Avinash Ghodke

Screenwriter and Lyricist with 20 years of experience in Bollywood and Marathi cinema.His creative writing examines the contradictions of lived experience, while his journalism uncovers humanism beneath headlines.

Gaza Summit मधे ट्रंप म्हणाले इटली च्या पंतप्रधान Giorgia Meloni या Beautiful Woman आहेत

गाझा समिट मधे ट्रंप यांची जॉर्जिया मेलनी यांच्या सौंदर्याची स्तुती-

नुकतेच इजिप्त मध्ये डोनाल्ड ट्रंप यांच्या पुढाकारेने गाझा समिट ( Gaza Summit) आयोजित केली गेली. इजराइल व हमास मध्ये युद्ध बंदी करण्याबाबत इथे अनेक राष्ट्र प्रमुखांच्या उपस्थितीत निर्णय घेण्यात आला. यावेळी सर्व राष्ट्रप्रमुख मंचावर उपस्थित असताना पाकिस्तानचे पंतप्रधान शाहाबाज शरीफ यांनी “डोनाल्ड ट्रम्प यांना ‘शांततेचे नोबल पारितोषिक‘ मिळावे यासाठी मी पूर्ण पाठिंबा देत आहे” असे विधान केले. शाहबाज शरीफ यांनी हे विधान करताच मागे उभ्या इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलनी Giorgia Meloni यांनी आपला हात आश्चर्याने तोंडावर ठेवत डोळे विस्फारले.मेलनी यांची ही उत्स्फूर्त मुद्रा उपस्थित मीडियाने कॅमेर्या मधे टिपली. ही भावमुद्रा सध्या इंटरनेटवर ट्रेंड होताना दिसते आहे.

काय म्हणाले ट्रंप..

Gaza Summit च्या आपल्या भाषणात डोनाल्ड ट्रम्प यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलनी यांच्या सौंदर्या ची स्तुती केली. ट्रंप यांनी Giorgia Meloni यांचा उल्लेख ” Beautiful young woman” असा केला.

ट्रंप म्हणाले ..”अमेरिकेत जर राजकीय व्यक्तीने अशा पद्धतीने एखाद्या स्त्रीच्या सौंदर्याची स्तुती केली तर त्याची राजकीय कारकीर्द संपुष्टात येते. असे असले तरीही मी हा ‘chance’ घेतो. कारण जॉर्जिया खरच सुंदर आहेत!“….. असे बोलून डोनाल्ड ट्रम्प यांनी मागे वळून पहात जॉर्जिया यांना विचारले “मी तुम्हाला सुंदर म्हटले आहे यावर तुमचा आक्षेप नाही ना?”

डोनाल्ड ट्रम्प हे आपल्या बेधडक स्वभावाबद्दल प्रसिद्ध आहेत. आंतरराष्ट्रीय राजकारणातील त्यांची हटवादी धोरणे सर्व परिचित आहेत. अशातच शांततेचा नोबल पुरस्कार (Noble peace prize)मिळण्यासाठी मीच योग्य उमेदवार आहे असे त्यांनी स्वयंघोषित केले आहे.

इंटरनेटवर Giorgia Meloni वर मीम्स

डोनाल्ड ट्रम्प यांच्या सौंदर्य स्तुतीला संयत अशी प्रतिक्रिया देत जॉर्जिया मेलनी यांनी आपली मूत्सुद्देगिरी दाखवली पण डोनाल्ड ट्रम्प यांचे लांगुल चालन करत पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी त्यांच्या Noble peace prize संदर्भात जाहीर पाठिंबा देत असल्याचे वक्तव्य ऐकून जॉर्जिया मेलनी यांनी जी भाव मुद्रा दाखवली त्यावर इंटरनेटवर विविध मीम्स फिरू लागले आहेत.

नरेंद्रमोदी गैरहजर

इजिप्तच्या या गाझा समिट ला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहिले नाहीत. असे असले तरी भारताने आपले प्रतिनिधी म्हणून श्री कीर्तीवर्धन सिंग, minister of state external affairs यांना समिट ला पाठवले होते.पॅलेस्टाईन बरोबर चे जुने संबंध व इसराइल बरोबरचे व्यापारी संबंध या दोन्ही पातळीवर भारत आपले हित जोपासण्यासाठी प्रयत्नरत आहे. पॅलेस्टाईन व हमास वादामध्ये कुठल्याही पक्षाची स्पष्टपणे बाजू घेण्याचे भारत टाळत आहे. डोनाल्ड ट्रम्प प्रणित गाजा समिट (Gazal Summit) किती यशस्वी होते हे येणारा काळच सांगेल. मात्र ट्रम्प यांचा डिप्लोमॅटिक सौंदर्यवाद या समितीमध्ये गहिरे रंग भरून गेला हे नाकारता येत नाही.

About The Author

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment