूडमधील एक प्रसिद्ध casting & look misalignment चा केस मानला जातो.
Brad Pitt ने या भूमिकेसाठी अत्यंत मेहनत घेतली होती. त्याचा अभिनय प्रामाणिक होता, युद्ध दृश्यांमधील intensity प्रभावी होती आणि physical training मध्ये कसलीही तडजोड नव्हती. तरीही अनेक समीक्षकांना Achilles हे पात्र पूर्णपणे believable वाटले नाही.
याचे मुख्य कारण अभिनय नव्हता, तर look design होते. Brad Pitt चे supermodel सारखे दिसणे , perfectly sculpted शरीरयष्टी आणि stylized केस यामुळे Achilles हा brutal, primal योद्धा कमी आणि iconic Hollywood स्टार अधिक वाटत होता.
समीक्षकांकडून असं म्हटलं गेलं की :
> “Brad Pitt is too beautiful to feel dangerous.”
हे उदाहरण स्पष्ट दाखवते की अभिनय कितीही चांगला असला तरी, जर look design पात्राच्या मूळ स्वभावाशी जुळला नाही, तर पात्र प्रभावहीन होते.
थोडक्यात
धुरंधर मध्ये रणवीर सिंगचा look हा स्टार-centric वाटतो, तर त्याच चित्रपटातील अक्षय खन्नाचा लुक पूर्णपणे character-centric भासतो. रणवीर सिंगची कमावलेली Jim body, पेहलवानी ढंगाची body language आणि supermodel सारखे लांब, लक्ष वेधून घेणारे केस यामुळे त्याचे पात्र पटकन ओळखू येते, पण ते under cover agent म्हणून ‘invisible’ राहू शकत नाही. उलटपक्षी, अक्षय खन्नाचा साधा, unglamorous आणि संयमित लुक — सामान्य शरीरयष्टी, restrained हालचाली, understated styling — हा पात्राला अधिक वास्तववादी आणि विश्वासार्ह बनवतो. अक्षय खन्ना अभिनय करताना स्वतःला पुढे न आणता पात्राला पुढे येऊ देतो, त्यामुळे तो कथानकात आपले स्थान मजबूतीने उभे करतो; तर रणवीर सिंगचा लुक आणि शरीरभाषा पात्राशी unrelated ठरते. परिणामी, अभिनय दोघांचाही प्रभावी असूनही, realism आणि relatability च्या बाबतीत अक्षय खन्नाचे पात्र अधिक convincing वाटते.
रणवीर सिंग ची Dhurandhar मधील casting ही perfect होती पण Dhrandhar Ranveer singh look design चुकले आहे व त्यामुळेच हीरो असूनही तो sideline झाल्यासारखा वाटतो.
हे ही वाचा : Dhurandhar Sanjay Dutt Entry प्रभाव हीन व थंड का वाटते? VFX तंत्राची दुसरी बाजू..|| फक्त 20 दिवसात थायलंड मधे उभा केला Dhurandhar चा Lyari Town Set – बॅंकॉक मधे पाकिस्तानी धमाका करणारा कलादिग्दर्शक || Akshay Khanna-धुरंधर ची stylish entry आणि Zurna चे स्वर-Zurna या अरबी वाद्याचा इतिहास जाणून घ्या







