Decoding Fa9la song title : सध्या Akshay Khanna च्या धुरंधर चित्रपटातील Fa9la हे Arabic गाणे अतिशय फेमस झाले आहे. या चित्रपटाने आतापर्यंत रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे आणि Fa9la गाण्याच्या popularity मुळे ती दिवसागणिक वाढत आहे. हे गाणं Fa9la सध्या लोकं loop वर पहात व ऐकत आहेत . यातील अक्षय खन्ना यांच्या slow move डान्स स्टेप्स इतक्या लोकप्रिय झाल्यात की प्रत्येक जण या गाण्यावरती Reels बनवत आहे. अगदी celebrities सुद्धा यात मागे नाहीत.
गाण्याचे शीर्षक Code सारखे का आहे ?
या गाण्याचे शीर्षक Fa9la हे वाचताना एखाद्या Code प्रमाणे वाटते . ते असे का लिहिले आहे ? हा प्रश्न अनेकांना पडला असेल. याच प्रश्नाचे उत्तर आपण शोधणार आहोत .Decoding Fa9la song title
खरं म्हणजे Fa9la या टायटल मधील 9 हा आकडा अरबी भाषेतील “स” या उच्चारासाठी वापरला आहे. असे का केले आहे हे समजून घेणे अतिशय रंजक आहे .
अरबी तरुणांची Internet slang अरबीझी( Arabizi)
बहरीनमधील प्रसिद्ध रॅपर Flipperachi आणि Daffy यांनी बनवलेलं हे गाणं आहे. गाण्यातल्या
शब्दातला 9 हा इंग्रजी अंक s हे अक्षर (“s”/“स्”) सूचित करण्यासाठी वापरला गेलं आहे, त्यामुळे ह्या शब्दाचे उच्चारण “Fasla” (फासला) असं होतं.यामागे भाषिक नियम नसून अरबी इंटरनेट स्लँग असलेली “Arabizi” नावाची एक लोकप्रिय पद्धत
आहे.अरबी तरुणांनी बोलचाल आणि चॅटिंगमध्ये इंग्रजी अक्षरे व काही अंक वापरून अरबी अक्षरांचे आवाज दाखवण्याची एक पद्धत विकसित केली.
यालाच Arabizi / Franco-Arabic म्हणतात.
Key board वरचा 9 – अरबी अक्षर saad
Arabizi मध्ये 9 हा अंक “Ṣ” (स कठीण / heavy S) या अरबी ध्वनीसाठी वापरला जातो.
अरबीमध्ये दोन प्रकारचे “स” आहेत:
س =साधारण “s” आवाज1
ص = जाड / भारी “ṣ” आवाज (thick S)
हा दुसरा आवाज इंग्रजी किबोर्डवर नसल्यामुळे तरुणांनी त्याच्या साठी 9 हा अंक वापरला. इंटरनेट आणि SMS चॅटसाठी बनवलेला हा एकप्रकारचा आधुनिक प्रचलित कोड आहे.

9 आणि ص (साद) च्या दिसण्या मधले साम्य
अरबी वर्णावलीत इतरही युनिक उच्चार आहेत. हे युनिक उच्चार कीबोर्ड वरती लिहिण्यासाठी इटालिक किंवा रोमन अल्फाबेट मध्ये योग्य पर्याय उपलब्ध नाहीत व त्यांच्या साठी ही टाईप करताना रोमन आकडे वापरतात . फासला शब्दातील स हा साधारण “स” असा उच्चार नसून तो सsss : असा आहे. या उच्चारासाठी अरबी वर्णावली मध्ये एक विशिष्ट वर्ण आहे ज्याला Saad (साद) म्हणतात. हा विशिष्ट वर्ण 28 अरबी वर्णांवलीमधील 14 वा वर्ण आहे. तो दिसायला थोडाफार इंग्रजी 9 आकड्यासारखा वाटतो. फरक फक्त एवढाच आहे की हा नऊ सारखा दिसणारा वर्ण थोडासा तिरकस लिहिला जातो.
याच साम्यामुळे अरबी उच्चारा तील विशिष्ट “स ssss:” लिहिण्यासाठी अरबी तरुणांनी जेव्हा इंग्रजी कीबोर्डचा वापर केला तेव्हा 9 या आकड्याचा वापर केला.
दिसायला इंग्रजी नऊ असला तरी हा अरबी भाषेतील सsss: उच्चार आहे.
आपण वाचतो ते ‘धुरंधर’ च्या गाण्याचे शीर्षक fa9la हे खरं म्हणजे “फासला” आहे.
“फास् ला” या शब्दाचा अरबी मधला अर्थ अचानक केलेली धडाकेबाज entry किंवा Power Moment असा सांगता येईल.
अक्षय खन्ना यांची Fa9la अर्थात फासला या गाण्यातील entry खरच धडाकेबाज आहे यात दुमत नाही.
एखाद्या इंग्रजी अंकाला शब्दाचे रूप देण्याची ही शक्कल अनोखी आहे जी अरबी तरुणांनी शोधली आहे.
गायक Flipprachi ने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मधे या शब्दाचा उच्चार ‘फासला’ असल्याच स्पष्ट केलं आहे.
यापुढे अक्षय खन्नाच्या गाण्याचा लिखित उल्लेख fa9la असा असला तरी आपण तो वाचताना “फासला” असंच वाचूयात.
हे ही वाचा: Fa9la गाण्यात वापरलेल्या Zurna या पारंपारिक अरबी वाद्याची ओळख







