Avinash Ghodke

Screenwriter and Lyricist with 20 years of experience in Bollywood and Marathi cinema.His creative writing examines the contradictions of lived experience, while his journalism uncovers humanism beneath headlines.

पहिली Mumbai Local Train -उद्घाटनाला नाना शंकरशेठ हजर होते पण गव्हर्नर फॉकलंड गायब होते..

आशिया खंडातील पहिली प्रवासी ट्रेन म्हणजे 16 एप्रिल 1853 ला धावलेली मुंबई-ठाणे ट्रेन . बोरीबंदर ते ठाणे प्रवासात या ट्रेनने भायखळा व सायन हे दोनच थांबे घेतले होते.


पहिली Mumbai Local Train History: 16 एप्रिल 1853 ला सुरू झालेली बोरीबंदर ठाणे ट्रेन 16 एप्रिल 2026 ला 173 वर्षांची होत आहे. 21 तोफांची सलामी घेवून आजच्या CST ते ठाणे असा पहिला प्रवास या ट्रेनने केला होता. मुंबई चे शिल्पकार नाना शंकरशेठ हे या ऐतिहासिक सोहळ्यास उपस्थित होते…पण मुंबई प्रांताचे गव्हर्नर फॉकलंड मात्र अनुपस्थित होते..

मेल ट्रेन म्हणून सुरू झालेली ही भारतातील पहिली ट्रेन व आशिया खंडातील पहिली प्रवासी ट्रेन होती. आज या मार्गावर जी मुंबई लोकल धावते ती मुंबई ची ओळख झालीय. ही ट्रेन मेल ट्रेन होती तरीही मुंबई-ठाणे या तिच्या Route मुळे तिलाच मुंबई ची‘पहिली लोकल ट्रेन’ मानले गेले आहे.  Iconic मुंबई लोकल ट्रेन चा पहिला प्रवास कसा होता हे या लेखातून जाणून घेऊया..


ऐतिहासिक पार्श्वभूमी: मुंबईत पहिली ट्रेन कशी धावली?

मुंबई लोकलचा ऐतिहासिक प्रवास 16 एप्रिल 1853 रोजी सुरू झाला. ब्रिटिशांनी बोरीबंदर (सध्याचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) ते ठाणे या ३४ किलोमीटरच्या मार्गावर ही पहिली ट्रेन चालवली. ही ट्रेन संपूर्ण आशिया खंडातील पहिली प्रवासी रेल्वे होती.

नाना शंकरशेठ यांचे योगदान

१. गुंतवणूक आणि भागभांडवल

(Shareholding)
नाना शंकरशेठ यांनी ‘ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे’ (GIPR) कंपनीचे मोठ्या संख्येने शेअर्स खरेदी केले होते. कोणत्याही कंपनीला सुरुवातीला उभं राहण्यासाठी जे भांडवल लागते, त्यात नानांची गुंतवणूक महत्त्वाची होती. ते या रेल्वे कंपनीच्या पहिल्या भारतीय संचालकांपैकी (Directors) एक होते.

२. जागा उपलब्ध करून देणे

मुंबईत रेल्वे मार्ग टाकण्यासाठी जमिनीची मोठी गरज होती. नाना शंकरशेठ यांच्या मालकीच्या अनेक जमिनी मुंबईत होत्या. त्यांनी या प्रकल्पासाठी आपल्या जमिनी उपलब्ध करून देण्यात मोठे सहकार्य केले, ज्यामुळे रेल्वेचे काम विनाअडथळा पूर्ण होऊ शकले.

३. लोकमत परिवर्तनासाठी विशेष प्रयत्न

त्याकाळी लोकांमध्ये रेल्वेबद्दल भीती आणि शंका होत्या (उदा. रेल्वे म्हणजे ‘काळा देव’ आहे किंवा ही इंग्रजांची काहीतरी जादुई चाल आहे). नाना शंकरशेठ यांनी पुढाकार घेऊन लोकांच्या मनातील ही भीती दूर केली आणि भारतीयांना रेल्वेकडे वळवण्यासाठी प्रयत्न केले.

४. पाठपुरावा आणि नियोजन

भारतात रेल्वे सुरू व्हावी यासाठी नानांनी १८४३ पासूनच ‘बॉम्बे असोसिएशन’ आणि इतर माध्यमांतून इंग्रज सरकारकडे पाठपुरावा केला होता. रेल्वेचे आर्थिक मॉडेल कसे असावे आणि त्यात भारतीयांचा सहभाग कसा असावा, यासाठी त्यांनी तांत्रिक सल्ले दिले होते.
थोडक्यात सांगायचे तर:
नानांनी केवळ पैसे दिले नाहीत, तर त्यांनी दूरदृष्टी, जमीन आणि विश्वास दिला. म्हणूनच त्यांना ‘भारतीय रेल्वेचे जनक’ किंवा ‘शिल्पकार’ म्हटले जाते. सर जमशेटजी जीजीभाई यांनीही त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात शेअर्स घेऊन या प्रकल्पाला आर्थिक बळ दिले होते.

गव्हर्नर लॉर्ड फॉकलंड का आले नव्हते

कडक शिस्तीचे लॉर्ड फॉकलंड (Lucius Cary 10th Viscount of Falkland) आपला लहरीपणा व राजेशाही  ऐट दाखवण्याबाबत प्रसिद्ध होते. लॉर्ड फॉकलंड मुंबई च्या पहिल्या लोकल ट्रेन च्या उद्घाटन सोहळ्यास अनुपस्थित राहिले यामागे त्यांचा अहंकारी स्वभाव असावा असा सर्वसामान्यांचा समज झाला होता.

उपलब्ध अधिकृत नोंदीं मधे मात्र फॉकलंड यांच्या गैरहजेरीमागे कोणताही मोठा ‘मान-अपमान’ किंवा राजकीय वाद नव्हता, व त्यामागे प्रामुख्याने आरोग्य आणि वैयक्तिक कारणे होती असे नमूद केलेले दिसून येते.
त्या संदर्भातील काही महत्त्वाचे पैलू खालीलप्रमाणे आहेत:

हवामानाचे कारण

एप्रिल महिना हा मुंबईत प्रचंड उकाड्याचा असतो. लॉर्ड फॉकलंड यांची प्रकृती त्या काळात फारशी चांगली नव्हती आणि त्यांना उष्णतेचा त्रास होत असे. त्यामुळे ते सोहळ्याच्या काही दिवस आधीच प्रकृती स्वास्थ्यासाठी थंड हवेच्या ठिकाणी म्हणजेच‌ सातारा पासून जवळ असलेल्या महाबळेश्वरला निघून गेले होते.

इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की १८५३ ला लॉर्ड फ़ॉकलैंड यांचे वय फक्त 50 वर्षे होते. लॉर्ड फ़ॉकलैंड व नाना शंकरशेट या दोघांचेही जन्मवर्ष एकच म्हणजे 1803 हेच असल्यामुळे एकाच वयाच्या या दोन विभूतींच्या पुढाकाराने मुंबई मधे भारतातील पहिली रेल्वे सुरू होत होती असे स्पष्ट होते. पण प्रकृती स्वास्थ्याचे कारण सांगून अशा महत्त्वाच्या कार्यक्रमास लॉर्ड फॉकलंड अनुपस्थित का रहिले हे मात्र अनाकलनीय आहे.

प्रशासकीय शिष्टाचार (Protocol) British Summer Head quarters


त्याकाळी मुंबईचे गव्हर्नर उन्हाळ्यात आपले मुख्यालय महाबळेश्वरला हलवत असत. रेल्वेचे उद्घाटन ही एक मोठी घटना असली तरी, त्यावेळच्या ब्रिटिश प्रशासकीय शिष्टाचारानुसार गव्हर्नरच्या अनुपस्थितीत मुख्य न्यायाधीश (Chief Justice) किंवा कौन्सिलचे सदस्य सोहळ्याचे नेतृत्व करू शकत होते. त्यामुळे लॉर्ड फॉकलंड यांनी या सोहळ्यासाठी आपला महाबळेश्वरचा दौरा रद्द केला नाही.

१८५२ चे छोटे लॉर्ड फॉकलंड इंजिन

विशेष नमूद करण्या सारखी गोष्ट म्हणजे,एक वर्ष आधी (१८५२ मध्ये) रेल्वेचे रूळ टाकण्याचे काम सुरू होते. त्यावेळी सामानाची ने-आण करण्यासाठी आणि चाचणी घेण्यासाठी (Trial run) इंग्लंडहून एक छोटे वाफेचे इंजिन मागवण्यात आले होते. त्या इंजिनाला मुंबईच्या याच गव्हर्नर साहेबांचे नाव सन्मानार्थ देण्यात आले होते.

उपहास आणि चर्चा

आपल्या शिस्त आणि गर्विष्ठपणा साठी प्रसिद्ध असलेले गव्हर्नर लॉर्ड फॉकलंड महत्वाच्या ऐतिहासिक प्रसंगी गैरहजर राहिल्यामुळे त्याकाळी मुंबईतील काही वृत्तपत्रांनी आणि लोकांमध्ये थोडी कुजबुज नक्कीच झाली होती. “एका ऐतिहासिक घटनेपेक्षा साहेबांना महाबळेश्वरची हवा जास्त प्रिय वाटली,” अशा आशयाची चर्चा तेव्हा रंगली.

२१ तोफांची सलामी

मुंबई च्या पहिल्या रेल्वे च्या या ऐतिहासिक प्रवासासाठी २१ तोफांची सलामी देण्यात आली होती आणि स्टेशनवर जमलेल्या हजारो मुंबईकरांनी यावेळी जयघोष केला होता. या पहिल्या ट्रेनला ‘साहिब’, ‘सिंध’ आणि ‘सुलतान’ अशी तीन वाफेवर चालणारी इंजिने जोडण्यात आली होती. एकूण १४ डब्यांमध्ये सुमारे ४०० प्रवाशांनी ही ऐतिहासिक यात्रा केली होती.

सरासरी वेग २७-३२ किमी/तास

ही ट्रेन दुपारी ३:३५ वाजता बोरीबंदरहून निघाली आणि ५७ मिनिटांनी ठाण्याला पोहोचली. वाटेत भायखला येथे पहिला थांबा  व सायन येथे १५ मिनेटे पाण्यासाठी दुसरा थांबा घेण्यात आला होता. या पहिल्या रेल्वे प्रवासाच्या यशामुळे पुढे भारतात संपर्क यंत्रणेचा पाया रचला गेला.

१८५७ चा पहिला उठाव – रेल्वे विकासाला गती

या घटने नंतर चारच वर्षांनी मंगल पांडे यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिशांविरुद्ध पहिला उघड व मोठा उठाव झाला. असे उठाव भविष्यात झाल्यास ब्रिटिश आर्मीला त्वरित भारतात कुठेही पोहोचता यावे या उद्देशाने ब्रिटिशांनी रेल्वे चे जाळे भारतभर विकसित करण्याचे काम हाती घेतले.


Mumbai Local Train History ची ही माहिती तुम्हाला कशी वाटली . ब्लॉग आवडला असेल तर लाइक आणि शेअर करायला विसरू नका. अशाच माहितीपूर्ण ब्लॉग्ससाठी आमच्या Knowledge Bites सदरातील इतर ब्लॉग ही वाचा.

हे ही वाचा:

▶️वाड्यात घेतलेल्या बोअरवेल ड्रिल ने Pune Metro Tunnel ला पडले छिद्र – ▶️Karjat Local आता पनवेल मार्गे ही धावणार: ▶️Metro 2B line Kurla Update

About The Author

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment