घरच्या घरी गव्हाच्या पिठाची हेल्दी ब्रेड बनवणे हा आरोग्यदायी आणि चवदार पर्याय आहे.तुमच्याकडे Oven नसेल तरी तुम्ही सहज पुणे हा whole wheat Bread बनवू शकता. हल्ली बाजारातील ब्रेडमध्ये मैदा, प्रिझर्व्हेटिव्ह्ज आणि साखरेचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे घरच्या घरी बनवलेली ही ब्रेड अधिक फायदेशीर आणि सुरक्षित ठरते. यात फायबर, प्रोटीन आणि नैसर्गिक चव टिकून राहते.
घरच्या घरी गव्हाच्या पिठाची हेल्दी whole wheat Bread बनवण्यासाठी आवश्यक साहित्य
- गव्हाचे पीठ – 2 कप
- दूध – अर्धा कप (गरम)
- कोमट पाणी – अर्धा कप
- ड्राय यीस्ट – 1 चमचा
- साखर – 1 टेबलस्पून
- मीठ – चवीनुसार
- ऑलिव्ह ऑइल किंवा लोणी – 2 टेबलस्पून
घरच्या घरी गव्हाच्या पिठाची हेल्दी whole wheat Bread बनवण्याची कृती
- एका भांड्यात कोमट पाणी, साखर आणि यीस्ट मिसळा. 10 मिनिटे झाकून ठेवा, जेणेकरून यीस्ट फुलून येईल.
- यानंतर गव्हाचे पीठ, मीठ आणि तेल घालून मिश्रण मळा. आवश्यक असल्यास थोडेसे पाणी घाला.
- सुमारे 8 ते 10 मिनिटे पीठ छान मळून घ्या, जेणेकरून ते मऊ आणि लवचिक होईल.
- हे पीठ तेल लावलेल्या भांड्यात ठेवा, झाकण ठेवा आणि 1 तास गरम ठिकाणी फुलू द्या.
- पीठ दुप्पट फुलल्यावर हलकेच मळून ब्रेडच्या आकारात साच्यात ठेवा.
- पुन्हा 20-25 मिनिटे झाकून ठेवा.
- एका मोठ्या भांड्याला तापवून घ्या (preheat) त्यात खाली तळाला मीठ पसरवून घ्या (हे मीठ याच कृतीसाठी पुन्हा वापरता येते) छोटे स्टॅंड ठेवून त्यावर मळलेले पीठ असलेले साच्याचे भांडे ठेवा. मोठ्या भांड्यावर झाकण ठेवून वर वजन ठेवून त्याला घट्ट करा जेणेकरून वाफ बाहेर जाणार नाही. 20-25 मिनिट मध्यम आचेवर गॅस ठेवा . ब्रेड बेक झाल्यावर एक विशिष्ट गोडसर सुगंध सोडतो.अंदाजासाठी ही बाब ही लक्षात ठेवा.अशाप्रकारे ओव्हन शिवाय तुमचा गव्हाचा हेल्दी ब्रेड तयार होईल.
टीप :जर तुमच्याकडे ओव्हन असेल तर तो 180°C तापमानावर गरम करून 25-30 मिनिटे ब्रेड भाजा. . - ब्रेड बाहेर काढून पूर्ण थंड झाल्यावर सुरीने स्लाइस करा आणि तुम्ही स्वतः बनवलेल्या healthy whole wheat bread चा आनंद घ्या!
ब्रेड मऊ आणि चवदार ठेवण्यासाठी टिप्स
- ब्रेड अधिक मऊ हवी असल्यास थोडेसे दूध जास्त वापरा.
- हवे असल्यास तिळ, ओट्स किंवा सुकामेवा वरून पसरवा.
घरच्या घरी गव्हाच्या पिठाची (whole wheat bread) हेल्दी ब्रेडचे फायदे
- गव्हाच्या पिठात फायबर जास्त असल्याने पचन सुधारते.
- भूक जास्त वेळ नियंत्रित राहते आणि ऊर्जा मिळते.
- घरी बनवलेली ब्रेड पूर्णपणे प्रिझर्व्हेटिव्ह-फ्री असते.
- बाजारातील मैद्याच्या ब्रेडच्या तुलनेत ही ब्रेड अधिक पौष्टिक असते.
कुटुंबाचे आरोग्य सुनिश्चित
घरच्या घरी गव्हाच्या पिठाची हेल्दी ब्रेड ही रेसिपी तुमच्या कुटुंबाला आरोग्याकडे नेणारी छोटी पण महत्त्वाची पायरी आहे. एकदा ही ब्रेड oven शिवाय बनवून बघा — तुमच्या कुटुंबाला ही whole wheat Bread नक्कीच आवडेल







