Goa Tourism and wine Market लक्षात घेऊन गोव्यात जगातील सर्वांत मोठे क्राफ्ट स्पिरिट्स केंद्र – TGCC चा प्रकल्प
गोवा, फोंडा : प्रीमियम अल्कोहोल ब्रँड्ससाठी प्रसिद्ध असलेल्या डियाजिओ इंडिया (Diageo India) कंपनीने गोव्याच्या फोंडा येथे ‘द गुड क्राफ्ट को. (The Good Craft Co. – TGCC) फ्लेवर मार्केट’ उभारणीस सुरुवात केली आहे. हे केंद्र जगातील सर्वांत मोठे इंडियन क्राफ्ट स्पिरिट्स डेस्टिनेशन ठरणार असून, भारतीय पेयसंस्कृतीस जागतिक व्यासपीठ मिळवून देणार आहे- Goa craft Spirit
TGCC चे नेमके स्वरूप काय असेल?
‘द गुड क्राफ्ट को. फ्लेवर मार्केट’ हे केवळ एक उत्पादन केंद्र नसून अनुभवात्मक डेस्टिनेशन (Experiential Destination) असेल.
- येथे अनेक Craft Spirit निर्मिती युनिट्स उभारली जाणार आहेत. जिन, रम, व्हिस्की, कॉकटेलसाठी लागणारे बेस स्पिरिट्स आणि स्थानिक घटक यांचे प्रयोग येथे होणार आहेत.
- पर्यटकांना प्रत्यक्ष पेय तयार होण्याची प्रक्रिया पाहता येईल आणि चाखण्याचा अनुभव मिळेल.
- याशिवाय, येथे टेस्टिंग रूम्स, फ्लेवर गॅलरी, क्राफ्ट लॅब्स अशी आकर्षक ठिकाणे असतील.
पर्यटकांसाठी सुविधा
TGCC फ्लेवर मार्केट हे गोव्याच्या पर्यटन नकाशावर नवे आकर्षण ठरणार आहे.Goa tourism and wine ही पर्यटन उद्योगात रुजलेली प्रतिमा आहे. याच संकल्पनेला जागतिक पातळीवर नेवून cash करण्याचा TGCC चा प्रयत्न आहे.
- येथे बुटीक हॉटेल्स, रिसॉर्टसदृश राहण्याची सोय आणि फूड-पेअरिंग रेस्टॉरंट्स असण्याची योजना आहे.
- आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी खास हॉस्पिटॅलिटी झोन विकसित केला जाणार आहे.
- पर्यटकांना भारतीय पेयसंस्कृतीचा इतिहास, स्थानिक घटकांचे महत्त्व आणि नव्या प्रयोगांविषयी माहिती देण्यासाठी इंटरॅक्टिव्ह प्रदर्शन केंद्र देखील असणार आहे.
प्रकल्पाचे स्थान
हा प्रकल्प गोव्याच्या फोंडा (Ponda, Goa) येथे उभारला जात आहे. फोंडा हा गोव्याच्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशासाठी प्रसिद्ध आहे. अशा पार्श्वभूमीवर TGCC मुळे गोव्याच्या पर्यटनाला नवी ओळख मिळेल अशी अपेक्षा आहे.
भारतीय क्राफ्ट स्पिरिट्सचा जागतिक प्रवास
भारतामध्ये गेल्या काही वर्षांत क्राफ्ट जिन, बीअर, रम आणि व्हिस्की यांसारख्या प्रयोगांना मोठी लोकप्रियता मिळाली आहे. TGCC मार्फत भारतीय ब्रँड्सना जागतिक बाजारपेठेत उतरण्याची संधी मिळेल.
विक्रम दामोदरन, चीफ इनोव्हेशन ऑफिसर, डियाजिओ इंडिया यांनी सांगितले :
“द गुड क्राफ्ट को. ची सुरुवात भारतीय क्राफ्ट स्पिरिट्सविषयी जिज्ञासा निर्माण करण्यासाठी आणि संवाद घडवून आणण्यासाठी झाली. बेंगळुरूमधील फ्लेवर लॅबने त्याचा पाया रचला, पण फोंड्यात आम्ही याहूनही अधिक महत्वाकांक्षी काहीतरी उभारत आहोत. हे असे एक गतिशील व रचनात्मक ठिकाण असेल जिथे समाजातील विविध घटक भारतीय क्राफ्ट स्पिरिट्सशी अर्थपूर्ण पद्धतीने जोडले जाऊ शकतील. आपण डिस्टिलर असाल, शेफ असाल, उद्योजक असाल किंवा फक्त उत्सुक व्यक्ती – TGCC,फोंड्यामधे प्रत्येकासाठी काही ना काही खास आहे.”
निष्कर्ष
Goa Tourism and wine ही गोव्याची तयार झालेली प्रतिमा स्थानिक गोवेकरांना नैतिक पातळीवर पटत नाही. “गोवा म्हणजे फक्त दारू नाही.. गोव्याला समृद्ध सांस्कृतिक परंपरा आहे ” असे ते आवर्जून सांगतात. असे असले तरी Tourism हा एकमेव उद्योग गोव्याचा आर्थिक कणा झालेला आहे हे नाकारता येत नाही.
डियाजिओ इंडियाचा TGCC फ्लेवर मार्केट प्रकल्प हा फक्त पेय उद्योगासाठीच नव्हे तर गोव्याच्या अर्थव्यवस्थेसाठी आणि पर्यटनासाठीही महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील, तसेच भारतातील craft Spirit ला आंतरराष्ट्रीय स्तरावर नवे स्थान मिळेल या स्वागतार्ह बाबी आहेत.

हे ही वाचा :






