महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभ मिळवण्यासाठी Ladki bahin yojna ‘e-KYC‘ ही प्रक्रिया सरकारने अत्यावश्यक केली आहे. अनेक महिलांना ही E KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी केंद्रांवर जावे लागते, तिथे रांगा लावाव्या लागतात आणि वेळेचा अपव्यय होतो. हे टाळण्यासाठी Ladki bahin yojna e-KYC आता घरबसल्या Online ही करता येईल. नारी शक्ति दूत ॲप हे सरकारी App फोनवर डाऊनलोड केल्यास कूठल्याही एजंट शिवाय काही मिनीटांत तुम्ही तुमची ई -KYC पूर्ण करू शकता.
नारी शक्ति दूत ॲप चा वापर करून ही Ladki bahin yojna e-KYC प्रक्रिया घरबसल्या, मोबाईलवरून कशी करावी हे.या लेखात आपण पाहणार आहोत की
लाडकी बहीण योजने ची ई-KYC नारी शक्ति दूत ॲप वरून कशी करावी,
त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात आणि अडचण आल्यास काय करावे.
लाडकी बहीण योजना ई KYC आता दरवर्षी बंधनकारक
लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची महिला-केंद्रित योजना असून पात्र महिलांना या योजनेतून थेट आर्थिक सहाय्य दिले जाते. हा लाभ योग्य व्यक्ति पर्यंत पोहोचावा यासाठी ही ई KYC ( Know Your Client) प्रक्रिया आता लाभार्थी महिलांना दरवर्षी नव्याने करणे बंधनकारक आहे. लाभार्थी महिलांची ओळख व पात्रता या KYC प्रक्रियेतून निश्चित होणार आहे.
नारी शक्ति दूत ॲप म्हणजे काय?
नारी शक्ति दूत App हे महाराष्ट्र सरकारचे अधिकृत मोबाईल ॲप आहे.
या ॲप वर सरकारच्या सर्व महिला-संबंधित योजनांची माहिती, अर्ज प्रक्रिया आणि ई-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
लाडकी बहीण योजना ई-KYC नारी शक्ति दूत ॲप वरून करण्यासाठी लागणारी कागदपत्रे
- आधार कार्ड (मोबाईल नंबर लिंक असलेला)
- आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर
- स्मार्टफोन
- इंटरनेट कनेक्शन
लाडकी बहीण योजना ई-KYC नारी शक्ति दूत ॲप download करणे व: Step-by-Step ई KYC प्रक्रिया
Step 1 : नारी शक्ति दूत ॲप डाउनलोड करा
सर्वप्रथम Google Play Store वर जाऊन “Nari Shakti Doot App” शोधा आणि हे सरकारी ॲप Install करा.
Step 2 : लॉगिन किंवा नोंदणी करा
मोबाईल नंबर टाका, OTP द्वारे Verify करा आणि आवश्यक असल्यास प्रोफाइल माहिती भरा.
Step 3 : लाडकी बहीण योजना पर्याय निवडा
या App वर महाराष्ट्र सरकारच्या सर्व महिला विषयक योजनांची माहिती विभागवार आपल्याला दिसेल . आता Home Screen वर लाडकी बहीण योजना किंवा e-KYC असा पर्याय\विभाग निवडा.
Step 4 : Ladki bahin yojna e-KYC प्रक्रिया खालील Step by step मार्गदर्शना अनुसार पूर्ण करा
- नारी शक्ती दूत App उघडा – आता तुम्हाला ekyc पूर्ण करा असा संदेश दिसेल – रिकाम्या चौकटीत आधार नंबर टाकून दिसत असलेला captcha code लिहून submit करा-
- आता तुमच्या आधार लिंक्ड मोबाईल नंबर वर OTP येईल – तो OTP भरा- हे केल्यावर नवीन पेज open होईल – इथे वडीलांचा किंवा पतीचा आधार नंबर टाका – पुन्हा दिसत असलेला captcha code भरून सबमिट करा
- – आता तुम्हाला OTP येईल- तो OTP इथे भरा
- – आता तुचे या आधी KYC पूर्ण झाले की नाही हे तपासले जाईल – KYC झाली असेल तर Success असा मेसेज screen वर दिसेल – नसेल तर “पात्र नाही” असा संदेश दिसेल
- – पात्र नाही असा मेसेज दिसलयास आता प्रक्रिया पुन्हा करा
- – आधी केल्याप्रमाणे आधार कार्ड नंबर – OTP- व captha code भरा- वडीलांचा किंवा पतीचा आधार नंबर टाकून – captha code टाकून सबमिट करा – यानंतर ‘जात प्रवर्ग’ पर्याय निवडावा व या ठिकाणी योग्य माहिर भरा . इतर विचारलेल्या declaration करा …. तुमची लाडकी बहीण E KYC प्रक्रिया आता पूर्ण झालेली असेल.
ई-KYC करताना येणाऱ्या सामान्य अडचणी
जर OTP येत नसेल तर आधारमध्ये नोंद असलेला मोबाईल नंबर व आपण आते देत असलेला नंबर एकच आहे का हे तपासा.
आधार मोबाईलशी लिंक नसेल तर जवळच्या आधार सेवा केंद्रात मोबाईल नंबर अपडेट करून घ्या.
ॲप स्लो चालत असल्यास इंटरनेट कनेक्शन स्थिर आहे का ते तपासा
आणि ॲप Update केलेले आहे का हे पाहा.
नारी शक्ति दूत ॲप वरून ई-KYC करण्याचे फायदे
- घरबसल्या ई-KYC प्रक्रिया
- वेळ आणि पैसा वाचतो
- कोणत्याही एजंटची गरज नाही
- सरकारी अधिकृत प्लॅटफॉर्म
- महिलांसाठी सुरक्षित आणि सोपी पद्धत
महत्त्वाची सूचना
ई-KYC वेळेत पूर्ण न केल्यास लाडकी बहीण योजनेचा लाभ थांबू शकतो.
OTP किंवा आधार माहिती कोणालाही देऊ नका आणि फक्त अधिकृत ॲपच वापरा. हे App तुम्हालला Google play store वर मिळेल.
निष्कर्ष
लाडकी बहीण योजना ई-KYC नारी शक्ति दूत ॲप वरून करणे ही सर्वात सोपी, सुरक्षित
आणि जलद पद्धत आहे. प्रत्येक पात्र महिलांनी वेळेत ई-KYC करून
योजनेचा लाभ घ्यावा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
प्रश्न 1 : लाडकी बहीण योजना ई-KYC करणे बंधनकारक आहे का?
होय. ई-KYC पूर्ण केल्याशिवाय लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही.
प्रश्न 2 : नारी शक्ति दूत ॲप सरकारी आहे का?
होय. नारी शक्ति दूत ॲप हे महाराष्ट्र सरकारचे अधिकृत ॲप आहे.
प्रश्न 3 : ई-KYC करताना कोणते कागदपत्र लागतात?
आधार कार्ड आणि आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर आवश्यक आहे.
प्रश्न 4 : OTP येत नसेल तर काय करावे?
आधारमध्ये नोंद असलेला मोबाईल नंबर तपासा किंवा नेटवर्क बदलून पुन्हा प्रयत्न करा.
प्रश्न 5 : ज्या महिला Online ई KYC प्रक्रिया करू शकत नसतील त्यांंनी काय करा
ज्या महिलांना online अर्ज करता येत नसेल, त्यांना आशा सेविका/अंगणवाडी सेविका/पर्यवेक्षिका/मुख्यसेविका/सेतु सुविधा केंद्र/ग्रामसेवक/समुह संसाधन व्यक्ती (CRP)/वार्ड अधिकारी / CMM (सिटी मिशन मॅनेजर) / मनपा बालवाडी सेविका / आपले सरकार सेवा केंद्र ऑनलाइन /मदत कक्ष प्रमुख यांच्या मदतीने Offline अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध असेल. या अर्जासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही.
हे ही वाचा : Aadhaar Pan Link Status: ऑनलाईन स्टेटस चेक करण्याची सोपी पद्धत (2026) || Aadhaar Pan Link ची last date पुन्हा वाढवली: उशीर झाल्यास दंड (Penalty) किती?-जाणून घ्या || मतदार यादीत आपले नाव आहे की नाही?स्वतः online तपासा-Maharashtra Voter List Check || १ जानेवारी २०२६ पासून बदलत आहेत बँकांचे हे ५ नियम: RBI new rules -तुमच्या बजेटवर कसा होणार परिणाम?







