जीतेन्द्र : ८२ व्या वर्षी ‘रिअल इस्टेट’मध्ये उडी
बॉलीवूडमधील ‘जम्पिंग जॅक’ म्हणून प्रसिद्ध झालेले जेष्ठ अभिनेते जीतेन्द्र वयाची ८२ वर्षे पार करूनसुद्धा व्यवसायाच्या नव्या वाटा शोधत आहेत. रंगमंच, रुपेरी पडदा, टेलिव्हिजन, आणि आता बांधकाम व्यवसाय (रिअल इस्टेट) — त्यांच्या करिअरचा हा प्रवास खरंच प्रेरणादायी आहे.
🎥
चित्रपटसृष्टीतील प्रदीर्घ कारकिर्द
जीतेन्द्र यांनी १९६० च्या दशकापासून बॉलीवूडवर राज्य केले. त्यांचे ‘फुल और पत्थर’, ‘कारवाँ’, ‘हिम्मतवाला’, ‘तोहफा’, ‘मवाली’ यांसारखे सुपरहिट चित्रपट आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. त्यांची एनर्जी आणि खास डान्स स्टेप्स यामुळे त्यांना ‘जम्पिंग जॅक’ असे टोपणनाव मिळाले.
🏢
व्यवसायाच्या नव्या दिशा शोधण्याची वृत्ती
जितेंद्र यांच्या बॉलिवूड मधील सिने कारकिर्दीला जेंव्हा उतरती कळा लागली होती तेंव्हा त्यांनी दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. तिथे त्यांनी अनेक चित्रपट केले व ते यशस्वी ही झाले.
पुढेअभिनयापासून हळूहळू दूर झाल्यावरही जीतेन्द्र यांनी स्वतःला निवृत्त मानसिकतेत जावू दिले नाही. त्यांच्या कुटुंबाची (विशेषतः त्यांची मुलगी एकता कपूर व मुलगा तुषार कपूर) टेलिव्हिजन व ओटीटी माध्यमातील मोठी साम्राज्ये उभारण्यात त्यांची मोलाची भूमिका राहिली.
नुकतेच त्यांनी स्वतःचा बांधकाम व्यवसाय सुरू केल्याची घोषणा केलीआहे.माहितीनुसार, जीतेन्द्र यांनी मुंबई व आसपासच्या भागात काही प्रॉपर्टी प्रोजेक्ट्स हाती घेतले आहेत. वयोमानानुसार शरीर जरी थकले असेल, तरी जितेंद्र यांची बुद्धी आणि व्यावसायिक दूरदृष्टी तशीच तल्लख आहे.
बांधकाम क्षेत्रात नैतिकतेने काम करण्याची इच्छा
८२ व्या वर्षी बहुतेकजण निवांत जीवन जगायला प्राधान्य देतात. पण जीतेन्द्र मात्र नव्या संधी शोधण्यात आणि जोखीम पत्करण्यात रमले आहेत. हेच त्यांच्या उत्साही व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडवते. बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिक चालाक आहेत व ते नैतिकता पाळत नाहीत असे मत ते खेदपूर्वक नोंदवतात. असे असले तरी आपण मात्र या क्षेत्रात पूर्ण नैतिकतेने काम करणार आहोत असे ते म्हणतात. सध्या बांधकाम व्यावसायिक इमारत बांधणी पूर्वीच घरांची विक्री करतात ही बाब जितेंद्र यांना पटत नाही. आपण कधीही असे करणार नाही व इमारत पूर्ण झाल्यावरच घरांची विक्री करण्याचे तत्व पाळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गिरगाव च्या चाळीतील मध्यमवर्गीय संस्कार
जितेंद्र सीनेसृष्टीत स्टार होण्या आधी गिरगाव च्या चाळीत रहात. ते अस्खलित मराठी बोलतात. मराठी व मुंबई घ्या चाळ संस्कृती ला ते अजुन विसरले नाहीत. व्यवसायातील नैतिकता पाळण्याची त्यांची वृत्ती याच संस्कृती घ्या जडण घडणी
थोडक्यात
जेष्ठ अभिनेते जीतेन्द्र यांनी आता रिअल इस्टेट क्षेत्रात प्रवेश केला आहे. वयाच्या ८२ व्या वर्षीही ते नवे प्रकल्प राबवत आहेत.
बॉलीवूडमधील त्यांची कारकीर्द व कुटुंबाचा टीव्ही-ओटीटी व्यवसाय याशिवाय बांधकाम क्षेत्रातील आता त्यांचा एक वेगळा प्रवास सुरू होत आहे.जीतेन्द्र यांच्या या नव्या प्रवासाला शुभेच्छा! त्यांच्या कार्यक्षमतेतून आजच्या तरूणांना ही प्रोत्साहन व प्रेरणा नक्कीच मिळणार आहे.
हे ही वाचा
जेष्ठ हॉलिवूड अभिनेते रॉबर्ट डीनेरो यांनी US अध्यक्ष ट्रंप यांच्या नीतिचा केला जाहीर निषेध
Storyteller by instinct, screenwriter by choice. Sharing thoughtful news and interesting facts
At pinga9.com