– मॅक्रॉन दांपत्याची व्हिएतनाम एंट्री एका क्षणामुळे मजेशीर झाली आहे. तो क्षण तुम्ही पाहिलात का?
(This post is Bilingual/Marathi-English)
२५ मे २०२५, व्हिएतनामच्या हनोई विमानतळावर एक घटना घडली… आणि ती कोणत्याही करार, भाषण किंवा घोषणे बद्दल नव्हती – तर ती फ्रेंच राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या पत्नीने त्यांच्या चेहऱ्याला धरून ढकलण्यावर!
On May 25, 2025, an incident took place at Hanoi Airport in Vietnam—not about treaties, speeches, or declarations, but about French President Emmanuel Macron’s wife seemingly pushing his face gently!
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि त्यांची सदैव प्रसन्न दिसणारी पत्नी ब्रिजिट मॅक्रॉन यांचा व्हिएतनाम दौरा राजकीय वर्तुळात आधीपासूनच चर्चेत होता — पण या चर्चेत अचानक राष्ट्राध्यक्षांचा चेहरा आणि पत्नीचा हात आला व आंतरराष्ट्रीय चर्चेला वेगळेच वळण मिळाले.
The visit of President Macron and his ever-cheerful wife Brigitte was already under political spotlight — but suddenly, his face and her hand became the unexpected center of global discussion.
तो व्हिडिओ पाहिलात का? लिंक खाली आहे
ब्रिजिट मॅडम फ्रेंच राष्ट्राध्यक्षांच्या चेहऱ्याल ढलत… किंवा धक्का देत… जसे काही स्मरण करून देतायत… की “थांबा रे बाबा, आता उतर खाली?”
Did you see the video? Madame Brigitte appears to nudge… or push his face gently, almost as if to say, “Calm down dear, time to get off now!”
राजकारण – चेहरा आणि ‘करार’
म्हणजे एकीकडे मॅक्रॉन यांच्या पायाखाली लाल कार्पेट, वरती आकाशात देशोदेशीचे ध्वज, आणि मनात बहुदेशीय करारांची यादी — आणि दुसरीकडे त्यांच्या चेहऱ्यावर ‘बायकोचा धक्का’.
On one hand, President Macron had a red carpet at his feet, global flags waving above, and international deals on his mind — and on the other, a gentle slap from his wife on his face.
काय सांगावं, पंतप्रधानांना ‘ग्राउंडेड’ ठेवण्याची कला फक्त ब्रिजिट मॅडमच जाणतात.
https://bbc.com/news/videos/c201e8g0yg3o
हा पहा तो क्षण या लिंक LINK वर
Who else but Madame Brigitte knows how to keep a President ‘grounded’ — quite literally!
राजकीय भाष्यकारांनी त्यावर लगेच बोट ठेवले — “या थपडीमागे अर्थशास्त्र आहे का?” “हा त्यांच्या पॉलिसीमध्ये ‘ह्यूमन टच’ दाखवण्याचा प्रयत्न आहे का?” “की ही एक नविन फ्रेंच डिप्लोमसी आहे – ‘पर्सनल इंपॅक्ट’ स्ट्रॅटेजी?”
Political commentators didn’t miss a beat — “Is there an economic angle to this slap?” “Is this the human touch in foreign policy?” “Or is it a new French diplomacy — the ‘personal impact’ strategy?”
सोशल मीडियावरचा धमाका
या व्हिडिओने ट्विटरवर व समाज माध्यमांवर धमाल एन्ट्री केली. #FrenchTap, #DiplomaticLoveSlap, #BrigittePower हे हॅशटॅग काही वेळातच ट्रेंडमध्ये आले.
The video exploded on Twitter and other social media. #FrenchTap, #DiplomaticLoveSlap, #BrigittePower quickly trended worldwide.
एकाने लिहिलं – “Love is blind, but sometimes, love wears rings and uses the right cheek.”
One user tweeted, “Love is blind, but sometimes, love wears rings and uses the right cheek.”
दुसऱ्याने म्हटलं – “या घटनेमुळे पॅरिसहून हनोईपर्यंत प्रेमाचा मार्ग आता थोडा धकाधकीचा वाटतो.”
Another quipped, “From Paris to Hanoi, the journey of love now seems slightly bumpy.”
एका पत्रकाराच्या मते…
एक स्थानिक व्हिएतनामी पत्रकार म्हणाला – “फ्रान्स व्हिएतनाममध्ये गुंतवणूक करू इच्छितो. पण सुरुवातच जर अशी झाली, तर आमचं मंत्रालय विचार करतंय – ‘लव्ह इन्व्हेस्टमेंट्स’ची एक नवीन श्रेणी सुरू करावी का?”
A local Vietnamese journalist commented — “France wants to invest in Vietnam, but if this is the beginning, our ministry is considering launching a new category — ‘Love Investments’!”
शेवटी… प्रेम हेच शस्त्र!
या घटनेवरून एक गोष्ट स्पष्ट होते – प्रेमात आणि राजकारणात, दोन्ही ठिकाणी कोणतीही गोष्ट फार काळ लपून राहत नाही. कधीकधी, एक हलकासा स्पर्श — किंवा धक्का — जागतिक चर्चेला कारणीभूत ठरतो.
This incident proves one thing — In love and politics, nothing stays hidden for too long. Sometimes, a simple nudge — or a slap — triggers global conversation.
आणि राष्ट्राध्यक्ष असो की सामान्य माणूस, घरी “फर्स्ट लेडी”चं मत शेवटी ‘फायनल’ असतं — आणि ते धक्कादायक ही असू शकतं!
Be it a President or a common man, at home, the First Lady always has the final say — and sometimes, it may come as a jolt!







